Reading Time: 3 minutes

तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने ती पद्धतशीरपणे करून दिली तर तुम्हाला कसे वाटेल?  सुयोग्य गुंतवणूक करण्याचे काम आर्थिक सल्लागार करत असतो. गुंतवणुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक योग्य मार्ग आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली जाते. 

 

म्युच्युअल फंडाची गुंतवणूक शेअर्स, बॉण्ड्स आणि इतर ठिकाणी केली जाते. गुंतवणुकीची जास्त माहिती आणि ज्ञान नसलेल्यांसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे.  म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही आर्थिक सल्लागाराकडून केली जाते. गुंतवणूकदाराच्या आर्थिक क्षमतेनुसार योग्य परतावा मिळवून देण्याचे काम आर्थिक सल्लागाराचे असते. 

 

आर्थिक सल्लागार म्हणजे काय? What is mean Financial Advisor? 

आर्थिक सल्लागार म्हणजे जो गुंतवणूकदाराची आर्थिक परिस्थिती समजून घेऊन गुंतवणुकीची उद्दिष्टये सांगतो आणि त्याच्या गरजा पूर्ण करणारा पोर्टपोलिओ तयार करून सर्वोत्तम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. 

 

आर्थिक सल्लागार हा योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असतो. म्युच्युअल फंडात काम केल्याचा आर्थिक सल्लागाराला अनुभव असतो आणि गुंतवणुकीच्या वेळेस शेअर बाजाराचा त्याने योग्य प्रकारे अभ्यासही केलेला असतो. 

 

गुंतवणुकीबाबतची प्रत्येक माहिती आर्थिक सल्लागाराने गुंतवणूकदाराला देणे आवश्यक असते. ते त्याचे नैतिक कर्तव्यच असते. आर्थिक गुंतवणूकदाराने खालील भूमिका बजावणे आवश्यक असते. 

 

म्युच्युअल फंड सल्लागाराची कामे – 

१. गुंतवणूकदाराच्या आर्थिक गरजा ओळखणे – 

  • गुंतवणूकदाराचे आर्थिक ध्येय आणि गरजा ओळखणे हे आर्थिक सल्लागाराचे पहिले काम असते. 
  • किती काळासाठी आणि कोणत्या पर्यायात गुंतवणूक करायची आहे याची माहिती मिळवण्यासाठी आर्थिक सल्लागाराने गुंतवणूकदाराशी चर्चा करणे गरजेचे असते. 

 

२. गुंतवणूकदारांना आर्थिक शिक्षण देणे – 

  • गुंतवणूकदारासाठी आर्थिक बाजारात योग्य असलेल्या योजनांची माहिती आर्थिक सल्लागाराने द्यायला हवी. 
  • आर्थिक सल्लागाराने गुंतवणूक करण्याच्या आधी गुंतवणूकदाराशी चर्चा करायला हवी. संबंधित गुंतवणुकीतील जोखीम आणि ती स्वीकारण्याची तयारी याबाबत चर्चा होणे गरजेचे असते. 

 

३. गुंतवणूकदारांना जोखमीबद्दल माहिती देणे – 

  • आर्थिक सल्लागाराला हे माहित असायला हवे की गुंतवणूकदाराची गुंतवणूक करत असताना कितपत जोखीम स्वीकारण्याची तयारी आहे. 
  • त्याप्रमाणे तो गुंतवणुकीचे पर्याय गुंतवणूकदाराला सांगू शकतो. 

 

४. विविध गुंतवणूक पर्यायांची माहिती देणे – 

  • म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. 
  • गुंतवणूकदाराच्या जोखीम स्विकारण्याच्या पर्यायावरून आर्थिक सल्लागार त्याला गुंतवणूक करण्यासंदर्भातील माहिती देऊ शकतो.

 

नक्की वाचा : आर्थिक नियोजनासाठी सल्लागाराची खरच गरज असते का? 

 

आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी? –

आर्थिक सल्लागाराची निवड त्याचा गुंतवणूक क्षेत्रातील अनुभव आणि अभ्यास पाहूनच करावी. खाली दिलेल्या मुद्यांमधून आर्थिक सल्लागार कसा निवडावा याबद्दलची माहिती आपणास मिळू शकते. 

 

१.  विषयाचे ज्ञान –

  • म्युच्युअल फंड मॅनेजरला गुंतवणूक क्षेत्रातील अनुभव असला की त्याच्याकडे जाणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाण जास्त असते. त्याच प्रमाणे आर्थिक सल्लागारालाही हा नियम लागू होतो. 
  • शेअर बाजारातील एखाद्या मंदीचा अनुभव आर्थिक सल्लागाराला कोणतीही परिस्थिती त्याला योग्य प्रकारे हाताळता येते. 

 

२. उद्दिष्ट आणि जोखीम मधील अंतर कमी करणे –

  • म्युच्युअल फंड सल्लागाराने सर्वात प्रथम गुंतवणूकदाराच्या परिस्थितीची माहिती घ्यायला हवी. 
  • आर्थिक माहितीच्या व्यतिरिक्त आर्थिक उद्दिष्टये, जोखीम स्वीकारण्याची तयारी, आर्थिक वचनबद्धता याचीही माहिती ठेवायला हवी. 
  • एक प्रभावी फंड सल्लागार हा गुंतवणूकदाराला विश्लेषणाच्या मदतीने माहिती समजावून सांगत असतो. 

 

३. गुंतवणुकीचे नियोजन –

  • आर्थिक सल्लागाराने गुंतवणूकदाराच्या गरजा सर्वात आधी लक्षात घ्यायला हव्यात. त्यानंतर बाजाराचा अभ्यास करून पोर्टफोलिओ तयार करावा. 
  • आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी पोर्टफोलिओ मध्ये वैविध्य असायला हवे, त्याबद्दलची माहिती आर्थिक सल्लागाराने देणे अपेक्षित असते. 

 

४. योग्य निर्णय –

  • गुंतवणूकदाराच्या छोट्या तपशिलावरही आर्थिक सल्लागाराने लक्ष द्यायला हवे. 
  • पोर्टफ़ोलिओचा सातत्याने आर्थिक सल्लागाराने अभ्यास करत राहायला हवा. योग्य दिशेने त्याची वाटचाल होत नसल्यास गुंतवणूकदाराशी बोलून पोर्टफोलिओ मध्ये बदल करावेत. 

 

५. पात्र, कुशल आणि व्यावसायिक सल्लागार –

 

६. जोखीम आणि धोके ओळखणे – 

  • आर्थिक गुंतवणूक करत असताना त्यामधील धोके ओळखणे सर्वात महत्वाचे असते. 
  • पोर्टफोलिओ अपडेट करत असताना आर्थिक सल्लागाराने जोखीम कमी करून जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा. 

 

७. सोयीसुविधा आणि उपलब्धता –

  • आर्थिक सल्लागारने सर्वात प्रथम गुंतवणूकदाराचे आर्थिक ध्येय समजून घ्यावे आणि त्यानंतर योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा. 
  • कोणताही आर्थिक निर्णय घेण्याच्या आधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच घ्यावा. 
  • आर्थिक सल्लागाराने गुंतवणूकदाराशी कायम संपर्कात राहावे, त्यामुळे आर्थिक ध्येय साध्य होण्यास मदत मिळते. 

 

८. पोर्टफ़ोलिओचे योग्य नियोजन करणे – 

  • गुंतवणूकदाराच्या वर्तमानातील आर्थिक उद्दिष्ठावर आधारित आर्थिक सल्लागार योग्य प्रकारे पोर्टफ़ोलिओचे नियोजन करू शकतो. 
  • सावधगिरी बाळगूनच योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी आणि चांगला परतावा गुंतवणूकदाराला मिळवून द्यावा. 

 

निष्कर्ष – 

  • आर्थिक सल्लागार हा पोर्टफ़ोलिओचे व्यवस्थित नियोजन करून म्युच्युअल फंडात गुंतवणूकदाराची गुंतवणूक करत असतो. योग्य आर्थिक सल्लागार कोण आहे हे निवडण्याचा सर्वस्वी निर्णय गुंतवणूकदाराचा असतो. 
  • आर्थिक कार्यपद्धती, मुक्त संवाद आणि चांगला अनुभव हे गुण आर्थिक सल्लागाराकडे असणे आवश्यक आहे. 

नक्की वाचा : मी श्रीमंत कसा होऊ?

Share this article on :
1 comment
  1. मला साक्षर बनायचे आहे मी गेली 20वर्षे एक्विटी होल्ड केली आहे
    23स्टॉक आहेत
    मी ब्लिंडली investments करीत आलो आता सिकून investment करायची आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…