Reading Time: 2 minutes

भांडवल बाजार नियंत्रक सेबी आणि शेअर बाजाराची व्यवहार कमिटी याचे व्यवहार होणाऱ्या कंपन्यांच्या भावावर लक्ष असते. बाजारात अनेक लोक कार्यरत असल्याने सट्टेबाजाकडून एखाद्या शेअर्सचे भाव नियंत्रित केले जावू शकतात. त्यामुळे मोठया प्रमाणात घबराट होऊन खरेदी अथवा विक्रीचे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. उलाढाल मोठया प्रमाणावर वाढून भाव एकाच दिशेने जाऊ लागतात. भाव खाली येत असेल तर आणखी घबराट होऊन विक्री वाढते त्यामुळे भाव अजून खाली जावून अजून जास्त घबराट होते. तर वाढणारे भाव अधिक वाढतील म्हणून कोणतीही मूलभूत माहिती नसताना भावात अनावश्यक वाढ होऊ शकते. ही भाववाढ खरेदीदारांना आकर्षित करून घेत असल्याने ते मोठया प्रमाणावर खरेदी करण्याची शक्यता वाढते. या दोन्हीं परिस्थितीत बाजारात फक्त विक्रेते किंवा फक्त खरेदीदार अशी स्थिती उद्भवते. यामुळे सामान्य गुंतवणूकदार गडबडीत चुकीचा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे त्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठीच बाजाराची स्थिरता राखणे आणि गुंतवणूकदारांचे रक्षण करणे, या हेतूने सेबी आणि बाजार व्यवहार समिती आपापसात चर्चा करून त्यांना असलेल्या अधिकारात अशा समभागांच्या व्यवहारावर स्वतः हस्तक्षेप करून नियंत्रण आणू शकतात. बाजारभावात अल्प कालावधीत पडणारा फरक आणि उलाढालीत झालेली अपवादात्मक वाढ किंवा घट हे त्याचे प्रमुख निकष आहेत. ज्या शेअर्सचे बाबतीत ते या उपाययोजना लागू करतील त्यांना विशेष निगराणीखालील असलेले समभाग (additional serveilance measures) असे म्हणतात.

अलीकडेच बाजारात झालेल्या पडझडीत काही मिडकॅप आणि स्मॉलकॅप यामध्ये अपवादात्मक उलाढाल वाढून त्यांचे भाव खूप खाली / वर झाले आणि अनेकदा त्यांना लोअर/अपर सर्किट लावावे लागले. अशावेळी सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ म्हणून अनेक शेअर वेळोवेळी निगराणीखाली (ASM) आणण्यात आले आहेत. असे करणे हा बाजार व्यवहाराच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. एफ ऍण्ड ओ मधील शेअर सोडून इतर सर्व शेअर्सना भावातील 20% फरकावर सर्किट फिल्टर लावलेले असतात.म्हणजेच त्या शेअर्सचे भाव दिवसभरात 20% हून कमी अधिक होऊ शकत नाहीत. जरूर पडल्यास एफ एन ओ मध्ये ट्रेड होत असलेल्या शेअर्सना फिल्टर लावले जाऊ शकतात किंवा त्यांच्या व्यवहारांवर तात्पुरती बंदी आणली जाऊ शकते. निगराणीखाली असलेल्या शेअर्सचे बाबतीत, सध्या–

१. हे फिल्टर 20% पेक्षा खूप कमी केलेले आहेत अनेक शेअर्सचे बाबतीत सध्या ते 5% वर ठेवले असल्याने त्यांचे भावात एका दिवसात 5% हून अधिक फरक पडू शकत नाही.

२. या शेअर्सचे बाबतीत डे ट्रेडिंग (त्याच दिवशी प्रथम खरेदी / विक्री करून नंतर विक्री / खरेदी) करता येणार नाही.

३.अशा शेअर्सचे खरेदीसाठी पूर्ण रक्कम (100℅) द्यावी लागेल.

४.विक्री करण्यासाठी आपल्या डी मॅट खात्यात तेवढे शेअर्स असले पाहिजेत तरच विक्री करता येईल. शॉर्ट सेलिंग करता येणार नाही.

या निर्बंधांमुळे समभागातील सट्टेबाजीस आळा बसेल. मात्र जे खरेखुरे खरेदीदार किंवा विक्रेते असतील त्यांना खरेदी / विक्री करण्यास कोणताही अडथळा नसेल. खरेदी/ विक्री संदर्भात डे ट्रेडिंगवरील बंदी म्हणजे कंपनीवर केलेली कारवाई समजण्यात येणार नाही. या निर्बधांचा दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात येऊन त्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील. 6 जून 2018 रोजी ASM मध्ये NSE मधील 64 तर BSE मधील 109 नोंदणीकृत कंपन्यांचा सामावेश आहे.

अलीकडेच अस्तित्त्वात आलेल्या परंतू फारसा वापर न केलेल्या या पद्धतीचा वापर, बाजारातल्या पडझडीमुळे अनेक शेअर्सचे बाबतीत नुकताच केला गेला. या तरतुदी माहीत नसल्याने काही जणांना संभ्रम झाला आहे. त्यातच एक्सचेंजकडून काढलेल्या परिपत्रकातून या शेअर्सचे डे ट्रेडिंग व्यवहार थांबवले आहेत, याचा सर्वच व्यवहार थांबवले आहेत असा समज निर्माण झाला. हे व्यवहार थांबवले नसून त्यावर तात्पुरते निर्बंध आणले आहेत. शेअर्समधील सट्टेबाजीस रोखण्याच्या या तरतुदी ट्रेड टू ट्रेड (T2T) पद्धतीशी मिळत्याजुळत्या आहेत.

(पूर्वप्रसिद्धी- https://www.manachetalks.com/ )
(चित्र सौजन्य- https://bit.ly/2MzFunr )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.