Reading Time: 2 minutes

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. नवीन करप्रणाली मध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यानंतर लगेचच जुनी करप्रणाली आणि नवीन करप्रणाली यामध्ये तुलना सुरू झाली. 

कोणती कर प्रणाली अधिक लाभदायी याचा अभ्यास सुरू झाला. (Income Tax changes Budget in Marathi)

आज आपण सोप्या भाषेत अर्थसंकल्पा मधील दोन्ही कर रचना जाणून घेऊया –  (Income Tax calculation) 

  • अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅब बद्दल घोषणा करण्यात आली, त्यानुसार किमान करपात्र मर्यादा 3 लाख करण्यात आली आहे तर 7 लाखांपर्यंत चे उत्पन्न करमुक्त होणार आहे. 
  • जुन्या करप्रणालीनुसार किमान करपात्र मर्यादा कनिष्ठ गट अडीच लाख रुपये, ज्येष्ठ गट तीन लाख व अति जेष्ठ गट पाच लाख रुपये अशी होती. मात्र नव्या करप्रणाली नुसार सर्वांसाठी किमान करपात्र मर्यादा 3 लाख होणार आहे. 
  • नवीन कररचना : (Income Tax Slab FY 2023-24 )
  • खाली दिलेल्या तक्त्यामुळे तुम्हाला वार्षिक उत्पन्न आणि कर आकारणी समजायला अधिक सोपे होईल. 
वार्षिक उत्पन्न 3  लाख पर्यंत 0 (शून्य कर) 
वार्षिक उत्पन्न 3  तें  6 लाख पर्यंत 5%
वार्षिक उत्पन्न 6 तें  9 लाख पर्यंत       10%
वार्षिक उत्पन्न 9 तें 12 लाख पर्यंत       15%
वार्षिक उत्पन्न 12 तें 15 लाख पर्यंत       20%
वार्षिक उत्पन्न 15 लाख पेक्षा जास्त       30%
  • सध्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असेल तर या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. 
  • वार्षिक उत्पन्न 2.50 ते 5 लाख रुपये असेल तर  5 टक्के म्हणजे 12,500 रुपये कर भरावा लागतो.
  • 87A अंतर्गत 12,500 रुपयांची कर सवलत मिळते , करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाही.
  • नव्या करप्रणाली मध्ये करदात्याला 50,000 प्रमाणित कर वजावट मिळणार आहे. 
  • जुन्या कर व्यवस्थेनुसार वार्षिक उत्पन्न , 5 लाख रुपये ते 10 लाख रुपये दरम्यान असेल.तर  त्यावर 20% कर द्यावा लागेल. मात्र नवीन कर व्यवस्थेनुसार यासाठीच तुम्हाला 15% कर द्यावा लागेल. 

हे ही  वाचा : केंद्रीय अर्थसंकल्प 2023 महत्वपूर्ण तरतुदी

  • पर्याय निवडीचे स्वातंत्र्य : (Income Tax Changes)
  • सरकारने जुनी आणि नवीन करप्रणाली निवडण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना दिले आहे. 
  • जुन्या करप्रणालीत कर सवलत आणि कर वजावट या सुविधेचा लाभ घेऊन करबचत  होऊ शकते. 
  • नागरिकांना जुनी कर प्रणाली नुसार कर भरावयाचा असेल तर त्यांना त्याप्रमाणे आधी सूचना देणे गरजेचे असेल, तसे न केल्यास नव्या कर प्रणाली प्रमाणे कररचना गृहीत धरली जाईल. 

 

  • लीव्ह एनकॅशमेंट : (leave encashment in marathi)
  • नव्या कर प्रणालीत रजेच्या सुट्ट्या एनकॅश करताना मिळणाऱ्या रकमेची कर सवलतीची मर्यादा 3 लाखावरून 25 लाख करण्यात आली आहे. 
  • राज्य  आणि केंद्र कर्मचाऱ्यांना रजें च्या सुट्ट्यामधून जी रक्कम मिळते ती करमुक्त असते. 
  • मात्र खाजगी कंपनीत काम करणाऱ्या नोकरदाराना रक्कम 3 लाख पर्यंत असेल तर कर भरावा लागत नव्हता, ही मर्यादा आता 25 लाख करण्यात आली आहे.
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना : (Senior citizen saving scheme budget 2023)
  • वय वर्षे 60 पेक्षा अधिक असणाऱ्या जेष्ठ नागरीकांना नियमित ठराविक रक्कम मिळावी या हेतूने ज्येष्ठ नागरिक बचत योजना सुरु करण्यात आली होती. 
  • या अंतर्गत कमाल मर्यादा 15 लाख वरून 30 लाख रुपये करण्यात येणार आहे.   

नक्की वाचा – बजेट २०२३-२४ – अर्थमंत्र्यांची हातचलाखी 

  • महिला सन्मान बचत योजना
    • नवीन करप्रणालीत महिलांसाठी खास महिला सन्मान बचत योजना अंतर्गत 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये गुंतवणूक करता येणार आहे. 
    • यासाठी 7.5 % व्याज दर निश्चित करण्यात आला आहे.

निष्कर्ष

  • नवीन कर प्रणाली मध्ये आकारण्यात आलेले कर दर हे जुन्या कर प्रणाली पेक्षा कमी आहेत. 
  • जुन्या कर प्रणाली मध्ये कुठलेही बदल केले नाही. 
  • करदात्यांनी कररचनेतील सर्व गोष्टी चा बारकाईने अभ्यास करून करप्रणाली ठरवावी.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Family Budget: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

Reading Time: 3 minutesपहिल्याच दिवशी जे व्यायामशाळेत अति व्यायाम करतात ते आठवड्याहुन जास्त व्यायामशाळेचा उंबरठा ओलांडत नाही. आपल्या वैयक्तिक, घरघुती अंदाजपत्रकाचंही तसंच आहे. खूप डोकं लावून जटिल, किचकट बजेट तयार केलं तर ते पाळल्या जाणार नाही. सुरवातीचा उत्साह नव्याचा नऊ दिवस म्हणून उडून जाईल. यामुळे साधा सरळ अर्थसंकल्प तयार करणेच योग्य असतं. असा अर्थसंकल्प पाळणेही सोपी असतं.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 महत्वपूर्ण तरतुदी

Reading Time: 4 minutesअर्थसंकल्प म्हणजे नवीन वर्षाच्या काळात सरकारच्या तिजोरीत प्रामुख्याने कररूपाने पडणारी भर आणि…

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesविवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:

२०१९ च्या अर्थसंकल्पातील ३० महत्वपूर्ण घोषणा

Reading Time: 3 minutesदरवर्षी दिसणाऱ्या लाल सुटकेस मधून दिमाखात आगमन  करणारा अर्थसंकल्प यावर्षी पहिल्यांदाच लाल कपड्यात गुंडाळलेला होता. या अर्थसंकल्पात ग्रामीण भाग, गरीब जनता, सामान्य करदाते, परकीय गुंतवणूक, डिजिटलायझेशन अशा मुद्द्यांवर भर देण्यात आला असून, सर्वसामान्य करदात्यांवरचा कराचा बोजा कमी करून श्रीमंत करदात्यांना अधिक कर आकारण्यात येणार आहे. याद्वारे सामाजिक असमतोल सुधारण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आला आहे.