Guaranteed Return
https://bit.ly/3jmWyfw
Reading Time: 3 minutes

‘ग्यारंटीड’ की “ग्रोथ”?…

अल्बर्ट आईनस्टाईनने जगातील आठवं आश्चर्य म्हणून विषद केलेलं चक्रवाढीचं सूत्र माहित नाही, असा एकही गुंतवणूकदार नसेल. पण गुंतवणूकीचा निर्णय घेण्याची वेळ आली की परताव्याची हमी काय, याची सर्वप्रथम चौकशी करतो. खात्रीशीर परताव्याची (Guaranteed Return) ग्वाही बंधनकारक अटी व नियमांच्या अधीन राहूनच दिली जाते. उदाहरणार्थ बँकेत केलेली मुदत ठेव खात्रीशीर व्याज देईल परंतु ठरलेली मुदत पूर्ण केली तरच. तुम्ही मधेच मुदत ठेव मोडली तर तुम्हाला दंड आकारून तुमची मुद्दल परत केली जाते. यापेक्षा अवघड परिस्थिती जर तुम्ही विमा कंपन्यांच्या ग्यारंटीड योजनांमधे गुंतवणूक केल्यास होते.

हे नक्की वाचा: नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय? 

Guaranteed Return: खात्रीशीर परतावा 

  • ‘ग्यारंटीड’ योजनांमधे काय खात्रीशीर आहे? ‘ग्यारंटीड’ योजनांमधे परतावा की परतफेड याचा अभ्यास न करता गुंतवणूक करणारे कसे चुकीचा निर्णय घेतात? याचे एक उदाहरण सांगतो.
  • ‘ग्यारंटीड’ योजनांमधे ‘ग्यारंटीड’ काळासाठी पैसे काढता येत नाही, हे लक्षात असू दया.
  • मुलाच्या उच्च शिक्षणासाठी मोठया रकमेची तरतूद एका व्यापाऱ्याने करून ठेवली होती. हातात तीन वर्षांचा कालावधी असल्यामुळे पैसे पडून राहण्यापेक्षा गुंतवणूक करू या, असा सुज्ञ विचार त्यांनी केला.
  • कोणाच्या तरी सांगण्यावरून ‘ग्यारंटीड’ परतावा मिळेल म्हणून विमा योजनेत गुंतवणूक केली आणि शिक्षणासाठी कर्ज काढण्याची वेळ आली. कारण मध्यस्थाने ‘ग्यारंटीड’ परतावा मिळेल हे ठळकपणे सांगितले पण ही योजना मुदतबंद प्रकारात मोडते हे नाही सांगितले.

नवरात्र विशेष लेख क्र. २: आर्थिक नुकसानाचा ‘फोबिया’

संपत्ती निर्माण करण्याच्या ५ पायऱ्या असतात-

  • गुंतवणूकदाराचे वर्तन
  • मत्ता विभाजन
  • सल्लागाराचे किंवा व्यवहारासाठी द्यावे लागणारे शुल्क
  • गुंतवणूक साधनांची योग्य निवड
  • कर कार्यक्षमता

नवरात्र विशेष लेख क्र. ३:  आर्थिक शिस्त लावणारी “काह-केह-बोह…..” 

चक्रवाढ व्याजाची जादू की खात्रीशीर परतावा (Guaranteed Return)?

ग्रेस ग्रोनरची कहाणी:

  • ग्रेस ग्रोनर अमेरिकन नावाची मुलगी वयाच्या १२व्या वर्षी अनाथ झाली. तिने संपूर्ण आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय घेतला.
  • सर्व हयातीत सचिव म्हणून नोकरी करून वन रूम किचनच्या सदनिकेत आयुष्य व्यतीत केलं.
  • अतिशय प्रामाणिकपणे काम करून मिळालेली कष्टाची कमाई एका आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन पद्धतशीरपणे गुंतवित राहिली.
  • वयाच्या १००व्या जगाचा निरोप घेतांना गुंतविलेल्या छोटया छोटया पुंजीचे ७ दशलक्ष अमेरिकन मिलीयन डॉलर्स तिचा सांभाळ केलेल्या अनाथगृहाला दान म्हणून देऊन गेली.
  • तिने केलेल्या काही हजार अमेरिकन डॉलर्सच्या सक्रीय गुंतवणूकीचा कालावधी किमान ६० वर्षे होता. मग एवढी रक्कम कुठून आली?असं कुठलं रहस्य होतं? की तिच्या गुंतवणूकीने एवढा अविश्वसनीय परतावा दिला?
  • तिच्या गुंतवणूकीला अल्बर्ट आईनस्टाईनच्या चक्रवाढीच्या सूत्राने बळ दिलं. हे उदाहरण शेअर्समधे किंवा म्युच्युअल फंडांच्या शेअर बाजाराशी संलग्न योजनांमधे गुंतवणूक करणाऱ्यांना अंजन घालण्यासाठी पुरेसं आहे.

नवरात्र विशेष लेख क्र. ४: मी श्रीमंत कसा होऊ? 

रिचर्ड फस्कॉन यांची व्यथा :

  • आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्थावर मालमत्तेतून भरघोस उत्पन्न मिळू शकते, या सिद्धांतावर भरवसा असणाऱ्या एका दुसऱ्या गुंतवणूकदाराचे उदाहरण बघू.
  • अमेरीकास्थित मेरील लिंच नावाची बँक सर्वांना माहित असेल. तिचे उपाध्यक्ष रिचर्ड फस्कॉन वयाच्या ४०व्या वर्षीच आर्थिकदृष्टया आत्मनिर्भर झाले.
  • त्यांनी २०,००० स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेली दोन घरं विकत घेतली, कर्ज काढून. ही गुंतवणूक त्यांनी दोन शक्यता गृहीत धरून केली होती.
  • पहिली स्थावर मालमत्तेच्या किमती वाढत जातील आणि दुसरी ती घरं भाडयाने देऊन कायमस्वरूपी उत्पन्न मिळत राहील या आशेने.
  • परंतु ही गुंतवणूक करतांना रिचर्ड यांनी त्यामागचे धोके लक्षात घेतले नाही. पहिला स्थावर मालमत्तेला तरलता नसते आणि दुसरा अपेक्षित भाडे न मिळाल्यास कर्ज परतफेड कशी होईल?
  • २००८ साली सब प्राईमचा फुगा फुटला आणि पुढे काय झालं? हे सर्वांनाच ठाऊक आहे.
  • हार्वर्ड विद्यापिठाचे पदवीधर असेलेले आणि ‘वेल्थ मॅनेजर’ ही उपाधी मिरविणारे रिचर्ड फस्कॉन यांना कर्ज परतफेड करता नाही आली म्हणून दिवाळखोरी जाहीर करावी लागली. ग्रेस ग्रोनरकडे तर प्रतिष्ठीत विद्यापिठाची पदवी देखील नव्हती.

नवरात्र विशेष लेख क्र. ५: पैशाचे व्यवस्थापन: खर्च आणि गुंतवणुकीचा ताळमेळ 

वरील तिन्ही सत्य कथांमधून काय बोध घेता येईल? आपले पैशांसोबत असलेले वर्तन आपली आर्थिक साक्षरता किती कार्यक्षम आहे, हे ठरविते. आर्थिक (पैशांचं) नियोजन करतांना तुमच्याकडे किती माहिती आहे यापेक्षा तुम्ही पैशासोबत कसे वागतात? यावर जास्त अवलंबून असते. वर नमूद केलेल्या ५ पायऱ्यांचा अभ्यास केल्यास रिचर्ड फस्कॉन यांचे सर्व लक्ष कर कार्यक्षमतेवर (५वी पायरी) होते कारण ते त्यात पारंगत होते. तर ग्रेस ग्रोनरने सामान्य गुंतवणूकदाराचे वर्तन (१ ली पायरी) अनुसरण करणे पसंत केले होते. आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्याला काहीतरी शिकविण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपण आपल्या वर्तणूकीनुसार त्यांचा स्विकार किंवा अस्विकार करत असतो.

खरतरं ‘पैसा’ दृष्य स्वरूपात असतो आणि “संपत्ती” अदृष्य रुपात निर्माण होत असते.

अतुल प्रकाश कोतकर

94231 87598

[email protected]

(लेखक म्युच्युअल फंड व विमा वितरक आहेत.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…