प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घर खरेदी करणे हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो. घर घेताना सर्वात आधी निधीची व्यवस्था करणे महत्वाचे असते आणि गरज पडल्यावर गृहकर्ज घेण्याची तयारी ठेवावी लागते. गृहकर्ज घेताना बँकेची निवड करणे आणि कमी व्याजदरावर कर्ज घेणे आवश्यक असते. काही बँका गृह कर्ज विमा देतात, आपण गृह कर्ज विमा घ्यावा का नाही, याबद्दलची सविस्तर माहिती खालील लेखात देण्यात आली आहे. Home Loan Insurance in Marathi
गृह कर्ज विमा यालाच ‘गृह संरक्षण योजना’ असेही म्हटले जाते. कर्जाच्या कालावधीत कर्जदाराचे निधन झाल्यास कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. कर्जदारानंतर थकीत कर्जाचा बोजा पूर्णपणे कुटुंबियांवर पडणार नाही याची गृहकर्ज विम्यात काळजी येथे घेतली जाते.
आपण गृह कर्ज विम्याची माहिती जाणून घेऊया –
1. विम्याची माहिती समजून घ्या –
- गृहकर्ज विमा हा बँकेच्या नियम आणि अटींना गृहीत धरून असतो. कर्जदाराचा कर्ज परतफेडीच्या कालावधीत दुर्दैवी मृत्यू झाल्यास गृहकर्ज विम्यातून उर्वरित कर्जाची परतफेड केली जाते.
- ही पद्धत सेफ्टी नेट म्हणून काम करते. यामुळे हे निश्चित होते की, कर्ज न भरल्यास गृहकर्ज विम्यामुळे मालमत्तेचे संरक्षण होईल.
2. गृहकर्ज विम्याचा विचार का करावा? –
- जीवनामध्ये मृत्यू कधीही होऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने आपण तयारी करून ठेवायला हवी.
- गृहकर्ज विम्याचा मुख्य उद्देश हा कर्जदाराच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणे हा असतो.
- गृहकर्ज विमा घेतल्यास कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्ज परतफेडीची जोखीम कमी होते.
- गृहकर्ज विम्यामध्ये थकीत कर्जाची रक्कम निकाली काढली जाते, त्यामुळे कर्जदाराच्या कुटुंबाला मालमत्तेची मालकी कायम ठेवता येते.
नक्की वाचा : Home Loan Transfer : गृहकर्जे हस्तांतराविषयी जाणून घ्या सर्वकाही !
आपण गृहकर्ज विमा घेताना खालील घटक विचारात घ्यायला हवेत.
1. प्रीमियमची किंमत –
- गृहकर्ज विमा घेण्यापूर्वी प्रीमियमच्या किंमतीची माहिती घेऊन ठेवावी. गृहकर्ज विमा घेतल्यास कर्जाच्या खर्चात वाढ होत असते.
- बजेटमधील गृहकर्ज विमा शोधण्यासाठी इतर विमा योजनांची तुलना करून पाहावी.
- चालू असलेली जीवन विमा पॉलिसी –
- आपण आधीच जीवन विमा पॉलिसी घेतलेली असल्यास गृहकर्ज विमा पॉलिसी घ्यावी का नाही याचा आढावा घ्यावा.
- आपण जीवन विमा पॉलिसीवर घेतलेले कव्हरेज पुरेसे असल्यास गृहकर्ज विमा खरेदी करताना विचार करावा.
3. पॉलिसीच्या अटी आणि शर्ती –
- गृहकर्ज विमा खरेदी करताना त्यामधील अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचायला हव्यात.
- गृहकर्ज विमा कव्हरेजला अडचणीत आणणाऱ्या किंवा न समजणाऱ्या अटींची पूर्ण माहिती घेऊनच गृहकर्ज विमा खरेदी करावा.
नक्की वाचा : ऑनलाईन कर्ज घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
आपण खालील गोष्टींचा निर्णय माहिती घेऊन ठरवावा –
1. अल्प कर्ज कालावधी –
- अल्प कर्ज कालावधीसाठी गृहकर्ज घेतले असेल तर कर्जबाकी लवकर भरता येते. अशा परिस्थितीत गृह कर्ज विमा घेण्याची गरज नसते.
2. पुरेशी बचत –
- जर पुरेशी बचत असेल तर कर्जदाराच्या निधनानंतर थकीत कर्जाची रक्कम कव्हर करता येते. अशावेळी गृहकर्ज विमा हवा का नको याचा विचार करून निर्णय घ्यावा.
3. आरोग्य स्थिती –
- कर्जदारांना गृह कर्ज घेताना तब्येतीची तपासणी करून घ्यावी. गृहकर्ज घेताना तब्येत व्यवस्थित असल्यास गृहकर्ज विम्याची रक्कम कमी होते.
निष्कर्ष :
- गृहकर्ज विमा घेताना कर्ज अल्प काळासाठी घेत आहेत का दीर्घकाळासाठी घेत आहेत, याची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.
- गृहकर्ज विमा घेतल्यामुळे कर्जदाराच्या पश्चात कुटुंबीयांना अडचणीला सामोरे जावे लागत नाही.