Reading Time: 2 minutes

गेल्या दशकात रोख पैसे वापरण्यासोबतच कॅशलेस कार्ड म्हणजे एटीएम, डेबिट कार्ड चा वापर होऊ लागला. तेव्हा पाकिटात डेबिट कार्ड असणं आणि त्याचा वापर करणं म्हणजे नाकापेक्षा मोती जड  वाटत असावं. एटीएम मशीन मधून पैसे काढणे इथपर्यंत मर्यादित असणारे कार्ड हळूहळू विविध प्रकारच्या व्यवहारामध्ये वापरण्यात येऊ लागलं आणि त्यानंतर कॅशलेस कार्ड म्हणजे सर्वांच्या पाकिटातलं पैशाचं झाडच झालं. (Debit card marathi information)

  • आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारची अनेक डेबिट कार्ड आपल्याला पाहायला मिळतात.
  • पैशाचे व्यवहार करताना कोणता प्लॅटफॉर्म वापरला गेला आहे यावरून डेबिट कार्ड चे प्रकार ठरतात. 

आज आपण या लेखातून डेबिट कार्ड चे प्रकार आणि तुम्ही निवडलेल्या डेबिट कार्डचा पुरेपूर वापर होतोय का याबद्दल माहिती घेऊया. 

डेबिट कार्ड

  • तुमचे बचत खाते ज्या बँकेत आहे ती बँक तुम्हाला डेबिट कार्ड देते. कार्ड स्वाईप केल्यानंतर तुमच्या अकाउंट मधून ठराविक रक्कम डेबिट होते.
  • डेबिट कार्डची सेवा दिल्याबद्दल बँक वार्षिक शुल्क आकारते तसेच एटीएम मधून पैसे काढण्यासाठी देखील मर्यादा असतात.

 

  • डेबिट कार्डचा वापर करण्यासाठी बँक पिन नंबर पुरवते ज्याचा वापर करून तुम्ही व्यवहार करू शकता. 
हे ही वाचा : Credit Card vs Debit Card: क्रेडिट कार्ड वि. डेबिट कार्ड, कोणत्या कार्डचा उपयोग कधी कराल?

डेबिट कार्ड चे प्रकार : (types of debit card)

वीसा डेबिट कार्ड : (visa debit card )

  • विसा डेबिट कार्ड हे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जागतिक स्तरावर विसा पेमेंन्ट प्लॅटफॉर्म सोबत ज्या बँकांचा करार आहे अशा बँक विसा डेबिट कार्ड ची सेवा देतात.

 

  • कुठलेही ऑनलाइन व्यवहार झाल्यावर पैसे देताना विसा पेमेंन्ट प्लॅटफॉर्म सुरक्षिततेची पडताळणी करते. 
  • यामध्ये ही विसा सिल्वर,गोल्ड,प्लॅटिनम,सिग्नेचर, एन हान्स असे प्रकार आहेत. 

मास्टर कार्ड : (mastercard )

  • मास्टर कार्ड हे जागतिक स्तरावर मान्यता असणारे सर्वात लोकप्रिय डेबिट कार्ड आहे. बचत खाते आणि चालू खाते दोघांशीही हे कार्ड संलग्न होऊ शकते. 
  • या मध्ये वर्ल्ड डेबिट,स्टॅंडर्ड, एन हान्स असे प्रकार आहेत. 
  • ग्राहकांना उत्तम सुविधा आणि विविध फायदे ,रिवॉर्ड्स मास्टर कार्ड तर्फे दिली जातात. 

रूपे डेबिट कार्ड : (Rupay debit card)

  • रुपे डेबिट कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बाजारात आणले. 
  • रुपये डेबिट कार्डचा उपयोग करून तुम्ही खरेदी करणे, घरगुती बिल भरणे इत्यादी गोष्टींसाठी वापर करू शकता.  
  • छोट्या गावांमध्ये  डेबिट कार्डचा वापर वाढणे आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील कार्डचा वापर करून दैनंदिन जीवनातील व्यवहार सुरळीत पार पडणे यासाठी हे डेबिट कार्ड उपयुक्त आहे.
  • भारतातील अनेक बँक रुपे डेबिट कार्ड शी संलग्न असल्यामुळे  नागरिकांना हे कार्ड वापरणे  सोयीस्कर आहे. 
  • यामध्ये क्लासिक,प्लॅटिनम, प्रधानमंत्री जन-धन योजना  डेबिट कार्ड, किसान कार्ड, मुद्रा कार्ड असे प्रकार आहेत. 

काँटॅक्टलेस  डेबिट कार्ड : (contactless debit card )

  • या प्रकारच्या डेबिट कार्ड मध्ये कार्ड स्वाईप न करता व्यवहार केला जातो. 
  • रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि निअर फिल्ड कम्युनिकेशन या तत्त्वावर  कॉन्टॅक्ट लिस्ट डेबिट कार्ड काम करते.यासाठी वायफाय असणे गरजेचे असते.

वीसा इलेक्ट्रॉन डेबिट कार्ड: (visa electron debit card)

  • वीसा इलेक्ट्रॉन डेबिट कार्ड हे वीसा डेबिट कार्ड सारखेच असते मात्र यामध्ये जास्तीची  रक्कम खर्च करण्यासाठी पर्याय नसतो,यालाच आपण ओवरड्राफ्ट म्हणतात. 
  • पैसे काढण्यासाठी तुम्ही डोमेस्टिक किंवा आंतरराष्ट्रीय ATM मशीनचा वापर करू शकता .
  • सिंडिकेट बँक,बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या काही बँकांद्वारे वीसा इलेक्ट्रॉन डेबिट कार्ड देण्यात येते. 
  • वीसा इलेक्ट्रॉन डेबिट कार्ड जरी विसा डेबिट कार्ड सारखे असले तरी काही देशामध्यें वापरू शकत नाही,  उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया,कॅनडा ,अमेरिका आणि इरलँड. 

मास्ट्रो डेबिट कार्ड : (maestro debit card)

  • मास्ट्रो डेबिट कार्ड हे मास्टर डेबिट कार्ड सारखेच जागतिक स्तरावर वापरले जाते.
  • या कार्ड चा वापर करून तुम्ही ATM मधून पैसे काढणे,ऑनलाईन व्यवहार करणे ,बील चे पैसे भरणे इत्यादी सुविधा वापरू शकतात. 
महत्वाचे : एटीएम कार्ड हरवले? त्वरित करा हे ६ उपाय

पुढील भागात डेबिट कार्ड चे फायदे आणि तोटे तसेच महत्वाचे काही मुद्दे बघूया . 

निष्कर्ष :

  • गरजेपेक्षा जास्त पैसे पाकिटात सांभाळण्या पेक्षा डेबिट कार्ड बाळगणे केव्हा ही  सोयीस्कर ठरते. 
  • दिलेल्या सर्व प्रकारापैकी कुठले डेबिट कार्ड वापरले जाईल त्यानुसार पर्याय निवडावा.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.