“व्हॅलेंटाईन विक”मागचं खरं अर्थकारण

Reading Time: 3 minutes

“आय लव यु शोना! आय लव यु बेबी.. सी वॉट आय गॉट फॉर यु!” ओह वाव!! इट्स ए ब्युटीफुल गिफ्ट!”

व्हॅलेंटाईन्स डे वीक सुरू झालाय. आठवडाभर प्रेमी जोडप्यांच्या प्रेमसागराला उधाण सुरू झालंय. हे असले गोग्गोड संवाद आजूबाजूला ऐकायला मिळू शकतात.

व्हॅलेन्टाईन्स डे आता १४ फेब्रुवारीलाच एन्जॉय केला जात नाही तर ‘राजे व्हॅलेन्टाईन’ १४ फेब्रुवारीला अवतरण्यापूर्वी त्यांच्या हाताखलील इतर मंत्रिमंडळ टेडी बिअर, किस डे, रोझ डे आणि आणखी ‘काय काय दे’ आठवडाभर आल्यावर, झाल्यावर संत व्हॅलेन्टाईन्स डे अवतरतात.

 • कोणत्याही जागरूक व्यक्तीला हे स्पष्टपणे कळतं की या सर्व ‘डेज’चं  योग्यप्रकारे बाजारीकरण केलं गेलंय. यामुळे या आठवड्यात होणारी बाजारातील उलाढाल बघता नात्याची वीण आता इतकी पातळ आणि वरवरची झाली आहे की फक्त गिफ्ट्स आणि डेजच्या माध्यमातूनच ती झिरझिरीत वीण अस्तित्वात राहतेय असं जाणवतं.
 • प्रेम, नातं यातील खोली संपून प्रत्येक गोष्ट उथळ पातळीवर, ‘सुपरफिशियल’ पातळीवरच सुरू होतेय आणि तिथेच संपतेय. वरवरच्या आवरणाने सुरू होऊन एकेकाळी प्रेम भावना मनात खोल जायच्या. आता भावनांचा आवेग जोरदार येतो आणि वरवर सांडून, ओसंडून वाहून वरूनच विरून जातो. आत मनात काही झिरपतच नाही. असा पाऊस काहीही उपयोगाचा नसतो जो फक्त बरसतो आणि जमिनीत खोल न झिरपता  गटारात वाहून जातो.
 • यामुळे नात्याची खोली, प्रेम, निस्वार्थी नातं कमी होत नष्ट होत चाललंय. जेव्हा भावना कमी असतात तेव्हा नात्यातील जवळीक दाखवायला गिफ्ट्स आणि इतर भौतिक गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. पर्यायी नातं आणि व्यक्ती दोघेही भडक, लाऊड होतात. यामुळेच व्हॅलेन्टाईन्स डे वीकमधील इतर डेजचं पेव फुटलंय.
 • पूर्वी फक्त व्हॅलेन्टाईन्स डे असायचा. त्याचंच जास्त प्रस्थ असायचं. पुढे सोशल मीडिया क्रांती झाली आणि डेजचं पेव फुटलं. पद्धतशीरपणे दिवसांचं बाजारीकरण करण्यात आलं.
 • काही वर्षांपूर्वी नवरात्रात स्त्रियांनी आठ रंगाच्या आठ साड्या परिधान करणं म्हणजे देवीची उपासना करणं, हे एका वर्तमानपत्राद्वारे सुनियोजितरित्या मार्केटिंग करून मनावर बिंबवलं गेलं. आता नवरात्रीत स्त्रिया सामाजिक स्टेटसच्या दबावाखाली त्या त्या रंगाचे साड्या, ड्रेसेस परिधान करतातच. ती आता जणू परंपरा झाली आहे. प्रत्येक दिवसांसाठी खास त्या त्या रंगाचे कपडे विकत घेतात. यामुळे बाजारात मोठी उलाढाल होते. या सर्व मार्केटिंग स्ट्रेटजिज असतात.
 • व्हॅलेन्टाईन्स डे – विकचे सर्व दिवस असेच सोशल मीडियाद्वारे मनावर बिंबविले गेले आहेत. सोशल मीडियावर सातही दिवस पोस्टींचा, फोटोजचा पाऊस पडतो. व्यापारीगण त्यांची सोशल मीडियाची क्रिएटिव्ह टीम आपण पेरलेल्या बियांचा वृक्ष आणि मग त्याचं जंगल होताना गंमतीने बघत राहते.
 • पूर्वी ग्रीटिंग कार्ड्सच्या गॅलरीज असायच्या. व्हॅलेन्टाईन्स डेच्या आदल्या दिवशी त्यातून गिफ्ट घेतानासुद्धा मुलं मुली संकोच करत. आता आठवितील मुलं मुलीसुद्धा रोज डेला, चॉकलेट डेला भरभरून चॉकलेट्स, गुलाबांच्या कळ्या विकत घेतात, भेट देतात. डेटिंग करतात. एखादी क्षुल्लक  घटना घडते आणि “इट्स नॉट वर्किंग एनीमोर, लेट्स कॉल इट ऑफ” म्हणून ‘ब्रेक अप’ करतात. कारण भावभावना या अगदीच उथळ आणि गिफ्ट्सचं देवाणघेवाण याच्या अवतीभवतीच फिरत आहेत.
 • त्यामुळे नात्यांचं तुटणे अगदी सर्रास बाब झाली आहे. यासाठी नक्कीच आजचा वेगवान काळसुद्धा कारणीभूत आहे. मानसिक शांती ढळतेय पर्यायी नाती जास्त उथळ झाली आहेत. तो उथळपणा गिफ्ट्स देऊन, रस्त्यावर प्रेम प्रकट करून जाहीर केला जातो.
 • सोशल मीडियामुळे घरबसल्या ‘लॉग इन’ करताना एका क्षणाला शेकडो लोक मानसिकरित्या घरात घुसतात. नळातुन येणारा प्रवाहाचा साठा तितकाच आहे पण ‘नळाच्या आउटलेट्स’ आता वाढल्या आहेत. कारण एकावेळी अनेकांसोबत मानसिकरित्या कनेक्ट होणं. अनेकांसोबत नातं निर्माण केलं जातं.
 • कदाचित आपोआप होऊन जातंय. कारण एकंदरच संपूर्ण भावभावना खोल न जाता वरच्या पातळीवर येऊन थांबल्या आहेत. कशावरच चिंतन मनन केलं जात नाही. कदाचित मानसिकरित्या हवी असलेली शांतीच सध्या ढळल्यामुळे चिंतन मनन केलं जात नाही आणि मग हे एक दुष्टचक्र तयार होतं. फक्त प्रवाहात व्यक्ती वाहू लागते.
 • याशिवाय आज मुलामुलींमध्ये एक मानसिकता दिसते की कॉलेजमध्ये, जॉब करताना श्रीमंत मुलासोबत अफेअर करायचं. त्या काळात मजामस्ती करायची किंवा हव्या त्या मुलासोबत किंवा मुलीसोबत नातं करून एन्जॉय करावं. पण लग्न मात्र श्रीमंत मुलगा किंवा मुलगी बघून करावं.
 • “जिंदगी मिले ना दोबारा” मध्ये रितिक रोशन म्हणतो की अगर लडकी के बापके पास हजार करोड है तो एंटरटेनमेंट के लिये बिवीकी क्या जरूरत है?”

एकंदर हीच मानसिकता आजच्या पिढीचीच नव्हे तर आजच्या काळातील साऱ्याच पिढ्यांची झाली आहे. नात्याची भावनिक, आध्यात्मिक पातळी संपून फक्त भौतिक पातळी उरली आहे. कदाचित हा काळच तसा आहे. प्रत्येक गोष्ट अर्थकारणावरच सुरू होऊन अर्थकारणावरच येऊन संपते.

(चित्रसौजन्य:https://bit.ly/2X1zGIn )

आमचे इतर काही महत्वपूर्ण लेख:

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन २०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…,

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प – भाग १,    २०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग २,

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प भाग ३

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *