Technical Indicator
Reading Time: 3 minutes

Technical Indicator

शेअर बाजारात आपणास अनेक प्रकारचे वेगवेगळे इंडिकेटर (Technical Indicator) दिसून येतात. टेक्निकल एनालिसीसमध्ये ते महत्वपूर्ण भूमिका निभावतात, याच्या साहाय्याने एखादया शेअरची हालचाल व पातळी आपणास चार्टमध्ये  दिसून येते.

टेक्निकल इंडिकेटर ((Technical Indicator)

  • टेक्निकल इंडिकेटर हे टेक्निकल ॲनालेसिसमधील अत्यंत प्रभावी शस्र आहे कारण इंडिकेटरच्या सहाय्याने बाजारातील शेअरमधील ओव्हर ब्रॉट किंवा ओव्हरसोल्ड पातळी आपणास समजते. त्यामुळे योग्य वेळी खरेदीविक्रीचा निर्णय घेण्यासाठी यांचा खूप चांगला उपयोग होतो.
  • टेक्निकल इंडिकेटरमुळे कॅन्डलस्टिक पॅटर्न व चार्ट पॅटर्न यांना अचूक दिशा मिळते. आज बाजारात १०० पेक्षा अधिक इंडिकेटर उपलब्ध आहेत. त्यापैकी महत्वाचे काही इंडिकेटर खालीलप्रमाणे –
    • एम ए सी डी 
    • बोळींजर बँड 
    • आरएसआय
    • एडीेक्स 
    • मुव्हीग एव्हरेज 
    • स्टोकेस्टिक
  • आज आपण स्टोकेस्टिक व आर एस आय या दोन इंडिकेटरची सविस्तर माहिती, तसेच त्याचा ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेन्टमध्ये स्टेटजीनुसार कसा वापर करतात ते पाहूयात.

 स्टोकेस्टिक (stochastic) 

  • स्टोकेस्टिक  हा महत्वाचा इंडीकेटर असून त्यास जॉर्ज लेन यांनी सन १९५० मध्ये तयार केला. 
  • आज  शेअर बाजारातील डीरिव्हेटिव्ह, कमोडिटी, फॉरेक्स या सर्व सेगमेंटमध्ये याचा उपयोग केला जातो. 
  • डे ट्रेडिंग, शॉर्ट टर्म , लॉन्ग टर्म, या सर्व माध्यमात तो वापरला जातो. यात शेअर मधील ओव्हर बॉट, ओव्हर सोल्ड किंमत दिसते. 
  • स्टोकेस्टिक हे एक मोव्हमेटीयम ऑस्कीलेटर आहे. ते शेअर मधील किंमतीची हालचाल दाखवते. आकृतीत खाली दाखविल्या प्रमाणे हा ० ते १०० च्या मध्य दिसून येतो. यात दोन लाइन असतात त्यांच्या क्रोस ओवरच्या सहायाने, आपण खरेदी, विक्री करु शकतो. 
  • पहिली असते % K  लाईन  तिला फास्ट लाईन म्हटले जाते. ही आपणास हिरव्या रंगात दिसून येते व तेजी प्रदर्शित करते. दुसरी % D लाइन असून तिला स्लो लाइन् म्हटले जाते ही लाल रंगात असून मंदी दाखवते. % D लाइन हि % K लाइनचा मूव्हिंग एव्हरेज असते.

स्टॉकेस्टिकचे स्वरूप: 

  • हे इंडिकेटर आपणास ० ते  १०० या रेंजमध्ये दिसते. यांच्या वर खाली कधी जात नाही, याला तीन स्तर असतात- २०,५०,८०.  
  • ५० ते१०० मध्ये हा तेजी दाखवितो, ५० पासून खाली ० पर्यत मंदी दाखवतो, कोणत्याही शेअरच्या चार्टमध्ये जर हा ८० च्यावर असेल तर त्यात खूप तेजी झालेली आहे असे दिसते. यानंतर पुढे मंदी येणार असा अंदाज आपण करु शकतो. २० च्या खाली असेल तर खुप मंदी झाली असून पुढे लवकरच तेजी येणार असे दिसते.

शेअरमध्ये खरेदी विक्री करताना वापरता येणारी स्ट्रॅटेजी:

  • जेव्हा शेअरमध्ये स्टॉकेस्टिक हा २० च्या आसपास % K लाइन ही  % D लाईन ला खालून वर क्रॉस ओवर करते तेव्हा आपण खरेदी करावी. 
  • जोपर्यत % K लाइन, % D लाइनच्या वर असते तोपर्यत शेअरमध्ये अप ट्रेंड दिसतो. % K लाइन ८० च्या स्तरावरून खाली % D लाईनला क्रॉस ओव्हर करते तेव्हा आपण विक्री करून खूप नफा मिळवू शकतो.

आर एस आय. RSI (Relative strength index ) 

  • आर एस आय हे सर्वात जास्त प्रमाणात वापरला जाणारा शेअर बाजारातील महत्चाचे इंडिकेटर आहे. 
  • संशोधक जे व्हिलर वायडर यांनी सन १९७८ साली हा इंडिकेटर तयार केला.
  • आर एस आय कोणत्याही शेअरमधील मोव्हमेंट दाखवतो, शेअरचा ओव्हरबॉट ओव्हर सॉल्ड दाखवतो.

 

आर एस आय चे स्वरूप

  • हा इंडिकेटर ० ते १०० मध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसत असून शेअरचा बाजारभाव आरएसआय ५० ते ८० मध्ये असेल तर हा बुलिश झोन मध्ये असतो. 
  • जेव्हा ८० च्या पुढे जातो तेव्हा शेअरमध्ये ओव्हर बॉट होऊन पुढे शेअरची किंमत खाली येऊ शकते.  
  • २० च्या खाली असेल तर शेअर मध्ये खूप मंदी होऊन ओव्हर सॉल्ड होऊन पुढे तेजी येणार असे संकेत देतो.
  • डे व स्विंग ट्रेडिंग साठी.मासिक  व आठवड्याच्या चार्ट मध्ये जर आरएसआय ७० च्या वर असेल आणि डे मध्ये १५ मिनिट कॅन्डलमध्ये  जेव्हा आरएसआय ५० च्यावर सपोर्ट घेते तेव्हा त्या कॅन्डलच्या उच्च किमतीला आपण खरेदी करू शकतो. सपोर्ट घेतलेल्या कॅन्डलच्या लो प्राईजला स्टोप लॉस ठेऊन आपण तोटा कमी व फायदा जास्त मिळवू शकतो.

शरद गोडांबे

9657980309

[email protected]

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…