Reading Time: 2 minutes

सध्याच्या काळात इंटरनेटमुळे सर्व गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये कर्ज घेणेही सोपे झाले आहे. आपण इंटरनेटवरून ऑनलाईन कर्ज घेऊ शकता, त्यासाठी घरबसल्या बँकेच्या वेबसाइटवरून आपली माहिती टाकल्यास कर्ज उपलब्ध होऊन जाते. 

आपण कर्ज घेताना काळजी घेणं गरजेचं आहे, याबद्दल दररोजच्या वर्तमानपत्रातून आणि दूरचित्रवाहिनीवरून वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या जातात. आपल्याला झटपट कर्ज मिळते, या होणाऱ्या फायद्यासोबतच भविष्यात तोट्याच्या परिस्थितीलाही सामोरे जावे लागू शकते. या कर्जाचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

आपण ऑनलाईन कर्ज घेताना खालील गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

  1. कर्जाच्या अटी आणि शर्ती समजून घेणे – 
  • कर्जावर किती व्याजदर आहे, परतफेडीची मुदत आणि इतर नियमांबद्दलची माहिती कर्जदाराला असणे आवश्यक आहे. 
  • आपण कर्जफेड उशिरा करणार असाल तर किती व्याजदर भरावा लागेल  किंवा लवकर कर्जफेड करताना कोणत्या प्रकारचे शुल्क किंवा दंड आकारला जातो, याची माहिती ठेवायला हवी. 
  • आपल्याला कर्ज देताना क्रेडिट स्कोअर सर्वात आधी तपासला जातो. 
  • कर्ज घेताना आपल्याला काही गोष्टी न समजल्यास कंपनीच्या ग्राहक सुविधा क्रमांकावर कॉल करून माहिती घ्यायला हवी. 

नक्की वाचा : Credit Score: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?

  1. इतर कर्ज पर्यायांबरोबर तुलना करा – 
  • ऑनलाईन कर्ज देणाऱ्या विविध कंपन्या तयार झाल्यामुळे आपण कोणाकडून कर्ज घ्यावे हा कर्जदाराला सर्वात मोठा प्रश्न पडत असतो. 
  • वेगवेगळ्या कर्ज पर्यायांशी तुलना केल्यावर आपल्याला कोणता कर्ज पर्याय योग्य आहे, हे निवडणे सोपे जाते. त्यामुळे आपल्याला कर्जाची परतफेड करताना इतर समस्यांचा सामना करावा लागत नाही. 
  • जास्तीचे व्याजदर आणि इतर खर्चाची माहिती घेताना कंपनीच्या सेवेबद्दलची माहिती मिळवायला हवी. आपण कंपनीच्या वेबसाइटवरून यासंदर्भातील  माहिती मिळवू शकता. 
  1. कंपनीचे सुरक्षा उपाय तपासून पहा – 
  • आपण डिजिटल माध्यमातून कर्ज घेणार असाल तर आर्थिक आणि वैयक्तिक माहिती कंपनीला द्यावी लागते. 
  • कंपनीकडून वैयक्तिक माहितीची सुरक्षितता राखली जाईल ना याची माहिती घ्या. कर्ज घेताना कंपनीची वेबसाईट सुरक्षित असल्याची खात्री करा. त्यामुळे आपण कंपनीला देणार असलेली माहिती सुरक्षित असल्याची शाश्वती मिळते. 
  • कर्ज घेणाऱ्या कंपनीची गोपनीय धोरण जाणून घ्यावे, त्यामुळे आपली गोपनीय माहिती कुठे वापरली जाईल याची माहिती मिळते. 

नक्की वाचा : अल्पबचत योजनांच्या व्याजदरात मोठी वाढ !

  1. ऑनलाईन कर्जामुळे आपल्या क्रेडिट स्कोअरवर होतो परिणाम – 
  • ऑनलाईन कर्ज घेताना कंपनीकडून क्रेडिट स्कोअर तपासला जातो. ऑनलाईन कर्ज घेतले आणि वेळेवर हप्ते नाही भरले तर  क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे भविष्यात कर्ज घेताना अडचण निर्माण होऊ शकते. 
  • कमी काळात जास्त बँकांमध्ये कर्जाची मागणी केल्यास क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. कर्ज घेताना शक्यतो कर्ज मिळेल तेथेच अर्ज करावा. 

निष्कर्ष – 

  • ऑनलाईन पद्धतीने कर्ज घेणे अतिशय सोपे असून ते जलद  मिळून जाते. पण आपण हे समजून घ्यायला हवे की कर्ज घेणे ही आयुष्यातील अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे. 
  • आपण कर्ज घेताना व्याजदर, सुरक्षा, इतर बँकेंशी तुलना आणि रिपेमेंट बद्दल पूर्ण माहिती घेऊनच ऑनलाईन पद्धतीने कर्ज घ्यावे.
  • डिजिटल पद्धतीने सुरक्षित कर्ज मिळत असल्यास त्याचा फायदा होतो, त्यामाध्यमातून तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टये पूर्ण करू शकता. 
  • आपण शक्यतो परतफेड करू शकता एवढंच कर्ज घ्यावं, त्यामुळे कर्जाच्या हप्त्यांचा भार जाणवत नाही. 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…