Reading Time: 4 minutes

काही दिवसापूर्वी एक चमकता तारा आपल्यातून निघून गेला. हा तारा शेअर बाजारातील अमिताभ बच्चन होता. ज्याला भारताचा वॉरन बफे देखील म्हटलं जायचं. या माणसाच्या नुसत्या स्पर्शात इतकी जादू होती की ज्या गोष्टींना स्पर्श करेल ती सोन्याची होऊन जायची. ते ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे, त्या शेअर्सचे रुपांतर सोन्याच्या खाणीत व्हायचे. ते शेअर्स खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. ते जे शेअर्स विकायचे, त्याचा काळा कोळसा व्हायचा. एव्हाना तुम्हाला कळलेचं असेल की, मी कुणाबद्दल बोलत आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ज्यांची प्रशंसा ‘वन वन अँड ओन्ली’ करायचे, असे राकेश झुनझुनवाला.

 

 

हेही वाचा – शेअर मार्केटचा राजा- राकेश झुनझुनवाला !

 

राकेश झुनझुनवाला आज आपल्यात नाहीयेत पण त्यांनी स्वतःच्या जगण्यातून घालून दिलेला आदर्श नेहमीच आपल्यासोबत राहणार आहे. जगातल्या कोणत्याही यशस्वी व्यक्तींना समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीचे फक्त व्यावसायिक जीवन समजून घेणे उपयोगाचे नसते. फक्त त्यांचा व्यवसाय समजून घेणे म्हणजे अर्धवटराव होणे आहे आणि कोणत्याही क्षेत्रातील अर्धवट ज्ञान धोक्याचे असते. ज्यामुळे आपले नुकसान होण्याचीच अधिक शक्यता असते. यशस्वी व्यक्ती खाजगी जीवन कसे जगतात. हेही तितकेच महत्वाचे असते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून काहीतरी घेण्यासारखे असते. हे समजण्यासाठी राकेश झुनझुनवाला यांच्या जीवनाकडे बघा.

 

 

गेल्या महिन्यात ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्यावेळी त्यांच्या भेटीपेक्षा त्यांच्या चुरगळलेल्या शर्टची अधिक चर्चा झाली. त्यावेळी ते म्हणाले होते की, मी हा शर्ट इस्त्री करूनही चुरगाळला, त्याला मी तरी काय करणार? मी अनेक वेळा ऑफिस मध्ये देखील शॉर्ट्स घालून जातो. अब्जाधीश असणारे राकेश झुनझुनवाला इतके साधे कपडे घालायचे. त्यांना आपल्या श्रीमंतीचा कसलाही माज नव्हता. ते आपलं जीवनही अगदी सरळ- साध्या पद्धतीने जगायचे. ते एका मुलाखतीत म्हणाले होते की, माझ्याकडे सध्याच्या १० – १५ % संपत्ती असली असती तर मी अशा सध्या पद्धतीनेच जीवन जगलो असतो. तेच जेवण केलं असते, त्याच कार मध्ये फिरलो असतो, तसेच कपडे घातले असते. ही जमवलेली संपत्ती कशाला मोजत बसायची. मी हे काम करतो कारण मला हेच काम येतं.

 

 

 

हेही वाचा – Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवाला भारतीय शेअर बाजारातील बादशाह

 

आपल्या देशात राकेश झुनझुनवाला अतिशय उच्च दर्जाची जीवनशैली जगू शकले असते. पुढच्या पन्नास पिढ्या बसून खातील एवढी अवाढव्य संपत्ती त्यांच्याकडे होती. ते अतिशय महागड्या कार मध्ये फिरू शकले असते, हजारो कोटीच्या बंगल्यात राहू शकले असते, तासातासला कपडे बदलू शकत असते. असं जगूनही त्यांच्या खजाना एक टक्काही रिकामा झाला नसता. असं असूनही ते मध्यमवर्गीय कुटुंबासारखे साध्या पद्धतीने जगत राहीले.

 

 

राकेश झुनझुनवाला यांच्या यशामागे हे साधं जगण आहे. १९८५ साली जेव्हा त्यांनी शेअर बाजारात पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली होती आणि त्यांना तीन महिन्यात खूप चांगला फायदा झाला होता. त्यावेळी त्यांनी ते पैसे परत न गुंतवता खर्च केले असते तर आज राकेश झुनझुनवाला ज्या शिखरावर पोहचले आहेत, तिथे कधीच पोहचू शकले नसते. ज्यावेळी त्यांना शेअर बाजारात सुरवातीला चांगला परतावा मिळत होता, तेव्हा ते अगदी जवानीत होते. ज्या वयात मुलं पैसे खर्च करण्यासाठी उतावीळ असतात त्यावेळी राकेश झुनझुनवाला पैसे गुंतवत होते. बहुतांश लोकं जेव्हा पैसे हातात येतात तेव्हा दिखावेपणा करण्यासाठी प्रचंड खर्च करतात मग त्यांना गुंतवणुक करण्यासाठी पैसेच राहत नाहीत. असा भपकेबाजपणा न करता योग्य वेळी, योग्य ठिकाणी पैसे कसे गुंतवावेत हे आपल्याला राकेश झुनझुनवाला यांच्या आयुष्यातून शिकायला मिळतं.

 

 

“रिस्क लेने से डरो मत. लेकिन उतना ही रिस्क लो, जितना अफ़ोर्ड कर सकते हो ताकि दूसरा रिस्क लेने की जगह बची रहे.” असं एक फार महत्वाचे वाक्य राकेश झुनझुनवाला बोलायचे. ‘रिस्क है तो इश्क है’ असं म्हणून हर्षद मेहता आपल्या आवाक्याबाहेरची गुंतवणूक करायचा. हा हर्षद मेहता तुरुंगात गेला तर ‘जितना अफ़ोर्ड कर सकते हो उतना रिस्क लो’ असं म्हणणारे राकेश झुनझुनवाला शेअर बाजाराचे व लोकांचे हिरो झाले. हा महत्वाचा फरक आपण लक्षात घ्यायला हवा. पैशाची प्रचंड हाव ठेवून शेअर बाजारात गेलो तर त्याचा हर्षद मेहता होणार आणि अभ्यास करून पैशाचा लोभ न ठेवता शेअर बाजारात पाय ठेवला तर आपण राकेश झुनझुनवाला यांच्या दिशेने जाणार…

 

 

हर्षद मेहता आणि राकेश झुनझुनवाला यांची जीवनशैली पाहिली तर त्यातही मोठा फरक दिसून येतो. हर्षद मेहता अतिशय महागडी जीवनशैली जगायचे तर राकेश झुनझुनवाला साधं जीवन जगायचे. या कारणामुळेच राकेश झुनझुनवाला शेअर बाजारात केवळ टिकून राहीले नाहीत तर त्या शेअर बाजाराचे राजा बनून राहीले. भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील एक ध्रुव तारा झाले, ज्या ध्रुव ताऱ्याला पाहून येणाऱ्या अनेक पिढ्या प्रेरणा घेत राहतील.

 

 

हेही वाचा –  या ५ शेअर्सने राकेश झुनझुनवालांना बनवले बिग बुल !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…