Reading Time: 3 minutes

माझ्या गावातील एका मित्राला तीन मुली आणि एक मुलगा झाला. तेव्हा या तीन मुलींच्या शिक्षणावर जेवढा खर्च तो मित्र करतो, त्यापेक्षा अधिक खर्च तो एका मुलाच्या शिक्षणावर करतो. भारताने चंद्रावर तीन वेळा यान पाठवलं पण अजूनही मुलींच्या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदललेला दिसत नाही. 

मुलींना फक्त शिकवायचं म्हणून शिकवायचं. अशीच मानसिकता अजूनही आहे. यामुळे जेव्हा मुला- मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्याची वेळ येते. तेंव्हा मुलांना प्राधान्य दिलं जातं. हे कटू वास्तव आहे. हे वास्तव बदलण्यासाठीच सरकार मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते.

आज आपण एक अशाच महत्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. 

त्या योजनेचे नाव आहे, लेक लाडकी योजना….(Lek Ladki Yojna ) ही महाराष्ट्र सरकारची योजना. या २०२३ च्या बजेट मध्ये ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे.  

या योजनेत महाराष्ट्र सरकार पात्रधारक मुलींना ९८,००० रुपये आर्थिक सहाय्य देणार आहे. 

लेक लाडकी योजना सुरु करण्याचा उद्देश ( Lek Ladki Yojna objectives )

 • मुलींना शिक्षणासाठी स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या प्रयत्न करणे
 • राज्यातील मुलींचा सर्वागीण विकास साधण्याचा प्रयत्न करणे.
 • मुलगा आणि मुलगी यांच्यात समानता आणण्याच्या प्रयत्न करणे. 
 • मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे.
 • मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.
 • राज्यातील भ्रूणहत्या कमी करणे.
 • मुली या कुटुंबावरील ओझे नाहीत, हे दाखवणे.
 • समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, हा विचार राज्यात पेरणे.
 • मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, हे या योजनेचे प्रमुख उदिष्ट्य आहे.
 • मुली शिक्षणासाठी इतर कोणावर अवलंबून राहू नयेत, त्यांचे अर्ध्यात सुटू नये, यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. 

हा लेख नक्की वाचा – मुलींसाठी असणाऱ्या ‘चार सरकारी योजना’

लेक लाडकी योजनेंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य ( Lek Ladki Yojna benefits )

मुलींना पाच टप्प्यात आर्थिक सहाय्य दिले जाणारे आहे… ते खालीलप्रमाणे

 • मुलीचा जन्म झाल्यावर लगेच ५००० रुपये दिले जातील.
 • मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर ४००० रुपये देण्यात येतील.
 • तिसऱ्या टप्प्यात मुलगी सहावी गेल्यानंतर ६००० रुपये दिले जातील.
 • मुलगी दहावी पास होऊन अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जाणार आहेत. 
 • शेवटच्या टप्प्यात मुलगी जेव्हा १८ वर्षाची होईल, तेव्हा ७५,००० रुपये दिले जाणार आहेत. 

हा लेखही वाचा – आई व बाळासाठी वरदान असलेली ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना’

लेक लाडकी योजनेत सामील होण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतील. ( Lek Ladki Yojna- Terms and Conditions ) 

 • अर्जदार मुलींचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असायला हवे.
 • कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या गरीब असायला हवे.
 • अर्जदार कुटुंब हे पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक पाहिजे.
 • ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे, इतर राज्यातील मुलींसाठी नाही.
 • ज्या कुटुंबाकडे पांढरे रेशनकार्ड आहे, अशा कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
 • अर्जदार मुलींचे आई किंवा वडील सरकारी सेवेत असता कामा नये.
 • अर्जदार कुटुंब हे यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभार्थी असेल तर ते कुटुंब लेक लाडकी योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

लेक लाडकी योजनेत सामील होण्यासाठी लागणारी कागदपत्रे ( Lek Ladki Yojna – Documents )

 • पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
 • मुलीचे आधारकार्ड
 • मुलीचे बँक खाते, मुलीचे नसल्यास आई- वडिलांचे बँक खाते.
 • मोबाईल क्रमांक
 • पासपोर्ट साईझ फोटो

लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ( Lek Ladki Yojna – process )

पहिला टप्पा – 

 • अर्जदारास सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या https://maharashtra.gov.in/1125/Home या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

 • त्या वेबसाईटवर गेल्यावर registration वर क्लिक करायचे

 • तेव्हा तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन पेज उघडेल त्यामध्ये तुंम्हाला तुमचा मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन करावे लागेल.

 • यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल, अशा प्रकारे तुमचा पहिला टप्प्या पूर्ण होईल.

दुसरा टप्पा –

 • महाराष्ट्र शासनच्या वेबसाईटवर लेक लाडकी योजनेवर क्लिक करायचे.
 • तेव्हा तुमच्यासमोर लेक लाडकी योजनेचा अर्ज ओपन होईल, त्या अर्जात जी माहिती सांगितली गेली आहे, ती सर्व भरायची.
 • सर्व माहिती भरून झाल्यावर विचारण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करायची.
 • अशा प्रकारे तुमचा पूर्ण अर्ज भरला जाईल.

तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर वेळ घालवू नका, लगेच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या. आपल्या मुलीला चांगले शिकवा, तिचे स्वप्न पूर्ण करा. काही कारणाने तुम्ही पात्र नसाल तर तुमच्या ओळखीत, शेजारी- पाजारी जे कोणी पात्र असेल तर त्यांना जरूर सांगा… हा लेख शेअर करा. तुमच्या या छोट्याशा माहितीने एखाद्या मुलीचे स्वप्न पूर्ण होईल.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes Phule Yojna –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची…

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes ESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

केवायसी म्हणजे काय? ती ऑनलाईन कशी करावी?

Reading Time: 2 minutes बँकेत खाते उघडायला गेले की केवायसी केलेली आहे का? हा प्रश्न पहिल्यांदा…