आर्थिक परिस्थिती Financial Health
https://bit.ly/2SEDwGB
Reading Time: 3 minutes

Financial Health: आर्थिक परिस्थिती

सध्याच्या ‘कोरोना’ नावाच्या अनपेक्षित संकटाने जवळपास सर्वांचेच आर्थिक नियोजन कोलमडले आहे. आयुष्य जगण्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं काय असेल तर तो पैसा.  कितीही नाकारलं तरी सत्य हेच आहे. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग मात्र आणता येत नाही. अर्थात याचा अर्थ सतत पैशाच्या मागे धावायचं असा नक्कीच होत नाही. परंतु आपली आर्थिक परिस्थिती (Financial Health) समजून घेऊन त्यानुसार आपल्या उत्पन्नाचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. आजच्या लेखात आपली ‘आर्थिक परिस्थिती कशी तपासायची’ याबद्दल माहिती घेऊया. 

उत्पनाचे नियोजन /आर्थिक नियोजन करण्यापूर्वी

  • सध्याची जी अभूतपूर्व परिस्थिती आहे ती सावरून सर्व पूर्ववत व्हायला किती कालावधी लागेल हे काही सांगता येत नाही. 
  • या परिस्थितीत जवळपास सर्वानाच नव्याने आर्थिक नियोजन करावे लागत आहे. परंतु, आता मात्र खूप गांभीर्याने आपल्या आर्थिक नियोजनाचा विचार करावा लागणार आहे. 
  • आर्थिक नियोजन करताना सर्वप्रथम आपली सद्यस्थिती समजून त्याप्रमाणे नियोजन करण्यातच शहाणपण आहे. 
  • अचानक बाजारात लस येईल आणि जादूची काडी फिरवून सर्व पूर्ववत करेल, या भ्रमात राहू नका.  
  • आपली सध्याची आर्थिक परिस्थिती तपासून त्यानुसार आर्थिक नियोजन करा. 

Financial Health: आपली आर्थिक परिस्थिती कशी तपासायची ?

सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणात आपली आर्थिक परिस्थिती कशी तपासायची? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. वास्तविक पाहता कोठेही आर्थिक नियोजन करण्यापूर्वी आपण आपली आर्थिक परिस्थिती समजून घेणं आवश्यक असतं. आपण आपल्या परिस्थितीचा संबध ट्रॅफिक सिग्नलशी जोडून काही उदाहरणांच्या साहाय्याने आपल्या आर्थिक परिस्थितीची सत्यता समजून घ्यायचा प्रयत्न करू.  

हिरवा रंग (Green Signal) –

आपली आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा आणि वेळ आहे का? 

उदाहरण क्र. १

  • रमेश एक हुशार मुलगा कॅपसमधून एक गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली आणि महिन्याला ५०,००० रुपये हातात येऊ लागले. सुरुवातीला नोकरीमध्ये फारसा ताणही नव्हता.
  • त्याचे आई वडीलही सरकारी नोकरीमधून निवृत्त होऊन एक आरामदायी आयुष्य जगत आहेत. रमेशवर सध्या कोणाचीही जबाबदारी नसल्यामुळे आयुष्यभराचे आर्थिक नियोजन करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ आणि पैसा आहे.

तात्पर्य: जेव्हा आपल्याकडे पैसे आणि वेळ दोन्ही असतो तेव्हा आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण नसते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणाऱ्या आणि आपल्या आर्थिक नियोजनाप्रती जागरूक असणाऱ्या तरुणांसाठी ही गोष्ट सहज शक्य आहे.

उदाहरण क्र. २

  • रमेशचा भाऊ सुरेशही त्याच्यासारखाच हुशार. प्रोफेसरची नोकरी, बँकेत नोकरी करणारी  बायको आणि दोन गोंडस मुली.
  • प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी तारेवरची कसरत सांभाळून आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना थोड्याफार अडचणी येत होत्या. पण त्यावर मात करून सुरेश त्याचे आर्थिक नियोजन यशस्वीपणे करत होता.
  • लग्नापूर्वीच त्याने काही आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण  केलेल्या असल्यामुळे उर्वरित जबाबदाऱ्यांच्या पूर्ततेसाठी त्याच्याकडे बराच वेळ होता. 
  • सद्य परिस्थितीमध्ये त्याने योग्य प्रकारे नियोजन केले करून अनावश्यक खर्चावरही नियंत्रण ठेवले होते. 

तात्पर्य: आपली परिस्थिती सध्या काहीही असली तरीही आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याच्या दृष्टीने उत्तम प्रयत्न करण्यासाठी आपण या हिरव्या स्थितीत जाण्याची योजना आखली पाहिजे. सध्या या स्थितीत असणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी या स्थितीत येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचीसंख्या मात्र जास्त असू शकेल. 

पिवळा रंग (Yellow Signal) – 

तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे परंतु कमी वेळ आहे किंवा, आपल्याकडे हातात जास्त वेळ आहे परंतु पैसे कमी आहेत.

उदाहरण क्र. १

  • आकाश एक हुशार आर्किटेक्ट. ग्रॅज्युएट होण्यापूर्वीच स्वतंत्र व्यवसाय करायचा हे त्याने पक्के ठरवले होते. पण आकाश मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. त्यामुळे स्वतंत्र व्यवसाय करताना  आवश्यक असणारा आर्थिक पाठिंबा किंवा आर्थिक आधार त्याला नव्हता.
  • आकाशने बँकेचे कर्ज काढून स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. व्यवसायात हळूहळू चांगला जम बसू लागला होता. पण सध्यस्थितीत त्याचा व्यवसाय जवळपास ठप्प झाल्यातच जमा होता.
  • व्यवसाय म्हटला की अनिश्चितता असतेच. त्यामुळे जम बसेपर्यंत तरी जोखीम असतेच.  याची जाणीव आकाशला असल्यामुळे तो भरपूर मेहनत करत होता.
  • सद्यस्थितीत कर्जाचे हप्ते  व इतर व्यवसायिक खर्च जरी असले तरी आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आकाशाच्या हातात भरपूर वेळ. पण पैसा मात्र कमी आहे. त्यामुळे त्याला पर्यायी उत्पन्न शोधणे आवश्यक आहे.

आर्थिक जबाबदाऱ्यांचा पूर्ततेसाठी त्वरित पावले उचलून अथवा आपले उत्पन्न वाढवून व आपला खर्च कमी करून, उत्कृष्ट स्थितीवर म्हणजेच हिरव्या रंगावर जाता येणे सहज शक्य असते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अगदीच उत्तम नसली तरी, धोकादायक निश्चितच नाही. 

उदाहरण २:

  • महेशराव म्हणजे  एक सेवानिवृत्त सरकारी अधिकारी. निवृत्तीनंतर  प्रॉव्हिडंट फ़ंड, ग्रॅज्युइटी आणि कम्यूटेड पेन्शन या सर्वांचे मिळून लाखो रुपये हातात आले.
  • आता त्यांना आपल्या काही गृहकर्जातून मोकळं व्हायचं होतं. घराचे रिनोव्हेशन करायचे होते. मुलाला अमेरिकेला पाठविण्यासाठी घेतलेले शेक्षणिक कर्ज फेडण्यासाठी मुलाला मदत करायची होती. 
  • आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करून उर्वरित जमापुंजीतून त्यांना आपली काही स्वप्न पूर्ण करायची होती. गावामध्ये छोटंसं फार्महाउस घ्यायचे होते, वर्ल्ड टूर करायची होती.
  • अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे त्यांनी सध्या आपल्या आर्थिक स्वप्नांना अल्पविराम द्यायचा ठरविला. 
  • आयुष्याची साठी आलेल्या महेशरावांकडे त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ तसा कमी होता. 

तात्पर्य: एकाच वेळी आपली सर्व उद्दिष्टे साध्य करणे कठीण काम वाटू शकते. या परिस्थितींमध्ये  आपल्याला निवड करावी लागेल.जबाबदाऱ्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो . 

लाल रंग (Red Signal )-  

उदाहरण क्र. १

  • सध्याच्या संकटंटमुळे समीर समोर एक मोठं संकट उभं राहिलं होतं. त्याच्या कंपनीची हालत आधीच खराब होती त्यात लॉडाऊनमुळे ती अजूनच बिघडली.
  • अनियमित  पगार व नोकरीमधील अनिश्चितता शिवाय गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज व वाहन कर्जाचे हप्ते हे सारे खर्च आवासून उभे होते.
  • कोणत्याही परिस्थितीत त्याला नवीन नोकरी मिळविणे आवश्यक होते.
  • या परिस्थितीत समीरच्या पत्नीने एका कोव्हीड सेंटरमध्ये जेवणाचे डबे द्यायचे काम मिळविले व आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला. 

तात्पर्य: जेव्हा आपल्याकडे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण  करण्यासाठी कमी पैसे असतील तेव्हा आपण लाल स्थितीत असू शकता. आपल्याकडे सध्या बरीच दायित्वे आणि  कमी बचत असल्यास ही परिस्थिती येऊ शकते. सुयोग्य नियोजन व पर्यायी उत्पन्न आपल्याला नेहमीच आपली आर्थिक स्थिती सुरक्षित आणि स्थिर करण्यास आणि लाल स्थानावरून पिवळ्या रंगावर येण्यास मदत करते. 

वरील सर्व उदाहरणे ही प्रतीकात्मक असली तरी आपली आर्थिक परिस्थिती समजून घ्यायला मदत करतील. आता यावरून आर्थिक नियोजनाच्या रस्त्यावर तुमच्या गाडीसमोर नक्की कोणता सिंग्नल आहे हे तुमचं तुम्हीच ठरवू शकता. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.