Reading Time: 3 minutes

सोमवारचा दिवस.. सकाळी ९.३०-१० चा सुमार.. निशाला आज काहीही करून वाण्याचं बिल चुकतं करायचं होतं. ऑफिसला जाता जाता हे काम उरकायचं होतं. पैसे काढायला बँकेत गेली तर कॅशीयर समोर ही भली मोठी रांग..१- १.३० तासाची निश्चिंती !!

काय करावं, या विचाराने निशा अगदी हैराण होऊन गेली……

रोहनला ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता. सकाळीसुद्धा बँकेतून पैसे काढायला वेळ नव्हताच. गेले ४-५ दिवस असंच सुरू होतं आणि आता उद्याच रीनाचा वाढदिवस होता. रोहनला तिला तिच्या आवडीचा एक ‘एक्सपेन्सिव ड्रेस’ सरप्राईज गिफ्ट द्यायचा होता.

आता काय करावं, त्याला सुचतच नव्हतं….

हे असे प्रसंग आता जवळजवळ भूतकाळात जमा झाले आहेत.

थँक्स टू एटीम/डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड्स!!

  • आपली अर्थव्यवस्था हळूहळू कॅशलेस प्रणालीकडे जात आहे. वाण्याचे दुकान असो, मेडिकल असो, मोठमोठे शॉपिंग सेंटर असोत. सर्व ठिकाणी आता आपण कार्ड वापरून आर्थिक व्यवहार करू शकतो. तसेच आता इंटरनेट क्रांतीमुळे ऑनलाइन खरेदी विक्रीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. दुकाने ऑनलाइन झाल्यामुळे साहजिकच आर्थिक व्यवहार ऑनलाइन होणे ओघाने आलेच. अशा सर्व व्यवहार यांसाठी क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्ड वापरणे लोकांना सोयीचे वाटते आहे आणि अंगवळणी पडते आहे.
  • क्रेडिट/ डेबिट कार्ड ही बँकिंग क्षेत्रातली क्रांतीच खरंतर!! बँकेतल्या लांब रांगा, आयत्यावेळी होणारी पंचाईत, वाया जाणारा वेळ अशा अडचणी त्यामुळे नक्कीच दूर झाल्या. या कार्ड बाजारावर अजूनही वरचष्मा आहे तो ‘व्हिझा वा मास्टरकार्डचा’ . व्हिझा/मास्टरकार्ड हे दोन्ही अमेरिकन कंपन्यांचे कार्ड आहेत. आज जगभरात सुमारे २०० देशांमध्ये ही कार्ड वापरली जातात.
  • पण हे कार्ड वापरण्यासाठी ग्राहकांना काही रक्कम फी म्हणून भरावी लागते. कारण, बँकांना ही कार्ड उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीला प्रत्येक कार्डमागे काही पैसे बँकांना भरावे लागतात. तसेच ही कार्ड्स वापरून केलेल्या प्रत्येक व्यवहारामागे काही टक्के कमिशन या कार्डच्या कंपन्यांना जाते.
  • ही अडचण दूर करण्यासाठी, व्हिझा/मास्टरकार्ड ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये एक पाऊल उचलले. भारतीय राष्ट्रीय भरणा महामंडळ (NPCI National Payment Corporation of India ) च्या माध्यमातून एक स्वदेशी कार्ड बाजारात आणायचे ठरवले. त्यानुसार मार्च २०१२ मध्ये अधिकृतरित्या रूपे कार्ड देशभरात बाजारात आणले गेले.
  • Rupee आणि Payment या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून ‘RuPay’ हा शब्द तयार केला गेला. भारतीय बाजारात व्यवहार ग्राहकांना व बँकांना सोयीचे व्हावे म्हणून हे रूपे कार्ड सामान्य (domestic) बाजारात आणले गेले.
  • रुपे कार्ड्स व्हिझा वा मास्टरकार्ड प्रमाणेच तयार केली गेली आहेत व तसेच काम करतात. सर्व बँकांना ही कार्ड एनपीसीआय (NPCI) कडून पुरवली जातात. सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत की ग्राहकांना रूपे कार्ड उपलब्ध करून द्यावीत. आज भारतीय बँकांमध्ये ग्राहकांसाठी व्हिझा, मास्टरकार्ड आणि रूपे असे तिन्ही पर्याय उपलब्ध असतात.
  • या रूपे कार्ड साठी बँकांना कोणतीही फी भरावी लागत नाही. तसेच रूपे कार्ड  वापरून केल्या गेलेल्या कोणत्याही व्यवहारावर ग्राहक, व्यापारी, बँका अशा कोणत्याही स्तरावर कमिशन द्यावे लागत नाही. फी आणि कमिशन व्यतिरिक्त व्यवहार होत असल्याने रूपे कार्ड वापरून आर्थिक व्यवहार करणे फार फायद्याचे ठरत आहे.
  • कोणतेही क्रेडिट वा डेबिट कार्ड आपण आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरतो तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या बँक खात्याशी आपले बँक खाते जोडून दिले जाते. ही जोडून देण्याची प्रक्रिया, पेमेंट गेटवे (Payment gateway), क्रेडिट वा डेबिट कार्डद्वारे उपलब्ध करून दिली जाते. यासाठी क्रेडिट वा डेबिट कार्ड ज्या कंपनीचे आहे ती कंपनी त्या देशातील विविध बँकांशी संबंध जोडते (Tie ups) आणि मग जेव्हा एखादे कार्ड दुकानात, शॉपिंग सेंटर मध्ये असणाऱ्या पीओएस टर्मिनल मध्ये वापरले जाते तेव्हा कार्डधारक आणि व्यापारी यांची बँक खाती जोडली जातात. त्यातून सरळ सरळ, बँक टू बँक आर्थिक व्यवहार होतो.
  • रूपे कार्ड पूर्णपणे स्वदेशी,भारतीय बनावटीचे आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे सर्व होण्यासाठी केवळ काही सेकंदांचा कालावधी लागतो. रूपे कार्डच्या पेमेंट गेटवेद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे अजून जलद गतीने होणे शक्य आहे.
  • त्यामुळेच आता भारतीय ग्राहकांचा ओढा रूपे कार्डकडे वाढताना दिसून येत आहे. जनधन योजनेच्या खातेधारकाना रूपे कार्ड दिले जाते. तेव्हापासून हा वापर अधिकच वाढल्याचे दिसून आले आहे. आजमितीला भारतीय बाजारात रूपे कार्ड्सचा वाटा जवळजवळ ६५% आहे. सुमारे २७ करोड रूपे कार्ड्स वितरित केले गेले आहेत.
  • भारतातील सर्व राष्टीयीकृत, खाजगी, सहकारी बँका रुपे कार्ड वितरित करू शकतात. सर्व एटीएम, सर्व पीओएस टर्मिनल्स येथे रूपे कार्ड वापरता येते.
  • शिवाय NPCI ने ‘Discover Financial Network आणि JCB Network’ यांच्याशी टाय अप केल्याने आता रूपे कार्डला जागतिक व्यापरपेठ सुद्धा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. सिंगापूर मध्ये २०१५ पासून रूपे कार्ड उपलब्ध केले गेले आहे.

पॉवर ऑफ (रूपे कार्ड) कॉमन मॅन !नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड – बहुउद्देशीय प्रवासी कार्ड

डीजिटलायझेशन आणि रोजगाराच्या संधी

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.