इन्कम टॅक्स ई-व्हेरिफिकेशन आता झाले सोपे

0 1,292

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

आत्तापर्यंत आयकर रिटर्न भरल्यानंतर ते व्हेरिफाय करण्यासाठी ITR-V हा फॉर्म म्हणजे ITR फाईल केल्यावर आयकर विभागाच्या साईटवर तयार होणारी पोहोचपावती (acknowledgement) डाऊनलोड करावी लागत असे. नंतर सदर पावती सही करून सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर म्हणजे सी.पी.सी. बेंगलोरला पाठवावा लागत असे. नाही म्हटलं, तरी ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ होती. आता मात्र ही प्रकिया त्वरित पूर्ण होईल अशी काळजी आयकर विभागाकडून घेण्यात आलेली आहे.

नेटबॅंकिग, मोबाईल-बँकिंग, किंवा इतर ऑनलाईन व्यवहारांमध्ये व्हेरिफिकेशनसाठी जसा मोबाईलवर एक वन टाईम पासवर्ड, अर्थात ओ.टी.पी. पाठवला जातो, तशीच ओ.टी.पी. यंत्रणा आता आयकर रिटर्न व्हेरिफिकेशनसाठीही वापरली जाणार आहे. त्यामुळे, ह्यावर्षीपासून रिटर्न व्हेरिफिकेशन काही मिनिटांत अगदी सहजपणे पूर्ण होणार आहे.

सध्या आपण –

१. नेटबँकिंग,

२. बँक खाते,

३. डी-मॅट खाते,

४. ए.टी.एम.,

हे पर्याय वापरून आपल्या भरलेल्या रिटर्नचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरफिकेशन करू शकतो. परंतु आता आयकर खात्याने यासाठी नविन ई-व्हेरिफायिंग सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. ह्या सुविधेद्वारे पुर्वीसारखा आय.टी.आर.-व्ही हा फॉर्म डाऊनलोड करून सी.पी.सी. बेंगलोरला न पाठवता, केवळ आधारकार्डच्या मदतीने ईलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन करणे शक्य होणार आहे. ह्यासाठी आधार कार्डच्या तपशीलाचा वापर होणार आहे.

आधारकार्ड वापरून ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया-

१. ई-फायलिंग पोर्टलवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in) तुमच्या अकाऊंटला लॉगिन करा.

२. रिटर्न सबमिट करताना व्हेरिफिकेशनची पद्धत म्हणून आधार ओ.टी.पी. हा पर्याय निवडा.

३. तुमच्या आधारकार्डशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक. ओ.टी.पी. येईल.

४. तो ओ.टी.पी. ई.फायलिंग पोर्टलवर विचारलेल्या ठिकाणी लिहा.

५. सबमिट केल्यावर आयकर रिटर्न व्हेरिफाय होईल.

मात्र, हा पर्याय वापरण्यासाठी तुमचे पॅन व आधार कार्ड एकमेकांशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

आधार व पॅनकार्ड एकमेकांशी जोडणेही अत्यंत सोपे आहे. ई-फायलिंग वेबसाईटवर हाही पर्याय उपलब्ध असतो. पुढील पद्धतीने काही क्षणात आधार व पॅनकार्ड एकमेकांशी जोडले जाते.

१. ई.फायलिंग वेबसाईट (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) उघडा.

२.लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.

३. उघडलेल्या फॉर्ममध्ये तुमची पॅन व आधारकार्डची विचारलेली माहिती भरा. (ही माहिती दोन्ही ठिकाणी सारखीच असणे गरजेचे आहे. नाव, जन्मतारिख,  इ. सारखे तपशील पॅन व आधारकार्डवर एकसारखे नसतील, तर त्यांची एकमेकांशी जोडणी होणार नाही.)

४.सर्व माहिती भरून झाल्यावर लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.