Reading Time: 3 minutes
 • Pradhanmantri Matrutva Vandana Yojana Marathi | Pradhanmantri Matru Vandana Yojana Maharashtra | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मराठी  | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र| Matru Vandana Marathi  | PM Matru Vandana Yojana Maharashtra
 • ‘भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे.’ असं भारताबद्दल बोललं जातं, याचे कारण हे आहे की, भारतात एका बाजूला प्रचंड श्रीमंती आहे. जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहा मध्ये येतो तर दुसऱ्या बाजूला आरोग्य, कुपोषण, जागतिक भूक निर्दशांक याबाबतीत शेवटच्या दहा मध्ये येतो.
 • भारताची ही प्रतिकूल स्थिती बदलावी लागेल तरच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता होईल. ही गरीब भारताची भयानक स्थिती बदलण्याच काम सरकार हळूहळू करत आहे. यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचा सरकारचा प्रयत्त्न चाललेला आहे. आज आपण अशाच एका योजनेबाबत माहिती घेणार  आहोत, ज्यामुळे भारतातील तळागाळातील जनतेची व त्यातही महिलांची स्थिती सुधारण्यास मदत होत आहे. या योजनेचे नाव आहे…. ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना’ ( PMMVY – Pradhanmantri Matrutva Vandana Yojana )  
 • Pradhan Mantri Matru Vandana Yojana ही योजना सरकारची प्रमुख योजना म्हणून २०१७ साली सुरु करण्यात आली. या योजनेला पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना म्हणून ओळखलं जायचं. त्यात अनेक बदल करून व त्यातली रक्कम वाढवून ही योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना म्हणून पुढे आणण्यात आली.

 

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना-  मुख्य  वैशिष्ट्ये आणि लाभ – ( Pradhan Mantri Matru Vandana Yojana ) 

  • ही योजना मुख्यतः केंद्र प्रायोजित योजना आहे. यामुळे या योजनेचा मोठा वाटा हा केंद्र सरकारकडून मिळत असतो. केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाद्वारे ही योजना राबवली जाते.
 • गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना तीन हप्त्यात ५,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते.
 • महिलांचे बाळंतपण हे संस्थागत झाले म्हणजे घरी किंवा इतर ठिकाणी न होता, एखाद्या रुग्णालयात प्रशिक्षीत डॉक्टर्स मार्फत झाले तर जननी सुरक्षा योजने अंतर्गत ६,ooo रुपये दिले जातात.
 • सदर योजना देशातील सर्व जिल्ह्यात लागू आहे आणि योजनेचा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असतो.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांना शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे. या साठी महिलेचे व तिच्या पतीची सहमती पत्रे, दोघांचीही आधार माहिती आणि लाभार्थी महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
 • लाभाची रक्कम लाभार्थी मातेच्या खात्यात एकूण ₹5000/- रुपयांची रक्कम 3 हप्त्यात जमा केली जाते. 

 

 

या योजनेविषयी देखील जाणून घ्या- माझी कन्या भाग्यश्री योजना !

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचा लाभ घेण्यासाठी असणारी पात्रता – Pradhan Mantri Matru Vandana Yojana…

 • या योजनेत फक्त एकदाच लाभ घेता येतो. एकदा या योजनेचा लाभ मिळाल्यास पुन्हा लाभ मिळत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सार्वजनिक उद्योगात कामाला असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेच्या वरील दोन प्रमुख अटी सोडल्या तरी बाकी बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
 • या योजनेचा लाभ मिळवायचा असेल किंवा त्याची जनजागृती करायची असेल तर या योजनेचे मुख्य उद्देश समजून घेणे गरजेचे आहे.

 हा लेख नक्की वाचा !  सुकन्या समृद्धी योजना 

 • भारतातील दहा महिलांपैकी प्रत्येक तिसरी महिला ही कुपोषित आहे. जर या देशात जवळपास ७० टक्के महिला या कुपोषित असतील त्यांचा विकास तर होणारच नाही सोबत जन्माला येणारे बाळही कुपोषित असेल. लहान मुलंच कुपोषित असतील तर देश कसा उज्ज्वल होईल. हे होऊ नये, म्हणून या योजनेचा सुरुवात केलेली आहे.
 •  भारतातील महिलांमध्ये फक्त कुपोषणाच प्रमाण नाही तर अनिमियाचे प्रमाण देखील मोठे आहे. या देशातील ८० टक्के महिला या अनिमियाग्रस्त आहेत. यात मध्यमवर्गीय महिलांचे प्रमाण देखील मोठे आहे. हे प्रमाण कमी करायचे असेल तर प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची गरज आहे.
 • घरातील एक व्यक्ती कमावता असेल तर घर चालवण, हे मोठ्या मुश्कीलीचे काम आहे. तेव्हा घरातील महिलांना काम करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. या कारणामुळे महिला गर्भवती असताना देखील काम करत असतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि बाळावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा असं होऊ नये आणि या काळात त्यांना थोडी आर्थिक मदत व्हावी. हाही उदेश ठेवून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचा प्रारंभ करण्यात आला. 

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ( Pradhan Mantri Matru Vandana Yojana – Documents )

 • महिला व तिचा पती या दोघांचे सहमतीपत्र
 • महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड ( Adhar card ) 
 • लाभार्थी महिलेचे आधार सलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते
 • लाभार्थी महिलेचे पासपोर्ट आकाराचे फोटो
 • महिला किंवा पतीचा मोबाईल क्रमांक
 • लाभार्थी महिला दारिद्र रेषेखाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र
 • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
 • घरपट्टी पावती
 • वीजबिल ( Light Bill )
 • रेशन कार्ड ( Ration Card ) 

मातृ वंदना योजनेसाठी संपर्क – Pradhan Mantri Matru Vandana Yojana Contact

 • PMMVY योजनेसाठी केंद्र सरकारने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. लाभार्थी https://pmmvy.nic.in/ या साईटवर जाऊन ऑनलाईन नावनोंदणी करु शकतात. 
 • ग्रामीण क्षेत्र : प्राथमिक आरोग्य केंद्र 
 • नगरपालिका क्षेत्र : नगरपालिका 
 • महानगरपालिका क्षेत्र : महानगरपालिका

लक्षात ठेवा !

 • वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन आपल्या कुटुंबात, शेजारी किंवा आणखी कोणी ओळखीचे असेल, ज्यांना या योजनेने मदत होत असेल तर याबद्दल जरूर सांगावे. 
 • आजच्या मार्केटिंगच्या जगातही सर्वात परिणामकारक मार्केटिंग ही माउथ टू  माउथ पब्लीसिटी आहे. तेव्हा तुम्ही जेवढ्या लोकांना सांगाल तेवढ्या गरजू लोकांपर्यंत ही योजना पोहचण्यास मदत होईल.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes Phule Yojna –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची…

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes ESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

केवायसी म्हणजे काय? ती ऑनलाईन कशी करावी?

Reading Time: 2 minutes बँकेत खाते उघडायला गेले की केवायसी केलेली आहे का? हा प्रश्न पहिल्यांदा…