Reading Time: 2 minutes

स्वतःचे घर खरेदी करणं तेही स्वतःच्या कमाईतून, हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी तेवढी जिद्द, मेहनत व चिकाटी देखील गरजेची असते. स्वतःच्या मासिक उत्पन्नाचा व घर खरेदी करण्याचा योग्य तो ताळमेळ बांधणं प्रत्येकाला जमतेच असे नाही.

वार्षिक उत्पन्न आणि घर खर्चाचा विचार करताना अनेक आर्थिक अडचणी येत असतात. तसेच, घर किंवा एखादी नवी मालमत्ता खरेदी करण्यासाठी गृहकर्जाची (Home Loan) गरज लागतेच. परंतु कर्ज घेताना देखील व्याजदर किती, त्यांचे EMI किती भरावे लागतील ही कटकट असतेच. 

कमीत कमी व्याजदर असणारे गृहकर्ज घेण्यासाठी ‘एलआयसी हाउसिंग फायनान्स (LIC Housing Finance Limited)’ एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. कमीत कमी व्याजदर असणाऱ्या गृहकर्जाच्या या नव्या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

काय आहे एलआयसी हाउसिंग फायनान्सची नवी योजना ?

  • एलआयसीची ही नवी योजना, कमी सिबिल स्कोअर असणाऱ्या कर्जदारांनादेखील हे गृह कर्ज उपलब्ध करून देते.
  • जर तुम्ही संयुक्तपणे गृह कर्ज घेत असाल, तर त्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर हा एकत्र गृहीत धरला जाणार आहे.
  • एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून गृहकर्ज घेतल्यास अगदी स्वस्त म्हणजेच ६.६६ टक्के व्याजदरामध्ये तुम्ही गृहकर्ज घेऊ शकता.
  • तसेच, जर तुम्ही ३० ते ७५ लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करत असाल, तर तुम्हाला तुमच्या मालमत्ता दराच्या ८० टक्के आणि ७५ लाखांपेक्षा जास्त कर्ज घेत असाल, तर तुमच्या मालमत्ता दराच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल.

या कर्जासाठी कोण पात्र असेल ?

ज्या व्यक्तींना खालीलपैकी कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असल्यास ते गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात –

  • व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी 
  • दवाखाना बांधणे 
  • नर्सिंग होम 
  • कार्यालयीन जागा किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी 

या गृहकर्जासाठी लागू असणारी आणखी महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही www.lichousing.com या वेबसाईटवर जाऊ शकता. 

LICHFL ग्राहक हाउसिंग पोर्टलची वैशिष्ट्ये –

  • हे वेब पोर्टल ग्राहकांना, भागधारकांना व व्यवस्थापनाला विविध माध्यमांद्वारे या पोर्टलमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते.
  • या पोर्टलवरून गृहकर्जाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळू शकते. यासाठी वेबाईटवर जाण्याकरता ग्राहकांना त्यांचे लॉगीन डीटेल्स प्राप्त करणे आवश्यक आहे. 
  • या पोर्टलद्वारे विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मिळू शकतात व ग्राहकांना गृहकर्ज विवरणपत्रदेखील मिळू शकते. 
  • ग्राहकांना कर्ज घ्यायचे असेल तर ते या पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. 
  • ग्राहक त्यांचे इएमआय ऑनलाईन कॅल्क्युलेटरद्वारे देखील मोजू शकतात. 
  • ठेवी व गुंतवणुकीशी संबंधित माहिती ग्राहक ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. 
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या पोर्टलद्वारे ग्राहकांचा वेळ वाचू शकतो.

LIC HFL ग्राहक पोर्टल लॉगइन प्रक्रिया –

पायरी १ – 

LIC HFL च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ग्राहक पोर्टल पर्यायावर ब्क्लिक करा. 

पायरी २ – 

स्वतःचे नाव वापरून लॉगीन करायचे असेल तर पहिल्या पर्यायायावर व जर कर्जाच्या अर्ज क्रमांकाने लॉगीन करायचे असेल तर दुसर्या पर्यायावर क्लिक करा.

पायरी ३ –

यानुसार तुमचे नाव किंवा अर्ज क्रमांक, जन्मतारीख, खाली दिलेला कॅप्चा टाकून सबमिट करा.

LICHFL साठीची नोंदणी प्रक्रिया –

  1. LIC HFL मध्ये नोंदणी करण्यासाठी, www.lichousing.com च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. यानंतर नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
  3. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये कर्ज क्रमांक, कर्ज मंजूर रक्कम, जन्मतारीख यांसारखी माहिती भर व सुरु ठेवा या पर्यायावर क्लिक करा. 
  4. यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, पासवर्ड व सुरक्षा कोड भरा आणि नंतर नोंदणीवर क्लिक करा.
  5. यांनतर मोबाईल/इमेल मोड निवडा. तुमच्या इच्छेनुसार मोबाईल नंबर / इमेल आयडी टाका व सबमिट या पर्यायावर क्लिक करा. 

योजनेची उद्दिष्टे –

  • LIC HFL ला भारतातील सर्वोत्त्कृष्ट गृहनिर्माण आर्थिक सेवा प्रदाता बनायचे आहे.
  • परवडणाऱ्या किमतींमध्ये  कर्ज उपलब्ध करून देणे, शेअरहोल्डिंग क्षमता वाढवणे व ग्राहकांची संवेदनशीलता राखणे. 
  • कर्मचाऱ्यांना कंपनीच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे व प्रत्येक कर्मचाऱ्याला क्रेडीट देणे.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…