Reading Time: 3 minutes

मालमत्तेवर कर्ज (Property Loan) घेतल्यास त्यावर असणारा व्याजदरही कमीच असतो. हा कर्ज घेण्याचा पर्याय भारतात सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय आहे. सर्व बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या यांच्याकडून कर्ज घेण्याचा पर्याय आपल्याला उपलब्ध असतो.  

तुमची मालकी ही पूर्णतः बांधलेली निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता इतर कोणत्याही कर्जाशिवाय असायला हवी. इतर कर्ज पर्यायांच्या तुलनेत या मालमत्तेवर कर्जाची निवड करणे हा चांगला पर्याय असतो. कमी व्याजदराने (Property Loan Interest Rate) जास्त कर्जाची रक्कम मिळते आणि अशावेळी मालमत्तेचा चांगला फायदा होतो. 

मालमत्तेवर कर्ज घेणे 10 फायदे जाणून घ्या. 

 1. कमी व्याज दर असणे (A Low Interest Rate) – 
 • मालमत्तेवर तारण कर्ज घेणे सुरक्षित असते, अशावेळी बँकांना धोका हा कमी असतो. 
 • बँका मालमत्ता कर्जासाठी कमी व्याजदर देतात. यामुळे कर्जाची लवकर भरायला मदत होते. 
 • आपण वैयक्तिक कर्जासारख्या असुरक्षित कर्जाची निवड करताना बँका अधिक व्याजदर आकारतात. त्यांना कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसते.  
 1. कर्जाची जास्त रक्कम मिळते (More Loan Amount) – 
 • तुम्हाला कर्ज देत असताना मालमत्ता तपासून कर्जाची अंतिम रक्कम ठरवली जाते आणि त्यानंतर बँकेकडून कर्जाची रक्कम मंजूर केली जाते. 
 • विशेषतः आपल्याला मालमत्तेच्या वर्तमान बाजार मूल्याच्या 70% ते 75% कर्जाचे वितरण बँकेकडून केले जाते. कर्ज हे मालमत्ता व्यावसायिक आहे की भाड्याने दिलेली आहे, यानुसार ठरवले जाते. 
 • कर्जातून घेतलेली रक्कम वैयक्तिक आणि व्यावसायिक खर्चासाठी वापरली जाऊ शकते. मालमत्ता तारण ठेवल्यास कर्जाची जास्त रक्कम मिळू शकते. 

नक्की वाचा : गृहकर्ज घेताना तुम्हाला माहितच असावीत अशी १० कलमे

 1. जलद आणि त्रासमुक्त कर्ज प्रक्रिया (Fast and Hassle Free Loan Processing) – 
 • मालमत्तेवर कर्ज मिळवणे ही जलद आणि त्रासमुक्त घडणारी प्रक्रिया आहे. हे कर्ज सुरक्षित कर्ज असून त्यावर क्रेडिट देण्यास बँक लवकर तयार होतात. 
 • स्वतःच्या मालकीची मालमत्ता असल्यास कर्ज घेण्यासाठी बँकेत चौकशी करून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते. 

नक्की वाचा : क्रेडिट स्कोअरशिवाय कर्ज कसं मिळवायचे ? 

 1. सुलभ पात्रता आणि कमी कागदपत्रांची पूर्तता (Easy Eligibility and Less Paperwork Fulfillment) – 
 • मालमत्तेवरील कर्जासाठी पात्रता निकष अतिशय सुलभ असून किमान कागदपत्रांमध्ये मालमत्ता कर्ज सहज पद्धतीने मिळते. 
 • प्रत्येक बँकेनुसार कागदपत्रे आणि पात्रता बदलू शकते. कागदपत्रे आणि पात्रता अटीचे वाचन करून कर्ज जलद घेता येते. 
 1. कर लाभ मिळतात (Tax Benefits Available) – 
 • आपण मालमत्तेवर कर्ज घेतल्यास कर लाभ हा हमखास मिळतो. कर लाभ मिळण्यासाठी त्या कर्जाचा वापर विशिष्ट कारणांसाठीच केलेला असावा लागतो. 
 • कर्जावरील व्याजावर आणि प्रक्रिया शुल्क फीवर व्यवसाय खर्च म्हणून कर लाभ मिळू शकतात. 
 • या कर्जाचा वापर हा शिक्षण, प्रवास, सुट्या, विवाह आणि इतर ठिकाणी केल्यास कर लाभ मिळू शकत नाहीत. 
 1. कर्ज परतफेडीस दीर्घ कालावधी मिळतो (The Loan Repayment Long Period) – 
 • मालमत्तेवर कर्ज घेतल्यास दीर्घ कालावधीत परतफेड करण्याचा पर्याय मिळतो. बँकेशी चर्चा केल्यास हा कालावधी 15 ते 20 वर्षांपर्यंत वाढू शकतो. 
 • क्रेडिट सुविधेचा व्यवहार करताना हे फायदेशीर ठरते कारण योग्य मासिक हप्ते (Monthly Installment) निवडून परतफेड योजना सोपी होते. 
 • आपण मालमत्ता कर्ज घेतल्यास दीर्घ कालावधी आणि कमी व्याजदर मिळतो. वैयक्तिक कर्ज घेतल्यास परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षांपर्यंत मर्यादित असतो. 
 1. तारण मालमत्तेचा वापर चालू ठेवा (Continue to Use the Mortgaged Property) – 
 • आपण मालमत्तेवर कर्ज घेतल्यास तुम्हाला जागा किंवा फ्लॅटचा वापर थांबवण्याची गरज नसते. 
 • परतफेडीच्या अटींचे पालन करून तारण ठेवलेल्या जागेचा वापर करता येतो. 

नक्की वाचा : Education Loan : परदेशी शिकायला जाताय? शैक्षणिक कर्जासाठी या ५ गोष्टींची दक्षता घ्या

 1. कर्जासाठी पात्र ठरण्याची पद्धत (Method of Eligibility for Loan) – 
 • आपण मालमत्तेवरील कर्ज सहज पद्धतीने बँकेकडून घेऊ शकता. बँका या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे मूल्यांकन करत असतात. 
 • मालमत्तेवरील कर्ज घेताना वेगवेगळ्या निकषांचा अभ्यास करणे गरजेचं असते. यासाठी बँकांच्या नियम, अटी आणि कोणती कागदपत्रे हवी आहेत, याचा अभ्यास करणं गरजेच असते. 

   9. प्रीपेमेन्ट शुल्क चार्जेस नसतात (Prepayment Charges are not Charges) – 

 • मालमत्तेवर कर्ज घेतल्यास फोर क्लोजर फी शून्य रुपये लागते. फोरक्लोजर म्हणजे कर्जाची मुदत संपण्याच्या आधी ते कर्ज पूर्ण फेडून टाकणे. 
 • अनेक बँका या फोरक्लोजर फी (Loan Foreclosure Charge) आकारतात पण मालमत्तेवरील कर्ज फेडायचे असल्यास फोरक्लोजर फी लागत नाही. 
 • कर्ज घेताना आणि प्रीपेमेन्ट करताना फोरक्लोजर फी लागेल का नाही याची माहिती मिळवणे गरजेचं असते. अन्यथा फोरक्लोजर फी भरावी लागू शकते. 

नक्की वाचा : वैयक्तिक कर्जाचे प्रीपेमेंट आणि पार्ट पेमेंटचे फायदे

 1. कर्जाच्या अंतिम वापरावर निर्बंध नाहीत (No Restrictions on the End Use of the Loan) – 
 • मालमत्तेवरील कर्ज घेतल्यास खर्च करण्याची मुभा असते. मालमत्ता कर्जातून कमी व्याजदरात दीर्घकाळासाठी कर्जाची रक्कम दिली जाते. 
 • नवीन गृह खरेदी, मालमत्ता खरेदी, लग्नाचा खर्च, परदेशी शिक्षण आणि कर्ज एकत्रीकरण हे खर्च शक्य झाल्यास कर्जाच्या निधीतूनच करावेत. 
 • मालमत्ता कर्ज घेतल्यास हे खर्च सहज पद्धतीने निघू शकतात. तारण ठेवलेल्या मालमत्तेशी तडजोड होणार नाही, सावधपणे कर्ज घेता येईल आणि आरामात कर्ज परतफेड होऊ शकते, असेच कर्ज घेणे गरजेचं असते.
 • त्यामुळे जास्तीत जास्त कर्जदार हे असुरक्षित पर्यायांपेक्षा मालमत्तेवर कर्ज घेण्यास प्राधान्य देतात. वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही कर्जापेक्षा हे कर्ज सुलभ पद्धतीने मिळू शकते. 

निष्कर्ष – 

 • मालमत्तेवर कर्ज घेतल्यास अनेक फायदे मिळू शकतात. हे कर्ज घेताना बँकेच्या व्याजदर आणि परतफेडीच्या कालावधीचा अभ्यास करणे आवश्यक असते. 
 • आपण योग्य अशी बँक निवडावी, बँकेने जास्त कालावधीसाठी कमी व्याजदरात मालमत्ता कर्ज दिल्यास कर्जदाराचा फायदा होऊ शकतो.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…