ISIN
https://bit.ly/3lpoD7h
Reading Time: 4 minutes

ISIN : आंतरराष्ट्रीय रोखे ओळख क्रमांक

ISIN म्हणजे आंतरराष्ट्रीय रोखे ओळख क्रमांक कसे तयार केले जातात याबद्दलची विस्तृत माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

आपल्याला निक्षेपीकेकडून (Depository) आलेले गुंतवणूक पत्रक (Holding statement) आपण पाहिलं आहे का? हा एक 12 पदांचा अक्षरे आणि अंक यांनी संयुक्तपणे बनलेला ओळख क्रमांक आहे. आपण धारण करीत असलेले समभाग, कर्जरोखे, वस्तू, म्युच्युअल फंडाचे युनिट, ईटीएफ, ऑप्शन करार यासंबंधीची त्यात पूर्ण माहिती असते. उदा-

ISIN                       Scrip Name

INE208A01029   Ashok leylandRe1/-

INE787H07370  India INF 8.91 220134

  • यातील पहिला ओळख क्रमांक अशोक लेलँड कंपनीच्या ₹1/- दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचा आहे. 
  • दुसरा क्रमांक इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचे 8.91% दराने व्याज देणारे व्यावसायिक पत्र आहे (Commercial papers) ज्याचे 22 जानेवारी 2034 रोजी विमोचन होईल. त्यांच्या ओळखीचा विशिष्ठ असा  सांकेतिक क्रमांक आहे. 
  • या 12 पदे असलेल्या क्रमांकास ISIN असे म्हणतात. या क्रमांकाच्या संदर्भातून जगभरात कोणालाही नेमकेपणाने संबंधित कंपनी, कर्जरोखा किंवा युनिट ची माहिती होते. बाजारामधील व्यवहार अथवा बाजाराबाहेरील कोणताही व्यवहार पूर्ण करण्यासाठी हा क्रमांक द्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहार होणाऱ्या प्रतिभूतींना असे कायमस्वरूपी ओळख क्रमांक देण्यात येतात.
  • यातील डावीकडून पहिली 3 पदे ही अक्षरे आहेत, तर उर्वरीत 9 पदांमध्ये 7/8 पदे अंक व 1/2 पदे अक्षरे आहेत. 
  • आंतरराष्ट्रीय प्रमाण संघटनेच्या सभासद मानकानुसार  (ISIN slandered ISO)  हा क्रमांक देण्यात येतो. 
  • प्रत्येक देशाची स्वतःची अशी राष्ट्रीय क्रमांक एजन्सी म्हणजेच National Numbering Agency आहे त्यामार्फत ते केले जाते. 
  • अशाप्रकारे रोख्याना क्रमांक देण्याचे काम, भारतात भांडवल बाजार नियंत्रिक सेबी स्वतः करीत आहे, तर सरकारी रोख्याना ते भारतीय रिझर्व बँकेकडून दिले जाते. 
  • कोणत्या प्रकारच्या रोख्याना नेमका कोणता क्रमांक द्यायचा, हे विशिष्ट पद्धतीने  ठरवले जाते त्यासाठी ISO 6166 या पद्धतीचा वापर केला जातो. 
  • रोखे क्रमांकातून सदर रोखा कोणत्या विशिष्ठ बाजारात नोंदलेला आहे किंवा त्याचा व्यवहार कोणत्या बाजारात झाला ते  समजत नाही. 

हे नक्की वाचा: PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

क्रमांकाकडे नीट काळजीपूर्वक पहा-

  • यातील आपल्या डावीकडून दोन पदातील अक्षरे ही, हे रोखे जारी कोणत्या देशात केले आहेत याची ओळख देतात. 
  • आपल्या देशात वितरित करण्यात आलेल्या प्रत्येक रोख्यांची डावीकडे असलेली सुरुवात IN या अक्षरांनी झाली असून ती आपल्या देशाची म्हणजेच भारताची सांकेतिक ओळख आहे.

डावीकडून तिसऱ्या पदात असलेले अक्षर हे रोखे जारी करणारे कोण आहेत त्यांची ओळख पटवून देते –

जारी कोणी केले (Issuer) संकेतांक (Code)
केंद्र सरकार A
राज्य सरकार B
महानगरपालिका C
केंद्रशासित प्रदेश D
कंपनी, निगम, बँक E
म्युच्युअल फंड F
अंशतः भरणा समभाग (Partly Paid up Shares) G
  • यापुढील 4 पदे कंपनीची ओळख पटवून देतात नोंदणी केलेल्या, करू इच्छिणाऱ्या आणि आता नोंदणी न केलेल्या कंपनीसही असा कोड देण्यात आला आहे. 
  • वरील उदाहरणात 208A हा क्रमांक Ashok Layland ltd या कंपनीस दिला गेला असल्याने या कंपनीने जारी केलेल्या कोणत्याही प्रकारच्या रोख्यामध्ये डावीकडून 4 ते 7 या स्थानात हीच पदे असतील. 
  • सर्व कंपन्यांना 001A पासून 999F पर्यंत असे क्रमांक दिले आहेत अथवा देण्याची तरतूद आहे.

यानंतरची दोन पदे अंक असून ते रोख्याचा प्रकार दर्शवितात.

रोख्याचा प्रकार संकेतांक (Code)
समभाग (Shares) 01
पोस्ट योजना (Postal Schemes) 02
प्राधान्य समभाग (Preferential Shares) 03
बॉण्ड (Bonds) 04
डीप डिस्काउंट बॉण्ड 05
बदलत्या व्याजदराचे रोखे (Floating rate Bonds) 06
व्यावसायिक पत्रे (Commercial Papers) 07
स्टेप डिस्काउंट बॉण्ड 08
रेग्युलर रिटर्न बॉण्ड 09
सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट 10
सिक्युरिटाईज इन्स्ट्रुमेंट 11
कर्जरोखे (Debentures) 12
  • यापुढील दोन पदे रोखे जारी करणारी कंपनी पुन्हा वेगळे रोखे घेऊन बाजारात प्रवेश केलेली संख्या दर्शवते ती 01 ते 99 असू शकते.
  • 12 वा अंक हा पूर्वीच्या पदांवर विशिष्ट प्रक्रिया करून आलेल्या अंकाएवढा असल्याने रोखे क्रमांक बरोबर असल्याचे समजते. त्यामुळे त्यास पडताळणी क्रमांक असे म्हणतात. 
  • 12 पदे असलेला हा क्रमांक लिहिण्यात चूक होऊ शकते याचा संबंध अंतिमतः पैशांशी असल्याने तो नेहमी बरोबरच हवा. तो बरोबर आहे की नाही याची पडताळणी करण्याची पद्धत आहे. 
  • ही एक विशेष पद्धती असून असून ती सर्व रोख्यांसाठी सारखीच आहे. यास ‘Modulus 10 Duble and Double‘ असे म्हणतात. 
  • या पद्धतीत अक्षराचे व अंक या डावीकडील 11 पदांचे रूपांतर एका संख्येत करतात.
  • अक्षराचे अंकात रूपांतर करताना त्याच्या वर्णलिपीतील अक्षरस्थानात 9 मिळवतात म्हणजे पाहिले अक्षर A + 9 = 10 याप्रमाणे B = 11 C = 12 असे Z = 25 अशा पद्धतीने अक्षरांचे आकड्यात रुपांतर केले जाते.
  • अशा पद्धतीने आलेल्या संख्येची एक आड एक अंकाच्या दोन गटात विभागणी केली जाते
  • यानंतर पहिल्या गटातील प्रत्येक संख्येस 2 ने गुणले जाते
  • यानंतर दोन्ही गटातील प्रत्येक संख्याची बेरीज करा जर दोन आकडी संख्या असल्यास ती न घेता तिचे दोन्ही अंक एकमेकात मिळवून येणारा अंक मिळवा.
  • बेरीज केलेल्या संख्येस 10 ने भागून राहणारी बाकी काढा.
  • ही बाकी 10 तुन वजा केली असता उरलेली संख्या डावीकडून 12 व्या स्थानावर असल्यास या आधीची पदे बरोबर आहेत, म्हणजेच 12 वे पद हे पडताळणीसाठी असलेली संख्या असते.
  • बाजारात रोख्यांची एकूण संख्या वाढल्यास या पद्धतीत काय सुधारणा करता येतील याची निश्चित अशी पद्धत आहे.

याप्रमाणे वरील उदाहरणात दिलेल्या अशोक लेलँड च्या ₹ 1/- दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सच्या ISIN क्रमांकाची पडताळणी करूयात.

 INE208A01029

  • वरील पध्दतीने डावीकडून दोन पदे, IN याचे संख्येत रूपांतर I = 18, N = 23 होईल, येणारी संख्या 1823.
  • यानंतरचे पद E =14 येईल, म्हणजेच 14.
  • पुढील 4 पदे 208A यातील 208 तसेच राहतील A = 10 म्हणून येणारी संख्या 20810.
  • पुढील 2 पदे व त्यापुढील 2 पदे संख्या असल्याने तशीच राहून 0102 म्हणून संख्या 0102.
  • म्हणून सर्व 11 पदांबद्धल मिळालेली संख्या = 182314208100102

182314208100102: या संख्येचे एक आड एक संख्या घेऊन 2 गट बनवू.

पहिला गट (1, 2, 1, 2, 8, 0, 1, 2)

दुसरा गट (8, 3, 4, 0, 1, 0, 0)

  • पहिल्या गटातील प्रत्येक संख्येला 2 ने गुणूयात जर दोन अंकी संख्या आली तर तिची बेरीज करून येणारी संख्या बनवू. याप्रमाणे तयार होणारा गट ( 2, 4 ,2, 4, 16 म्हणजेच 1 + 6 = 7, 0, 2, 4) म्हणून मिळालेल्या संख्या 2, 4, 2, 4, 7, 0, 2, 4
  • यांची व दुसऱ्या गटातील संख्या 8, 3, 4, 0, 1,0, 0 या सर्व संख्याची बेरीज केल्यावर 41 ही संख्या मिळाली.
  • 41 ला 10 ने भागले असता येणारी बाकी 1, ही बाकी 10 मधून वजा केली असता येणारे उत्तर 9.
  • 9 ही संख्या 12 व्या स्थानी असल्याने हा क्रमांक  बिनचूक असल्याची खात्री पटते.

सन 1981 मध्ये साली सर्वप्रथम अशी व्यवस्था मान्य करण्यात येऊन G/30 सभासद देशांनी ती स्वीकारली ट्रेडिंग व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी त्याचा वापर केला गेला. यामुळे बाजारात व्यवहार करणाऱ्या सर्व संबंधितांना जगातील कोणत्याही कंपनीच्या विविध रोख्यांची ओळख पटवता येणे सोपे झाले आहे. 

सन 1994 साली जगातील बहुतेक देशांनी ती मान्य केली. आपल्याकडे राष्ट्रीय शेअरबाजाराची (NSE) स्थापनाच मुळी फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार करण्याचे ठरवून करण्यात आली. तेव्हा असे व्यवहार करताना प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक प्रकारच्या विविध प्रकारातील व्यवहारासाठी वेगळा सांकेतिक क्रमांक असणे आवश्यक झाले होते. त्यामुळे रोख्यांसंबंधित देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यवहार आता सुलभ झाले आहेत. रोखेबाजाराची वाढ होण्यास यामुळे मदत झाली आहे.

उदय पिंगळे         

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…