Reading Time: 2 minutes

भारतामधील आघाडीच्या अनेक स्टार्टअप्सने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, जग लवकरच आर्थिक मंदीकडे जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

आर्थिक मंदी आल्यानंतर दोन समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामध्ये पगारात कपात आणि नोकरी तात्पुरती गमावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे गरजचे झाले आहे. कृपया हे लक्षात घ्या की जरी भविष्यात लवकर आर्थिक मंदी आली नाही तरी बचत केल्यामुळे तुम्हाला अडचणीच्या वेळेला पैसे मदतीला येऊ शकतात. थोडक्यात, काळजी घेतली तर नुकसान मात्र निश्चितच होणार नाही.   

 

आर्थिक मंदी म्हणजे काय?

 • सर्वसाधारणपणे आर्थिक मंदीमध्ये सहा किंवा त्याहून अधिक महिने अर्थव्यवस्थेची आर्थिक घसरण होत असते. 
 •  देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन दोन तिमाहीमध्ये घसरते. त्यामधून  कमी किंवा नकारात्मक आर्थिक वाढीचे परिणाम दिसून येतात. 

 

गुंतवणूक: तेजीमंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी

 

१) मासिक खर्चाच्या बजेटचे पुनर्मूल्यांकन करा.  

 • दर महिन्याला कोणत्या खर्चावर अंकुश ठेवला जाऊ शकतो हे माहित करून घेण्यासाठी तुमच्या बजेटचे मूल्यांकन करायला हवे. 
 • तुम्हाला ज्याची गरज आहे तेच खरेदी करा. बचतीमधील अतिरिक्त खर्च वाचवायचा असेल तर जेनेरिक ब्रॅण्डची उत्पादने खरेदी करायला सुरुवात करा. 

 

२)  तुमच्या बँक खात्यातील बचत वाढवा 

 • जेव्हा तुम्ही अनावश्यक खर्च कमी कराल तेव्हा बचत वाढते. 
 • जेव्हा अतिरिक्त खर्च कमी होतो तेव्हा आपत्कालीन निधीतील रक्कम वाचवली जाते. 

 

३) एसआयपी मध्ये गुंतवणूक करा 

 • तुम्ही जर एसआयपी मध्ये गुंतवणूक करत असाल तर अति उत्तम. या काळात गुंतवणूक करण्याची नामी संधी आहे. 
 • आर्थिक मंदीच्या काळात गुंतवणूक बंद करणे सर्वात मोठी चूक ठरू शकते. या काळात एसआयपी मधील गुंतवणूक चालूच ठेवायला हवी 
 • एसआयपी मध्ये दीर्घकाळ सातत्याने गुंतवणूक करत राहिल्यास दीर्घकाळाने फायदा मिळतो. 

 

४) तुमच्याकडे असणाऱ्या पैशांमधून गुंतवणूक चालू ठेवा 

 • तुमच्याकडे आधीच महागडी वस्तू असताना परत खरेदीचा विचार करू नका. मंदी असताना पैशांची गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. 
 • भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिवास्वप्नांमध्ये रमणे टाळायला हवे. त्यामुळे पैशाची गुंतवणूक थांबते. 

 

आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?

 

५) तुमच्या गुंतवणुकीचे मूल्यांकन करा 

 • भावनिक निर्णय टाळून मंदीच्या काळात गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे असते. बाजारात आणखी वाईट परिस्थिती तयार झाल्यास गुंतवणुकीतून पैसे बाहेर काढण्याचा विचार करावा. 
 • जेव्हा तुम्ही पैशाच्या बाबतीत कोणतेही मोठे निर्णय घेणार असाल तेव्हा विश्वासू आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. 

 

६) तुमच्या रेझ्युममध्ये स्किल अपडेट करा 

 • तुमचा रिझ्युम अपडेट करण्यासाठी युट्युब व्हिडीओ, लिंक्डइन कोर्स आणि तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घ्या. तुमची कौशल्य मुलाखतीच्या वेळी हजारजबाबीपणाने उत्तर देऊन दाखवून द्या. 
 • तुम्ही जी कौशल्य कमावली आहेत ती रेझ्युमसोबत आवर्जून जोडा. तुमचे कौशल्य जेव्हा वाढतात, तेव्हा तुमचे मूल्य वाढून कमाईचे अगणित मार्ग उघडले जातात.  

 

७) अतिरिक्त पैसे कमवण्याच्या मार्गांचा अवलंब करा 

 • नोकरी करत असताना अतिरिक्त उत्पन्न मार्गाचा विचार करणे गरजेचे आहे. ईबुक, ऑनलाईन कोर्स किंवा ब्लॉग बनवण्याचा विचार करून त्याला सुरुवात करा. 
 • ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही अतिरिक्त ज्ञान मिळवले आहे त्यामधून उत्पन्न मिळवण्याच्या मार्गाचा तुम्ही अवलंब करू शकता. यामधून मिळणारी कमाई तुम्ही बचत खात्यात जमा करू शकता. 

 

) ऑनलाईन आणि वैयक्तिक नेट्वर्किंगला प्राधान्य द्या 

 • प्रत्येक महिन्यामध्ये होणाऱ्या नेटवर्किंग कार्यक्रमांना हजेरी लावून तुमची डिजिटल आणि वैयक्तिक नेटवर्किंग वाढवा. तुम्ही तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांशी कौशल्यांसंदर्भात बोलून व्यावसायिक भागीदारीमध्ये काम करू शकता. 
 • जेव्हा तुम्ही अशी कनेक्शन्स तयार करता तेव्हा करिअरच्या नवीन संधी आणि व्यवसायाची अनेक दारे उघडतात. या नेटवर्क मार्फत नवीन कामे आणि व्यवसाय मिळ्वण्यासंदर्भात चर्चा करा. 

 

आर्थिक मंदी येईल म्हणून घाबरु नका, योग्य उपायोजना करून धैर्याने सामोरे जा! 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…