आरोग्य विम्याचे हप्ते महाग होणार: पॉलिसीधारक अशा पद्धतीने पाहू शकतात प्रिमिअम

Reading Time: 2 minutes

आरोग्य विम्याचे हप्ते महाग होणार?

वर्ष २०१९ मध्ये कोरोना नावाचा आजार आला आणि सर्वांना आरोग्य विम्याचे महत्व पटले. वर्षातून एकदा कुटुंबातील सर्वांचा आरोग्य विमा काढला की रुग्णालयात होणाऱ्या खर्चाची चिंता मिटते. पण कोरोना आजारानंतर आरोग्य विम्याचे नियम बदलले. या आरोग्य विम्याचे आता प्रिमिअम वाढले आहे. त्याचसंदर्भात या लेखामध्ये आपण माहिती समजून घेणार आहोत. 

 • मार्श मार्शर यांच्या सर्वेक्षणात हे लक्षात आले की, २०२२ वर्षात भारतातील वैद्यकीय खर्च १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 • ग्राहक जेव्हा  आरोग्य विमा काढतो तेव्हा सर्वसाधारणपणे तो प्रतिनिधीमार्फतच  काढत असतो. विम्याचा प्रिमिअम हा ८ ते १५ टक्क्यांनी वाढेल असे उद्योग निरीक्षकांनी मत नोंदवले आहे. 

 

प्रीमियम वाढीची ही आहेत कारणे –

 • कोविड १९ हे आरोग्य पॉलिसीच्या प्रिमिअम वाढीचे सर्वात महत्वाचे कारण आहे. कोरोना आजार येण्याच्या आधी पॉलिसी घेतलेल्यांच्या बदल्यात तिच्यावर दावे करणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. पण जेव्हापासून हा आजार आला तेव्हापासून हे दाव्यांचे प्रमाण वाढले आहे.  
 • डॉक्टरांनी ऑपरेशन आणि उपचार घेण्यास सांगितलेल्या रुग्णांनी पॉलिसी घेतल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात दावे दाखल केले होते. त्यामुळे विमा कंपन्यांना अचानक फटका बसायला सुरुवात झाली.
 • विमा कंपन्यांकडे दरवर्षी जसे दावे येतात त्यानुसार त्यांच्या प्रीमियमचा आगामी हप्ता ठरत असतो. कोरोना आजाराच्या काळात ज्यांनी आरोग्य पॉलिसी काढली होती त्या सर्वानी दावे दाखल केले होते. 
 • दर ३ वर्षांनी पॉलिसी काढलेल्याच्या  प्रमाणात किती ग्राहक दावे दाखल होतात त्यानुसार पॉलिसी कंपन्या त्यांचे दर वाढवत असतात. घरामध्ये लहान मुलाचे वय कमी असल्यामुळे त्याला कमी आणि वयोवृद्ध माणसाचे वय जास्त असल्यामुळे त्याला जास्त प्रीमियम लागते. कारण लहान मुलाच्या प्रमाणात वयोवृद्ध व्यक्तीचे आजारी  पाडण्याचे प्रमाण जास्त असते. 

महत्वाचा लेख :कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची ६ महत्वाची कारणे

 

आरोग्य पॉलिसीच्या नूतनीकरणाचा प्रीमियम कसा निवडावा? 

 • आरोग्य पॉलिसीची निवड करताना सहसा जास्त मागणीच्या पॉलिसी आधी तपासून पाहाव्यात. नवीन विमा कंपन्या आणि प्रीमियमची तुलना करून पाहावी. त्यामध्ये प्रामुख्याने सेवा सामान असतील तर तुलनेने स्वस्तातल्या प्रिमिअमची निवड करावी. 
 • ज्या कंपन्यांच्या पॉलिसी लोकप्रिय आहेत आणि त्यांनी प्रिमिअममध्ये वाढ केली नाही अशा कंपन्यांचा शोध घ्यायला हवा. काही कंपन्या त्यांची एखादी सेवा कमी करून दुसरी चालू करतात. पण कधी कधी सेवा वाढवल्यास प्रिमिअम जास्त भरावा लागत असल्याची उदाहरणे आहेत. 

 

मला आरोग्य विमा सेवा पोर्ट करायची आहे ती मी कशी निवडावी?

 • तुम्ही सध्या घेतलेल्या पॉलिसीपेक्षा दुसरी पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर स्वस्त पॉलिसीचे प्रिमिअम आणि वैशिष्टये पाहून घ्यावेत. त्यामध्ये हॉस्पिटल्सचे कॅशलेस नेटवर्क, क्लेम सेटलमेंट रेकॉर्ड, पॉलिसी आणि क्लेम सर्व्हिसिंगसाठी डिजिटल सपोर्टचा समावेश होतो. 
 • नो क्लेम बोनससह पॉलिसी निवडली तर जास्त प्रिमिअम न भरता उच्च विमा रकमेच्या पॉलिसीचा लाभ घेता येतो. वृद्धावस्थेत लोकांचे दावे दाखल करण्याचे प्रमाण जास्त असून त्याप्रमाणात तारुण्य अवस्थेतील व्यक्तींचे दावे कमी दाखल होत आहेत. 

 

नूतनीकरण प्रिमिअम करणे जमत नाही किंवा इतर कंपन्यांकडून तुलनात्मक सेवांचे प्रिमिअम घेऊ शकत नाही, मला हे संरक्षण कवच पण सोडायचे नाही तर माझ्यासाठी काही उपाय आहेत का? 

 • सदर प्रकरणात तुम्हाला कमी लाभासह सेवांचा फायदा मिळू शकतो. तुम्ही अशा काही पॉलिसी निवडू  शकता ज्या तुम्हाला ऐच्छिक ऑफर मध्ये आरोग्य विमा देतात. समजा तुम्ही १५,००० रुपयांच्या किरकोळ वजावटीची पॉलिसी म्हणून निवड केली तर तुमचा प्रीमियम १५-२० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. 
 • तुम्ही एकाच वर्षात पॉलिसीचा प्रीमियम भरण्यापेक्षा तोच जर ३ वर्षाचा एकदम भरला तर तुम्हाला कमी प्रीमियम द्यावा लागतो. ७.५ ते १५ टक्यांनी कमी हा आरोग्य विमा मिळू शकतो. काही उत्पादने भागीदार नेटवर्क (कॅशलेस सुविधा देणाऱ्या रुग्णालय) सवलत मध्ये देतात. 

 

महत्वाचा लेख : आरोग्य विमा नुतनीकरण करताना लक्षात ठेवा या ९ गोष्टी..

 

महाग आहे म्हणून आरोग्य विमा खरेदी करणे टाळणे हे तुमच्या आर्थिक आरोग्याला हानिकारक आहे. प्रीमियम तुमच्या एकट्याचा वाढणार नसून सर्वच लोकांचा वाढणार आहे. थोडेसे पैसे वाचवायचा नादात मोठा वैद्यकीय खर्च नंतर गळ्यात घेऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published.