Reading Time: 3 minutes
  • सध्याच्या काळात घर घेणं, चैनीच्या वस्तू घेणं आणि इतरही अनेक गोष्टींसाठी कर्ज घेतलं जातं. कर्जाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. गृह कर्ज, क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज आणि इतरही बरेच कर्जाचे प्रकार आहेत. 
  • बँकेत गेल्यानंतर लगेचच कोणालाही कर्ज दिलं जात नाही. कर्ज घेण्यासाठी बँक विविध प्रकारच्या कागदपत्रांची आणि व्यवहारांची पडताळणी करते. एक विशिष्ट प्रक्रिया कर्ज देण्यासाठी बँकांमध्ये असते आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्जदाराला कर्ज देण्यात येते. 
  • बँकेत कर्ज घेण्यासंदर्भात विचारपूस केली जाते, तेव्हा सी-बील क्रेडिट स्कोर हा शब्द अनेकदा कानावर पडतो. सी-बील हे कर्ज घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. कर्ज घेण्यासाठी सी-बील आणि कर्जदाराचे मागील बँकेचे व्यवहार हे तपासले जातात आणि एक अहवाल तयार केला जातो. 
  • जर हा अहवाल कर्ज देण्याच्या दृष्टीने चांगला असेल तर इतर प्रक्रिया पूर्ण करून कर्ज देण्यात येते. कित्येकांना सी-बील म्हणजे काय ? आणि ते कशा पद्धतीने मोजलं जातं ? याबद्दल माहिती नाही. बँकेत कर्ज घेण्यासाठी गेल्यानंतर बऱ्याचदा वरील गोष्टींची पूर्तता न केल्यामुळे बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करते. आपण या लेखाच्या  माध्यमातून सी-बील स्कोर आणि तो कसा उत्तम ठेवायचा याची माहिती जाणून घेणार आहोत. 

सी-बील स्कोर (Definition of Cibil Score)

  • सी-बील भारतातील बँका तसेच वित्तीय संस्थांकडून सर्वसामान्य व्यक्तींच्या कर्ज तसेच क्रेडिट कार्ड (Credit Card) बद्दल माहिती गोळा करत असते. 
  • ही जमा केलेली माहिती एका क्रेडिट अहवालाच्या स्वरूपात सादर केली जाते ज्याला सी-बील क्रेडिट रिपोर्ट असं म्हणतात. या रिपोर्टच्या आधारावर सी-बील स्कोर ठरवला जातो. व्यक्तीच्या कर्ज विषयक व्यवहारांच्या माहितीच्या आधारावर सी-बील स्कोर बनवला जातो. 
  • कर्ज देताना नेहमी बँका सर्वात पहिले सी-बील स्कोर बद्दल माहिती घेत असतात. सी-बील स्कोर चांगला असल्यास बँकेकडून कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत नाही. सी-बील स्कोर चांगला नसल्यास बँक कर्ज नाकारू शकते किंवा दिल्यास नेहमीपेक्षा जास्त व्याजदर आकारते. सी-बिल स्कोर हा ३०० ते ९०० अशा रेंजमध्ये असतो. ७००च्या पुढचा सी-बील स्कोर कर्ज घेण्यास अत्यंत चांगला असतो. 

 

हे ही वाचा – Credit Card and CIBIL: क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

 

सी-बील स्कोर मोजण्याची पद्धत (How is Your CIBIL Score Calculated)

  • सी-बील स्कोर मोजताना क्रेडिट ब्युरो अनेक महत्वाचे आर्थिक घटक तपासून बघतो आणि नंतर सी-बील स्कोर ठरवला जातो. यामध्ये महत्वाच्या घटकांमध्ये क्रेडिट इतिहासचा समावेश आहे. 
  • क्रेडिटच्या बाबतीत नीट लक्ष दिल्यास सी-बील मेन्टेन करण्यात अडचण येणार नाही. सी-बील स्कोरवर कर्जदाराचा क्रेडिट इतिहास थेट परिणाम करत असतो. 
  • जर मागील काही कर्जाचे हप्ते भरताना चुका झालेल्या असतील तर सी-बील स्कोरवर नकारत्मक परिणाम होतो. क्रेडिट ब्युरोकडे कर्जदाराचे तीन वर्षांचे बँकेचे व्यवहार तपासण्यासाठी गेल्यानंतर दर महिन्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला जातो. यावरून या सर्व गोष्टींवरून सी-बील स्कोर तयार केला जातो. 

सी-बील स्कोरवर थेट परिणाम करणाऱ्या गोष्टी 

1) कर्जाचे हप्ते भरण्याचा इतिहास (Repayment History) –

  • बऱ्याचदा कर्ज घेतल्यानंतर काही अडचण आल्यानंतर कर्जदार एखादा हप्ता बाउंस करतात किंवा वेळेवर भरत नाही. अशावेळी सी-बील स्कोरवर याचा विपरीत परिणाम होतो. 
  • सी-बील स्कोर मोजताना कर्जाचे हप्ते कशा पद्धतीने भरले आहेत याबद्दल माहिती घेतली जाते. जर यामध्ये काही नकारात्मक गोष्टी सापडल्यास सी-बील स्कोरवर याचा थेट परिणाम होतो. 

2) कर्जदारावर सध्या असलेली कर्जे आणि भूतकाळात रिजेक्ट झालेली कर्जे –

  • क्रेडिट ब्युरो(Credit Bureau) क्रेडिट रिपोर्ट बनवताना कर्जदाराची सध्या चालू असलेली कर्जे किंवा भूतकाळात रिजेक्ट झालेली कर्जे याबद्दल माहिती घेतो. 
  • जर भूतकाळात अनेक कर्जे जर रिजेक्ट झालेली असतील तर या गोष्टीचा सी-बील स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो. 

3) कर्ज घेण्यासाठी वारंवार चौकशी( Multiple enquiries) करणे –

  • कधी कधी एकदा बँकेकडे अर्ज करून कर्ज मिळत नाही. अशा वेळेस कर्जदार वारंवार इतरही बँकांमध्ये कर्जासाठी चौकशी करत असतो. 
  • कर्जासाठी वारंवार चौकशी करणे म्हणजे कर्जदार हा अत्यंत गरजूवंत, क्रेडिट हंग्री आहे असा समज बँकेचा होऊ शकतो. याचा सी-बील स्कोरवर चुकीचा परिणाम होत असल्याने कर्ज घेत असताना वारंवार इतर ठिकाणी चौकशी करू नये. 

 

हे ही वाचा – सिबिल (CIBIL) आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

 

4) सुरक्षित कर्जे (Secured loans ) –

  • सुरक्षित कर्ज म्हणजे गृह कर्ज आणि वाहन कर्ज. गृह कर्ज आणि वाहन कर्ज घेतल्यानंतर कर्जाची नियमित फेड केल्यावर सी-बील स्कोरवर चांगला/सकारात्मक परिणाम दिसून येतो. 
  • जरी सी-बील स्कोर कमी असला तरी गृह किंवा वाहन कर्ज घेतल्यानंतर निश्चितच त्यामध्ये फरक पडतो. विशेष म्हणजे हा फरक सी-बील वाढवण्यास मदत करतो. 

5) असुरक्षित कर्जे (Unsecured loans) –

  • वैयक्तिक कर्ज(Personal Loan) किंवा क्रेडिट कर्ज(Credit EMI) हे असुरक्षित कर्ज प्रकारामध्ये मोडते. वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कर्ज ही कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या आधाराशिवाय दिली जातात. त्यामुळे जर चुकूनही या कर्जाचे हप्ते बाउंस झाले तर सी-बील स्कोर हा कमी होतो. 
  • क्रेडिट कार्ड कर्ज हे वारंवार घेतल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम सी-बील स्कोरवर दिसून येतो. 

अशाप्रकारे काळजी घेऊन तुम्ही तुमचा सी-बील स्कोर उत्तम ठेवा आणि विनासायास कर्ज मिळवा.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…