आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?

Reading Time: 3 minutes

आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?

गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे आर्थिक मंदी संदर्भातील वार्ता ऐकायला मिळत आहेत. या मंदीचा सामना कसा करायचा हा सर्वसामान्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे. देशातील आर्थिक मंदी म्हणजे गुंतवणूक आणि मागणीचा कमतरता किंवा त्यामध्ये झालेली घसरण. मग घसरण प्रत्येक क्षेत्रामध्ये असू शकते आणि त्याचा परिणामही प्रत्येक क्षेत्रावर होतो कारण अर्थात अर्थव्यवस्था ही परस्परावलंबनातून कार्य करत असते. 

हे नक्की वाचा: आजची ‘मंदी’ आणि धोरणात्मक बदलांची संधी! 

पेट्रोलपासून अगदी रोजगार क्षेत्रालाही याची झळ बसते आहे. ही घसरण किती काळापर्यंत राहील हे निश्चित सांगता येत नाही पण अशा काळात सामान्यांनी काय करावे म्हणजे मंदीची कमीत कमी झळ व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला बसेल ही विचार करण्याची गोष्ट आहे. आर्थिक मंदीला सामोरे जाणे अपरिहार्य आहे पण आता आपली भूमिका की असेल आर्थिक निर्णय घेतला कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडे बोलूया. 

मंदी किंवा कोणतेही आर्थिक संकट माणसाला घाबरवून टाकते. आणि इथेच सर्वात मोठी चूक होते, भीतीपोटी किंवा भावनाविवश होईन घेतलेले निर्णय मोठं धोका देऊ शकतात. म्हणून सर्वात मोठी साधना म्हणजे कोणतेही निर्णय घेताना सावधपणे आणि सर्व बाजूनी विचार करावा. शांत डोक्याने निर्णय घेण्याची कला प्रत्येकाने प्रत्येकाची अवगत करायला हवीच, पण आपल्या वाटचालीची दिशा नेमकी काय असावी हे समजणे आवश्यक आहे. पुढील काही मुद्दे तुम्हाला गाईडलाईन म्हणून उपयोगी ठरतील.

आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?

१. बचत- 

 • थेंबे थेंबे तळे साचण्याची गोष्ट तुम्ही आचरणात आणली नसेल तर आता आणायलाच हवी हा असा काळ आहे जेव्हा देशात ‘लिक्विड म्हणजे रोख पैशाची टंचाई भासते. त्यामुळे तुमच्या कडे असणारा रोख पैसा ५ रुपयांच्या ठोकळ्या पासून ते २०० आणि २००० नोटेपर्यंत प्रत्येक रुपया सांभाळून वापरण्याची गरज आहे.
 • तुमच्याकडे केव्हा टंचाई डोकावेल हे सांगता येत नाही म्हणून तुमच्या कडे असणारे रोख रुपये खूप सांभाळून खर्च करा. 
 • गरज नसेल तर ५०० एवजी १०० रुपयांचेच पेट्रोल गाडीत भरा, दिवाळीत ५ ऐवजी २ ड्रेस खरेदी करा, आठवड्यातून ३ वेळा बाहेर जेवायला जात असाल तर १ वेळच जा, घराचा २००० चा किरणा १५०० वर येतो का हे पहा, असे करून प्रत्येक खर्च जर थोडं थोडं कमी करता आला तर तुम्हाला मोठी बचत करता येईल आणी हा पैसा अडचणीला किंवा पुढील काळात वापरता येईल. 

२. नोकरी सांभाळा- 

 • अर्थव्यवस्था डबघाईला आली की ‘कोस्ट कटिंग’ची तलवार नोकरदारांच्या माने वरून फिरते. नोकऱ्या कमी करण्याचे आदेश वरून येतात आणि लोकं बेरोजगार होतात म्हणून तुमची नोकरी जाणार नाही याची काळजी घ्या. 
 • सोफ्टस्किल किंवा नव्या तंत्रज्ञाचा आधार घ्या आणि नोकरी टिकवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नवशिके किंवा नोकऱ्या बदलण्याच्या विचारात असाल तर थांबा! ही योग्य वेळ नाही. बाजारात खूप अस्थिरता असते तेव्हा हातात असणारी नोकरी स्थिर टिकवण शहाणपणाचं आहे.

३. गुंतवणूक थांबवू नका- 

 • तुम्ही शेयर मार्केट, पीएफ, एसआयपी अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल, त्यातील कोणतीही गुंतवणूक सध्याचे खर्च तसेच ठेवण्यासाठी आपल्या यादीतून कमी करण्याचा विचार करू नका.
 • कारण आर्थिक मंदी पुढे किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सुरवातीलाच गुंतवणुकीतून काढता पाय घेणे पुढील काळात मोठ्या संकटांना आमंत्रण देण्या सारखे आहे. 
 • या काळात आर्थिक चणचण भासत असल्याने नवीन गुंतवणूक किंवा बचत सुरु करणे शक्य नसते. परंतु आहे ती गुंतवणून तरी कमी करू नये.

४. एसआयपी (SIP)गुंतवणूक: एक संधी-

 • तुम्ही जर एसआयपी गुंतवणूक करत असाल तर अभिनंदन! तुमच्याकडे एक नामी संधी आहे. 
 • इक्विटी फंड मध्ये केलेली गुंतवणूक जर तुम्ही मंदीमध्ये बंद केलीत, तर ती सर्वात मोठी चूक ठरेल. 
 • इक्विटी गुंतवणुकीच्या मूलतत्वानुसार, अनेक चढउतार पाहून जी गुंतवणूक अविरत आणि अखंड असते तिला सर्वात जास्त फायदा मिळतो. किमती कमी असतानाच गुंतवणूकदार जास्त कमवू शकतात. दीर्घकाळ आणि संयमी गुंतवणूक येथे खूप फायदेशीर आहे.

५. रिअल इस्टेट आणि तत्सम मालमत्ता: 

 • या काळात स्वस्त झालेले  व्याजदर व कर्जाच्या अनेक योजना तुम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा!
 • या काळात बँका आणि वित्त संस्था गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहेत. घरांच्या किमती घटल्या आहेत. यापुढे घराच्या किमती फार कमी किंवा जास्त होण्याची शक्यता कमी आहे. जर तुम्हाला राहतं घर घ्यायचं असेल तर विचार करायला हरकत नाही. राहत्या घरासाठी सरकारतर्फेप्रधानमंत्री आवास योजनेसारख्या’ योजना राबविल्या जात आहेत, त्याचाही लाभ घेता येईल. पण रिअल इस्टेटकडे गुंतवणूक म्हणून बघताना मात्र थोडा विचार करणं हितावह आहे. 

६. सोने आणि इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक-

 • थेट सोन्याची खरेदी सध्या खूप महागात पडणारी आहे. पण त्या ऐवजी तुम्ही सुवर्णरोख्यांचा पर्याय विचारात घेऊ शकता. गोल्ड बॉण्ड सध्या गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे आणि त्याबरोबर तुम्ही इक्विटी फंडाचा विचारही करू शकता. 

संबंधित लेख: बँक मनी, जनधन योजना आणि भारतीय अर्थव्यवस्था

आर्थिक मंदीचा सामना करणे हे आव्हान असले, तरी या आव्हानाला सामोरे जाण्यावाचून आपल्यासमोर इतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे हे आव्हान स्वीकारून त्यामधून मार्गक्रमण करणे हेच यावरचे उत्तर आहे. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Recession in Marathi, Recession Marathi Mahiti, Recession Marathi Mahiti 

Click to rate this post!
[Total: 6 Average: 4.2]