Reading Time: 2 minutes

देशभरात वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तुमच्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य विमा उपयुक्त ठरतो. त्यासाठीच पुरेसे, विनाखंड आरोग्य विमा कवच मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या विमा कंपनीला आवश्यक ती माहिती देणे गरजेचे आहे

कोणताही विमा हाअटमोस्ट गुड फेथअर्थात अत्यंत विश्वास या तत्वावर बेतलेला असतो. म्हणजेच विमा उतरवणाऱ्या व्यक्तीने विमा कंपनीला विमा प्रस्तावासाठी सर्व आवश्यक माहिती देणे अपेक्षित असते. तुमच्या आरोग्य विमा कंपनीला तुम्ही कोणत्या टप्प्यावर आणि कोणती माहिती दिली पाहिजे, या विषयी.

आरोग्य विमा खरेदी करण्याची 8 महत्वाची कारणे

विमा योजना घेताना 

  • विमा उतरवण्यापूर्वी तुमच्याकडून विमा कंपनीला प्रमाणिक प्रस्ताव देणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत या प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसारच कंपनी तुमच्यासाठी विमा योजना निश्चित करते
  • यामध्ये तुम्हाला होऊ शकणारे संभाव्य आजार, त्यासाठी येणारा खर्च आणि त्यासाठी आकारला जाणारा हप्ता या गोष्टींचा समावेश असतो. म्हणूनच विमा उतरवताना तुम्ही तुम्हाला आता असलेले आजारच नव्हे तर पूर्वी झालेल्या आजारांची माहितीदेखील देणे महत्त्वाचे ठरते
  • विमा उतरवण्यापूर्वी तुम्ही किती तंदुरुस्त होता ही बाब विमा कंपन्यांसाठी निर्णायक ठरते. उदाहरणार्थ तुम्हाला विमा उतरवण्यापूर्वी तीनचार वर्षांपासून काही आजार असेल, तर तो पूर्वीपासून असलेला आजार म्हणून गणला जातो
  • सामान्यतः विमा कंपन्या त्या आजारासाठी प्रतीक्षा कालावधी लागू करतात किंवा अतिरिक्त हप्ता आकारतात. त्यामुळे अशा कोणत्याही आजाराची माहिती लपवणे हे मूलभूत तथ्य लपवणे मानले जाते. त्यामुळे विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते आणि जेव्हा तुम्हाला विमा संरक्षणाची सर्वाधिक गरज असते, तेव्हाच तुम्हाला त्यापासून वंचित राहावे लागते

योग्य आरोग्य विम्याची निवड

प्रत्यक्ष दावा करताना 

  • आरोग्य विम्याचा दावा दोन प्रकारे करता येतो, कॅशलेस किंवा रिइंबर्समेंट (प्रतिपूर्ती) – कॅशलेससाठी दाव्यामध्ये विमा कंपनी संबंधित हॉस्पिटल हे एका नेटवर्कचा भाग असतात. त्याद्वारे संबंधित हॉस्पिटल विमाधारकाचे वैद्यकीय अहवाल आणि बिल संबंधित विमा कंपनीला पाठवते
  • यामध्ये विमाधारकाला फार काही करावे लागत नाही. प्रतिपूर्तीच्या दाव्यासाठी मात्र, विमाधारकाला दाव्याचा फॉर्म भरणे, त्यात वैद्यकीय उपचारांबाबतचे सर्व तपशील अचूक भरणे, विविध तपासण्यांचे मूळ अहवाल, मूळ बिले अन्य आवश्यक कागदपत्रे जोडून ती विमा कंपनीकडे सादर करावी लागतात. त्याआधारेच विम्याचा दावा मंजूर केला जातो
  • दावा करण्यापूर्वी आपल्या योजनेच्या अटींनुसार यात कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, याची माहिती घेणे आवश्यक ठरते. तुमचा आजार जुनाट असेल तर त्यासाठी प्रतीक्षा कालावधी लागू असू शकतो किंवा त्या आजाराला विमा संरक्षण लागू नसण्याचीही शक्यता असते.  

नूतनीकरण करताना 

  • वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च पाहता, दरवर्षी तुमच्या आरोग्य विमा योजनेचे नूतनीकरण करताना विमा संरक्षणाची रक्कम वाढवून घेणे आणि योजनेत समाविष्ट बाबींचा आढावा घेणे हितकारक ठरते
  • तसे करायचे झाल्यास कंपनीकडून तुम्ही केलेल्या दाव्यांची माहिती घेतली जाईल. नूतनीकरणावेळी तुमच्या आरोग्यविषयीची योग्य माहिती द्या, त्यामुळे पुढे दावा करायची वेळ आल्यास कोणतीही अडचण येणार नाही
  • नूतनीकरणापूर्वीच्या वर्षभरात तुम्हाला काही आजार झाला असेल आणि त्यासाठी तुम्ही दावा केला नसेल, तरीही त्याची माहिती विमा कंपनीला देणे ही तुमचीच जबाबदारी आहे
  • ही माहिती विमा कंपनीला तुमची विमा संरक्षण रक्कम निश्चित करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार तुमच्या विमा संरक्षणात बदल करण्यासाठी आवश्यक असते.

आरोग्य विमा नुतनीकरण करताय? मग लक्षात ठेवा या ९गोष्टी..

मोलाचा सल्ला:- 

  • मूलभूत आवश्यक तथ्य लपवल्यामुळे आरोग्य विमा संरक्षण रद्द झाल्यास दुःखी होण्यापेक्षा वेळीच सावध होत तुमच्या आरोग्याविषयीची खरी माहिती विमा कंपनीला देणे हिताचे ठरते.
  • त्यासाठी विमा योजनेची माहिती बारकाईने वाचून त्यानुसार आवश्यक माहिती विमा कंपनीला द्यावी. त्यामुळे तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबियांच्या आजारपणात स्वतःच्या खिशावर ताण येऊ देता त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ शकता.  

आरोग्य विम्यावर बोलू काही…

– भास्कर नेरूरकर

हेडहेल्थ  डमिनिस्ट्रेशन टीम

बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.