अर्थसाक्षर Franchise Business फ्रेंचाइजी व्यवसाय
Reading Time: 3 minutes

Franchise Business – फ्रेंचाइजी व्यवसाय

आजच्या लेखात आपण फ्रेंचाइजी व्यवसाय (Franchise Business) म्हणजे काय त्याची सुरुवात कशी करायची, त्यासाठी लागणारी कागदपत्रे अशा महत्वपूर्ण गोष्टींची माहिती घेणार आहोत. 

Franchise Business – फ्रेंचाइजी व्यवसायाचा परिचय (प्रस्तावना) :

 • कुठलाही व्यवसाय सुरू करताना सर्वात आधी, “तुम्हाला कशाची आवड आहे”, हे लक्षात घ्या. कोणते काम तुम्ही न थकता करू शकता याचा विचार करा. अर्थात सगळं काही तुम्हाला करावं लागत नाही. 
 • एखादे दुकान किंवा तो व्यवसाय चालवताना आपण त्या व्यवसायाचे स्वतः: मालक असतो. तेव्हा आपण वस्तूंची सेवा देण्यासाठी कामगारांची नेमणूक करू शकतो. 
 • फ्रेंचाइजी व्यवसाय चालविणे किंवा सुरु करणे सुरूवातीला सोपे वाटू शकते, पण ते यशस्वी होण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. 
 • फ्रेंचाइजी व्यवसायाच्या मुख्य प्रक्रियेमध्ये व्यवसाय मालक किंवा फ्रेंचाइजीचा अधिकृत परवानाधारक व्यक्ती आणि फ्रेंचाइजी घेऊ इच्छिणारी व्यक्ती म्हणजे तृतीय पक्ष यांचा समावेश असतो. 
 • फ्रेंचाइजी घेताना कायदेशीर करारासोबत काही पैसे ‘शुल्क’ म्हणून द्यावे लागतात. शुल्क दिल्यानंतर त्या बदल्यात फ्रेंचाइजी संबंधित ब्रँडचा वापर करून, वस्तू किंवा सेवा पुढे वितरीत करण्याची परवानगी ठराविक कालावधीपर्यंत मिळते. 
 • फ्रेंचाइजी व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण प्रकिया या लेखात आपण जाणून घेणार आहोत. 

भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १

Franchise Business – फ्रेंचाइजी व्यवसायासाठी लागणारी कागदपत्रे : 

 • फ्रेंचाइजी देणाऱ्या कंपनीच्या वेबसाइटवर असणारा अर्ज (प्लिकेशन फॉर्म) पूर्णपणे भरा. जर फॉर्म उपलब्ध नसेल, तर कंपनीशी संपर्क करा. 
 • लेटर ऑफ इ़ंटेंट ( एलओआय), ज्यात फ्रेंचाइजीसाठी अर्ज करण्याची कारणे दिली आहेत. 
 • व्यवसायासाठी निवडलेल्या जागेचा नकाशा, जो तुम्ही ‘मॅप्स’ च्या मदतीने तयार करू शकता. यासोबतच तुम्ही जागेचे चित्र किंवा फोटो फॉर्मशी संलग्न करा. 
 • तुमचा रेझ्युमे/प्रोफाईल फॉर्मशी जोडा. 
 • किमान दोन ओळख दर्शवणारे सरकारी पुरावे (आयडी प्रुफ).
 • जर व्यवसायासाठी लागणारी जागा भाड्याने घेत असाल, तर भाडेपट्टी करार किंवा लेखीकरार देखील प्रदान करणे आवश्यक आहे. 
 • बँक स्टेटमेंट -साधारणतः मागील तीन महिन्यांचे.
 • करदात्याचा ओळख क्रमांक (TIN ). 

भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २

फ्रेंचाइजी व्यवसाय सुरू करण्याच्या पायऱ्या (Franchise Business – Steps) :

१. पहिली पायरी- निवडलेल्या फ्रेंचायझरपर्यंत पोहोचणे: 

 • प्रत्येक फ्रेंचायझरकडे लागणारी कागदपत्रे, फी या प्रत्येक व्यवसायाच्या दृष्टीने वेगवेगळ्या असतात.
 • फ्रेंचाइजीची माहिती काही वेळा त्यांच्या वेबसाइटवरील माहितीपेक्षा वेगळीही असू शकते. 
 • सर्व फ्रेंचायझर एकसारखे नसतात. त्या कंपनीचा व्यवसाय किती काळ चालू आहे, सरासरी किती उत्पन्न आहे, कंपनी किती यशस्वी आहे या गोष्टींचा माहिती करून घेणे आवश्यक आहे. 
 • फ्रेंचायझरची प्रत्यक्षात भेट घेणे नेहमीच फायदेशीर असते. फ्रेंचायझर नवीन असला तरी त्याच्याविषयी जितकी जास्त माहिती मिळेल तितकं चांगले. 

नोकरी करू की व्यवसाय?

२. दुसरी पायरी – आवश्यक वस्तूंची व्यवस्था: 

 • ही खूप महत्त्वाची पायरी आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणा-या आवश्यक गोष्टी वेळेत पुरवल्या गेल्या तरच फ्रेंचायझर किंवा त्या ब्रँडचा मालक तुमचा अर्ज मंजूर करतो, अन्यथा मंजूर केला जात नाही, म्हणून याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 

३. तिसरी पायरी- फ्रेंचायझरला भेटणे: 

 • यावेळी आपण भरलेल्या अर्जातील बाबींचे मूल्यांकन केले जाते. सर्व बाबी तपासल्या जातात, व पुढे जाण्यासाठी योग्य आहे की नाही याची खात्री केली जाते. 
 • आपण व्यवसाय भागीदार म्हणून योग्य आहात का याची चाचणी घेण्यात येते. 

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था

४. चौथी पायरी – अर्जावर मंजूरी: 

 • ही शेवटची पायरी आहे.  याचा अर्थ आपण फ्रेंचाइजी घेण्याच्या मार्गावर आहात. खूप उत्साहाच्या भरात काही गोष्टी राहून जातात, पण असे होऊ देऊ नका. आपल्या अर्जाचे पुनरावलोकन करा. करारावर सही करण्यापूर्वी ब-याच महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्या काही गोष्टी खालीलप्रमाणे –
 •  फ्रेंचाइजी चालू करण्यापासून पुन्हा नुतनीकरणाच्या वेळी लागणारी किंमत,
 • फ्रेंचाइजी फी किंवा रॉयल्टी फी, 
 • फ्रेंचाइजीचा करार बंद होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टी ज्या टाळल्या पाहिजेत, 
 • फ्रेंचाइजी पॅकेजमध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी व अपवाद,
 • फ्रेंचायझर मान्यताप्राप्त उत्पादने आणि त्यांचा पुरवठा याची संपूर्ण माहिती, 
 • आपण घेतलेली फ्रेंचाइजी जास्तीत जास्त फायद्यात कशी राहील, याचा विचार व त्यादृष्टीने योग्य नियोजन. 

सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी (One Person Company)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Search: Franchise Business Marathi Mahiti, Franchise Business in Marathi, Franchise Business Marathi, Franchise Business Mhanje kaay, Franchise Marathi Mahiti, Franchise in Marathi, What is Franchise Business? Marathi Mahiti

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.