Reading Time: 2 minutes

डेबिट कार्ड बाबत सर्व काही पार्ट 1 मध्ये  डेबिट कार्ड म्हणजे काय आणि त्याचे प्रकार पहिले. डेबिट कार्डचा वापर कसा आणि कुठल्या व्यवहारासाठी केला जातो, कशाप्रकारे केला जातो हे बघितले. 

कोणते डेबिट कार्ड निवडले असता त्याचा पुरेपूर वापर आपल्याला करता येईल, याची माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरली असेल. 

आता आपण या लेखातून डेबिट कार्ड वापराचे फायदे आणि काही महत्वाचे मुद्दे याबद्दल जाणून घेऊया. 

डेबिट कार्ड वापराचे फायदे

(benefit of debit card in marathi)

1. प्लास्टिक मनी

  • डेबिट कार्ड च्या वापरामुळे अतिरिक्त रोख पैसे जवळ बाळगणे कमी झाले.
  • जास्त पैसे घेऊन फिरण्याचा धोका कमी झाला.

2. सुरक्षितता

  • डेबिट कार्ड साठी वापरण्यात येणारा पिन हा वैयक्तिक असल्यामुळे कार्डधारकांमध्ये  सुरक्षिततेची भावना वाढली. 
  • डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास कार्ड ब्लॉक करता येते, त्यामुळे होणार संभाव्य धोका टाळू शकतो. 

3. पैसे काढण्याची सुविधा: (cash withdrawal)

  • गरजेच्या वेळेस हवे तेव्हा ATM मधून पैसे काढण्याची सुविधा डेबिट कार्ड मुळे मिळते. 
  • प्रत्येक वेळी बँकेमध्ये जाऊन पैसे काढण्याची गरज नाही.

4. ऑनलाइन खरेदी  :

  • डेबिट कार्डमुळे घरी बसून ऑनलाईन खरेदी करायची असल्यास तुम्ही सहजपणे व्यवहार करून त्याचे पेमेंट करू शकता.
  • ऑनलाईन व्यवहार करताना कार्ड च्या सुरक्षिततेचे नियम पाळून व्यवहार केला जातो आणि तुमच्या बँकेच्या बचत खात्यातून ठराविक रक्कम वजा होते. 

5. रिवॉर्ड पॉइंट :(reward points)

  • डेबिट कार्डचा वापर करून व्यवहाराचे पेमेन्ट झाल्यानंतर रिवॉर्ड पॉइंट दिले जातात. 
  • या रिवॉर्ड पॉइंट चा तुम्ही भविष्यात करणाऱ्या व्यवहारासाठी उपयोग करू शकतात  किंवा डेबिट कार्ड मध्ये असणाऱ्या पर्यायाचा वापर करून रिडिम करू शकतात. 

6. कार्ड लिमिट: (card limit)

  • प्रत्येक कार्ड वर किमान खर्चासाठी मर्यादा दिली असते, यालाच कार्ड ची लिमिट म्हटले जाते,म्हणजे तुम्ही ठराविक रक्कम पर्यंत व्यवहार करू शकता. 
  • डेबिट कार्डच्या प्रकारानुसार ही लिमिट वेगळी असते.
  • कार्ड धारक डेबिट कार्ड चा वापर योग्य प्रकारे करत असेल तर त्याला कार्ड ची लिमिट वाढवून देण्यात येते. 

 

7. EMI सुविधा : (EMI facility)

  • डेबिट कार्ड वर एखादी मोठी खरेदी केली असल्यास तुम्हाला पेमेन्ट करण्यासाठी  ईएमआय चा पर्याय उपलब्ध होतो. 
  • बऱ्याच ठिकाणी शून्य टक्के व्याज दराने ईएमआय ची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. 
  • सहाजिकच ही सुविधा कार्ड धारकांसाठी उपयोगी ठरते. 

 

हे ही  वाचा : डेबिट कार्ड बाबत सर्व काही ! पार्ट – 1 !

 

 

डेबिट कार्ड वापरताना घ्यावयाची काळजी (Important points for using debit card in marathi)

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे माणूस चांगल्या गोष्टी आत्मसात करून त्याचा फायदा करून घेऊ लागला. या नवनवीन वस्तू वापरताना काही महत्वाच्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे ठरते. 

 

  • PIN -पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर

बँकेने दिलेला पिन नंबर हा वैयक्तिक नंबर असतो,या पिन नंबरची गोपनीयता पाळणे गरजेचे असते. 

पिन नंबर हा डेबिट कार्ड च्या सुरक्षिततेसाठी असतो,या शिवाय कोणतेही व्यवहार केले जाऊ शकत नाही.  

  • CVV  नंबर : (cvv number) :

CVV म्हणजे कार्ड वेरिफिकेशन व्हॅल्यू नंबर हा डेबिट कार्ड च्या मागिल बाजूस असतो. 

या नंबर चा उपयोग करून तुमच्या कार्ड वरून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे CVV नंबर देखील वैयक्तिक नंबर असल्यामुळे याच्या गोपनीयतेची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

काही महत्वाचं

  • डेबिट कार्ड द्वारे ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी व्यवहाराचे पेमेन्ट  करताना पासवर्ड 3 वेळा चुकीचा टाकला गेला तर बँक डेबिट कार्ड ब्लॉक करते म्हणजे त्या कार्डवरून तुम्ही कुठलाही व्यवहार करू शकत नाही. 
  • अशा वेळेस तुम्हाला बँकेच्या  कस्टमर केअर ला कॉल करून तुमची ओळख पटवून दिल्यावर च कार्ड साठी पिन नंबर पाठवला जातो आणि कार्ड सुरु करण्यात येते.
  • डेबिट कार्ड धारकांच्या आर्थिक व्यवहाराच्या सुरक्षिततेसाठी बँकांनी ही सुविधा दिली आहे. 
  • डेबिट कार्ड हरवले तरीही तुम्ही कस्टमर केअर ला कॉल करून याची माहिती देऊन कार्ड ब्लॉक करू शकता,अशा वेळी बँक कार्ड धारकाला सशुल्क नवीन डेबिट कार्ड देते. 

 

निष्कर्ष : 

डेबिट कार्ड चा पुरेपूर आणि योग्य प्रकारे उपयोग केला तर बँकेने दिलेली ही  सुविधा नक्कीच लाभदायक आहे. 

आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत जागरूक राहून डेबिट कार्ड चा वापर करणे हिताचे ठरते.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.