Reading Time: 3 minutes

मॉडर्न टेक्नॉलजीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, जी-पे, फोन-पे या आधुनिक सुविधा ऑनलाइन पेमेन्ट करणे सोयीस्कर बनवतात. आधीसारखे क्वचितच कोणीतरी  खिशात कॅश घेऊन फिरत असेल असे वाटते. पण या सुविधांचा वापर करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बिल देण्यासाठी सर्रासपणे क्रेडिट कार्डचा वापर सगळीकडे केला जातो, पण हे क्रेडिट कार्ड कुठे आणि कुठल्या कारणांसाठी वापरू नये हे देखील कळणे महत्वाचे आहे. ते कसे हे बघूया.

1.सार्वजनिक ठिकाणी असणारे वाय-फाय :

  • सार्वजनिक ठिकाणी सगळेच फ्री वाय-फाय असेल तर ही सुविधा वापरणे पसंत करतात. 
  • अशा ठिकाणी तुमच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवणे फ्रॉड करणाऱ्यांसाठी सोपे असते.
  • यामुळे तुमच्या मोबईलमधील डेटा चोरला जाऊ शकतो.म्हणून सार्वजनिक ठिकाणी असणारे वाय-फाय वापरण्याचे टाळले पाहिजे.

2.ऑनलाइन खरेदी करताना व्यापारी किंवा व्यवहार करणाऱ्या मालकासंबंधी काही गोष्ट संशयास्पद वाटली असेल तर क्रेडिट कार्ड वापरणे धोक्याचे असू शकते. 

  • जसे फक्त त्याच व्यक्तीकडे कुणी याआधी खरेदी केली नसेल किंवा इतर खरेदी केलेल्या लोकांनी त्याच्याबद्दल मत व्यक्त करताना फ्रॉडसंबंधित काही गोष्टींचा उल्लेख केला असेल असे असल्यास अशा ठिकाणी व्यवहार करताना विचार करावा. 
  • क्रेडिट कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता असू शकते हे ध्यानात ठेवून मगच व्यवहार करावा की नाही हे ठरवले पाहिजे.

क्रेडिट कार्ड घेताय मग हे जाणून घ्या ! 

3. क्रेडिट कार्डचे डिटेल्स शेअर करू नका.

  • क्रेडिट कार्डचा वापर करताना अत्यंत काळजीपूर्वक करायला हवा. बऱ्याचवेळा फ्रॉड करणारी व्यक्ती फोनवरून किंवा समोरासमोर देखील क्रेडिट कार्डचे डिटेल्स मागते.  
  • आपण माहिती देताना, या माहितीचा वापर समोरची व्यक्ती कसा करेल? आपण माहिती देताना कार्ड बद्दल काही अतिमहत्वाची किंवा गोपनीय माहिती तर सांगत नाही ना ? याकडे लक्ष असणे आवश्यक आहे.
  • क्रेडिट कार्डची माहिती अनोळखी व्यक्तीला सांगण्याआधी विचार करून गरज असेल तरच द्या.

4. ऑनलाइन फसवणुक:

  • आजकाल वर्तमानपत्रात अगदी रोजच, एक तरी बातमी ऑनलाइन फसवणुकीची असते.
  • अनेकदा बँकेमधून किंवा इन्शुरेंस कंपनीमधून बोलत आहे असे भासवले जाते आणि माहिती विचारून फसवले जाते. 
  • अशी विचारणा करून पिन नंबर मागून सामान्य लोकांची हजारो – लाखों रुपयांची फसवणूक केली जाते आणि फसवणूक झालेले अनेक लोक आपली तक्रार घेऊन सायबर क्राइम सर्विसेसमधे जातात. 
  • विशेष म्हणजे समाज माध्यमातून वारंवार हे सांगितले जाते की बँकेमधून कधीही क्रेडिट कार्डची किंवा पैशाबद्दल विचारणा करण्यासाठी फोन किंवा एसएमएस केला जात नाही.
  • याबद्दलची अमिताभ बच्चन यांची ” जानकार बनिये , सतर्क रहिये ” ही जाहिरात आपण बघतोच !

5. कर्जाची परतफेड:

  • क्रेडिट कार्ड हे ग्राहकाच्या सोयीसाठी आहे. मात्र बऱ्याचदा याचा  वापर कार्डच्या दिलेल्या लिमिटपेक्षा अधिक केला जातो आणि वेळेत त्या पैशाची परतफेड करणे अशक्य होते. 
  • आपल्या जवळ क्रेडिट कार्ड आहे म्हणून फक्त जास्त खरेदी केली जाते. मात्र त्याच्यासोबत हे पैसे आज ना उद्या आपल्याला परतफेड करायचे आहे हे काही अंशी विसरले जाते. 
  • आणि मग एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे आणि दुसरे कर्ज फेडण्यासाठी तिसरे हे चक्र चालू होते आणि यातून बाहेर पडणे अवघड होऊन बसते.

जाणून घ्या : शेअर बाजार का कोसळला ?

6. क्रेडिट कार्डचे बिलिंग-सायकल:

  • तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलिंग-सायकलच्या तारखेच्या आसपास जास्त खरेदी केली तर ही सवय  देखील तुम्हाला पैसे परतफेड करण्यासाठी कमी कालावधी देतं. 
  • त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना बिलिंग-सायकलकडे देखील लक्ष असणे गरजेचे आहे. 
  • या कालावधीच्या आसपास अतिप्रमाणात जास्त किमतीचे व्यवहार टाळणे आवश्यक आहे.

7. ऑनलाइन व्यवहार करताना संकेतस्थळ प्रोटोकॉल नसेल तर क्रेडिट कार्ड वापरू नका

  • ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना संकेतस्थळबद्दल माहिती करून घ्या. आपण ज्या  संकेतस्थळावर आर्थिक व्यवहार करणार आहे ते संकेतस्थळ हे सुरक्षित आहे का ? 
  • “HTTPS ” हा एक प्रोटोकॉल आहे जो तुम्हाला इंटरनेटवर सुरक्षिततेची खात्री देतो.
  • हा प्रोटोकॉल संकेतस्थळावर आहे का ? याची खात्री करा. 

8. क्रेडिट कार्ड वरून कॅश काढणे :

  • क्रेडिट कार्ड वरून कॅश काढण्यासाठी अतिरिक्त पैसे म्हणजेच व्याज द्यावे लागते तेव्हा आणीबाणीच्या काळातच त्याचा वापर करा अन्यथा क्रेडिट कार्ड न वापरलेले बरे !

9. क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड आणि कॅश बॅक :  

  • केवळ रिवॉर्ड आणि कॅश बॅक मिळवण्याच्या नादात, आपण गरज नसताना काही खरेदी करत आहे का याचा विचार करून बघा.
  • अशावेळी विनाकारण क्रेडिट कार्ड वापरून कर्ज वाढवू देऊ नका.

10. क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय होऊ देऊ नका. 

  • असे म्हंटले जाते की चांगल्या गोष्टीची सवय लवकर लागत नाही मात्र वाईट गोष्टीची सवय लागण्यासाठी वेळ लागत नाही. 
  • तेव्हा क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय होऊ देऊ नका. 
  • छोट्या किंवा कमी किमतीच्या खरेदीसाठी कॅशचा वापर करा. 
  • ज्यामुळे क्रेडिट कार्डच्या महिन्याच्या बिलामधे थोडी थोडी करत जाऊन परतफेड करण्याची रक्कम वाढत जाणार नाही.     

 
#जानकार बनिये , सतर्क रहिये

#क्रेडिट कार्ड

#credit card-billing cycle

#HTTPS

#संकेतस्थळ प्रोटोकॉल

#dont use credit card

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.