Arthasakshar RBI New announcements in Marathi
Reading Time: 2 minutes

आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा

RBI – loan moratorium extension 

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतल्या महत्वाच्या घोषणा :

रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात :

 • बँकेचा रेपो दर आता ४.४% वरून ४% झाला आहे. परिणामी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. 
 • ६ जून रोजी आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे पण त्याआधीच व्याजदर कपात करून सामान्य कर्जदारांना दिलासा दिला गेला आहे.

कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !…

ईएमआय मोराटोरीयम: (RBI –EMI Moratorium)

 • याआधीच मार्च, एप्रिल आणि मे असे ३ महिने ईएमआय मोराटोरीयम जाहीर केला गेला होता. (EMI Moratorium)
 • आजच्या घोषणेनुसार आणखी ३ महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने कर्जदारांची ईएमआय (EMI) मधून सुटका होईल.
 • कर्जाचे परतफेडीसाठी अधिक कालावधी मिळाला असला, तरी व्याज मात्र द्यावे लागणार आहे. 
 • उद्योग व व्यापारी कर्जदारांना मिळत असलेल्या कैश क्रेडिट कर्जाबाबत प्रवर्तकांचे स्वतःचे भांडवल किती असावे याबाबत दिलासा देणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. 
 • एकूण ६ महिने कर्ज मुद्दल व व्याज परतफेड करण्याची सवलत आरबीआयने दिली आहे. यामुळे एखादे कर्ज खाते या सवलतीच्या ६ महिन्याच्या कालावधीत एन.पी.ए. होणार नाही.
 • कर्ज एन.पी.ए. होणे म्हणजे ते कर्ज बँकेसाठी अनुत्पादक मालमत्ता म्हणून गणली जाते. (NPA = Non Performing Asset) कर्जदाराचे कर्जखाते एन.पी.ए. झाले असता त्याच्या सिबिल स्कोअरवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. 

कर्जाच्या हप्त्याला स्थगिती दयावी का?…

इतर महत्वाचे : 

 • करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले आहे. यात अर्थव्यवस्थेसाठी २० लाख कोटींची मदत दिली आहे.
 • आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जीडीपीबाबत चिंता व्यक्त केली आहे. आहे.  संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताचा जीडीपी दर शून्याखाली जाण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. 
 • आगामी काळात महागाई किती वाढेल याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. मात्र यंदा मॉन्सून चांगला होणार असल्याने कृषी क्षेत्राला फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

ईएमआय मोराटोरीयम (RBI -EMI Moratorium), रेपो दरात कपात यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणारे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. 

web search: RBI updates Marathi, RBI News Marathi, Repo Rate Marathi , RBI loan moratorium extension Marathi, RBI aani karjmudat marathi, RbI guidelines Marathi, RBi announcements Marathi

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…