Reading Time: 3 minutes

(Black Monday for Share Market)

मागच्याच आठवड्यात निफ्टीने 25000 ला गवसणी घालून 26000 दिशेने जाण्याची तयारी दाखवली आणि सर्वानाच शेअर बाजाराच्या ताकदीची झलक बघायला मिळाली. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर (FII) ची खरेदी उत्साहवर्धक होती.

मात्र अमेरिकेमधल्या मंदीची बातमी, जपानच्या शेअर बाजारातील घसरण, भु-राजकीय तणाव या सगळ्यांचा परिणाम भारतीय बाजारावर पण झाला आणि भारतीय बाजार सोमवारी म्हणजे आज सेंसेक्स थोडे थोडके नाही तर तब्बल 2200 पॉईंट्सने गडगडला. निफ्टी जवळपास 700 पॉईंट्सने घसरला आणि बँक निफ्टीमधे सुद्धा जवळपास 1360 पॉईंट्सने घसरण झाली. या सगळयामधे मात्र गुंतवणूकदारांचे 17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. मिड कॅप इंडेक्स 3% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 4% ने खाली आले. अजूनही ही घसरण सुरूच राहणार आहे असे तज्ञांचे मत आहे.

शेअर मार्केट खाली कोसळण्याचे कारण काय ? हे पुढीलप्रमाणे –

  • अमेरिकेतील मंदी : ( Recession in America)
  • अमेरिकेत मंदीचे ढग जमायला सुरू झाले ते जुलैमधे आलेल्या जॉब डेटामुळे. अमेरिकेत बेरोजगारीचा दर 4.3 % पर्यंत गेला आहे.
  • हा आकडा म्हणजे तीन वर्षामधील उच्चांक मानला जातोय. मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी नोकरी मिळणाऱ्याची संख्या यातला फरक लाखाच्या घरात आहे. 
  • मागच्या वर्षी जुलै महिन्यात जवळपास 2 लाख उमेदवारांना नोकरी मिळाली होती. 
  • मात्र या वर्षीच्या जुलै महिन्यातील आकडा केवळ 1 लाख 10 हजाराच्या आसपास आहे. 
  • हे मंदीचे संकेत असून  यामुळेच अमेरिकेतील शेअर बाजार – डो जोन्स 650 पर्यंत खाली घसरले तर नॅस्डॅक 850 पर्यंत खाली आले.

गुंतवणूक : सोलर क्षेत्रातील गुंतवणूक 

  • जपानचे बाजार घसरले: (Why did Japan’s market fall? )
  • जपानच्या निक्केईमधे 13% घसरण झाली. ही घसरण गेल्या सात महिन्यातील नीचांक पातळी मानली जातेय. 
  • बँक ऑफ जपानने व्याजदारामद्धे वाढ केली, ही वाढ 0.25% पर्यंत वाढवली गेली. त्यामुळे जपानी चलन येनचे डॉलरच्या तुलनेत मूल्य वाढले आणि यामुळे अमेरिकी टेक स्टॉकस् मधे  जोरदार विक्री झाली. 
  • एकीकडे येन चलन मजबूत होत आहे, मात्र याचा परिणाम कॅरी- ट्रेड वर होत आहे.

 

  •   कॅरी- ट्रेड म्हणजे काय आहे ? (Carry Trade)
  • कॅरी- ट्रेड हा कमी व्याजदाराने कर्ज घेण्याचा एक प्रकार आहे. ट्रेडिंग करण्याची एक प्रकारची स्ट्रॅटजी आहे. 
  • कमी व्याजदाराने कर्ज घेऊन हे पैसे जास्त परतावा देणाऱ्या पर्यायामधे गुंतवले जातात. फॉरेक्स ट्रेडिंग मधे लोकप्रिय असलेल्या या प्रकारात व्याजाच्या फरकामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होत असतो.
  • मात्र आता येनचे मूल्य वाढल्याने कर्जाची परतफेड करायला अवघड होईल आणि आधीपेक्षा हा व्यवहार महाग ठरेल आणि नुकसान वाढेल अशी भीती निर्माण झाली. 
  • बँक ऑफ जपानने व्याजदारामधे वाढ केल्यामुळे या कॅरी- ट्रेड वर नकारात्मक परिणाम दिसून आला आणि एकत्रितरित्या याचा परिणाम जपानच्या शेअर बाजाराच्या घसरणीवर झाला.

 

भु-राजकीय तणाव : (Geo-Political Tension)

  • इराण आणि इस्तराईल यांच्या हल्ल्यांमुळे तणाव वाढत आहे. हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येमुळे इस्तराईल हल्ल्याचे संकट वाढले असून ही परिस्थिति अनेक नकारात्मक गोष्टींची सुरुवात असू शकते. 
  • या पार्श्वभूमीवर तेलाचे संकट डोकेवर काढू शकते, तेलाच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात महागाई वाढण्याची चिंता वाढली आहे.या सगळया परिस्थितीचा फटका शेअर बाजाराला बसला आणि परिणामी शेअर बाजारात याचे प्रतिसाद पाहायला मिळाले.

 हे वाचा : ऑप्शन ट्रेडिंगची किक आणि सेबीचा पेपर 

भारतीय शेअर बाजार : (Indian Share Market)

  •  जागतिक पातळीवर घडलेल्या घटनांचे प्रतिसाद भारतीय बाजारात उमटले, असे असले तरी भारतातील शेअर बाजार स्वतः च्या अशा काही कारणामुळे दबावाखाली आहे का ?
  • वर म्हंटल्याप्रमाणे निफ्टीने 25000 ला गवसणी घातली. बाजार रेकॉर्ड वर रेकॉर्ड तोडून उच्चांक पातळीवर स्थिरावत होता मात्र गुंतवणूकदार नफा मिळवण्याचा इच्छेने सेलिंग प्रेशर वाढले तसेच इतर जागतिक नकरात्मकतेची झळ लागून आणखीनच बाजार कोसळले.
  • यासोबतच काही दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल नकारात्मक आल्याने त्याचे पडसाद भारतीय बाजारावर पाहायला मिळाले.
  • गुंतवणूकदारांसाठी संधी ? (Opportunity for Investor)
  • बाजाराची पडझड ही शेअर मार्केटमधे येणाऱ्या चढ-उताराचा भाग आहे. 
  • बाजारात आलेली ही मंदी ,गुंतवणूकदारांसाठी संधी असू शकते का? ओवर वॅल्यू असणारे बरेच शेअरचे मूल्य आता कमी झाले असेल तेव्हा चांगल्या कंपनीचे शेअर विकत घेण्याचे राहिले असेल तर ही एक चांगली संधी असू शकते का ? 
  • म्युच्युअल फंडचे कमी झालेले एनएव्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यासाठी आकर्षक झाले आहेत का ? 
  • वित्तीय सल्लाराच्या मदतीने ,सभोवतालच्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्या. अजून शेअर बाजार खाली येऊ शकतो हे तज्ञाचे मत आहे तेव्हा गुंतवणूक करतांना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करा. 

 

 #Recession in America 

#opportunity for investor

#Indian Share Market

#Carry Trade

#निक्केई

#भारतीय शेअर बाजार

#अमेरिकेतील मंदी

# Black Monday for Share Market

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.