Reading Time: 3 minutes

अर्जुन (काल्पनिक पात्र): कृष्णा, केंद्र शासनाने अर्थसंकल्पात जुने भांडण तंटे सोडविण्यासाठी विविध योजना या वर्षी जाहीर केल्या. त्या अनुसरूनच राज्य शासनाने करदाते व विक्रीकर विभाग यातील जुने वाद, विवाद, तंटे मिटवण्यासाठी कायदा आणला आहे, तो काय आहे ?

कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, केंद्र शासनाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात जुने वाद, विवाद मिटविण्यासाठी आयकर व सेवाकरात योजना आणली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने ७ एप्रिल २०१६ रोजी विक्रीकर विभागात येणारे सर्व कर कायदे व त्याच्याशी निगडीत विषयांवरील जुने वाद, विवाद व तंटे मिटविण्यासाठी स्वतंत्र बिल आणले आहे. या कायद्याचे नाव राज्य शासनाने ‘महाराष्ट्र सेटलमेंट ऑफ अरिअर्स इन डिस्प्युट अ‍ॅक्ट २०१६’ असे ठेवले आहे. याचा अर्थ शासन सर्व जुन्या थकीत लवादांना निकाली लावण्याच्या व पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे वर्षानुवर्षे चालणारे वाद व विवाद कमी होतील व शासनाला महसूलही मिळेल व लवादांचा वरील होणारा शासनाचा खर्चही कमी होईल. परंतु करदाते या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना किती प्रतिसाद देतील हे पाहूया!

अर्जुन: कृष्णा, या कायद्याअंतर्गत कोणकोणत्या कायद्यातील वादविवाद सोडविण्यासाठी जाता येईल?

कृष्ण: अर्जुना, हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. विक्रीकर विभागाखाली येणाऱ्या सर्व कायद्यांसाठी हा कायदा लागू होईल. यामध्ये एकूण ११ कर कायद्यांचा समावेश आहे़ त्यातील मुख्य सहा कायदे पुढीलप्रमाणे :

१) केंद्रीय विक्रीकर कायदा १९५६

२) मुंबई विक्रीकर कायदा १९५९

३) व्यवसाय कर कायदा

४) महाराष्ट्र ऊस खरेदी कायदा

५) महाराष्ट्र लक्झरी कर कायदा

६) महाराष्ट्र व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स अ‍ॅक्ट २००२

अर्जुन: कृष्णा, करदाता जर या योजनेअंतर्गत जुन्या वाद -विवादांसाठी अर्ज केला तर त्याला सूट कोणती व कशी मिळेल?

कृष्ण: अर्जुना, शासनाने यामध्ये दोन विभाग केले आहेत.

१) जर विवादित थकबादी ३१ मार्च २००५ पर्यंतच्या वर्षाची असेल तर करदात्याने कर भरल्यास व्याज व दंड भरावा लागणार नाही, म्हणजेच व्याज व दंडाची सूट मिळेल.

२) जर विवादित थकबाकी १ एप्रिल २००५ पासून ते ३१ मार्च २०१५ पर्यंतच्या वर्षाची असेल तर करदात्याने संपूर्ण कर व २५ टक्के व्याज भरल्यास उरलेले ७५ टक्के व्याज व पेनल्टी भरावी लागणार नाही.

अर्जुन: कृष्णा, करदात्याला या योजनेत जाण्यासाठी काय करावे लागेल?

कृष्ण: अर्जुना, ज्या करदात्याला या योजनेअंतर्गत तडजोड करावयाची असेल त्याला पुढील बाबींची पूर्तता करावी लागेल :

१) प्रत्येक कायद्यातील तडजोडीसाठी स्वतंत्र अर्ज दाखल करावा लागेल.

२) अर्ज ३० सप्टेंबर २०१६ च्या आधी नमूद केलेल्या विशिष्ट फॉर्ममध्ये दाखल करावा.

३) करदाता तडजोडीमध्ये जाण्यासाठी अपील घेऊन त्याचा पुरावा दाखल करावा लागेल.

४) करदात्याला संपूर्ण कर भरून त्याचा पुरावा अर्जासोबत द्यावा लागेल.

अर्जुन: कृष्णा, या कायद्यातील इतर मुख्य बाबी कोणत्या?

कृष्ण: अर्जुना, या कायद्यातील इतर मुख्य बाबी पुढीलप्रमाणे :

१) विक्रीकर अधिकारी तडजोडीचा अर्ज कारण सांगून रद्द करू शकतो.

२) करदात्याला कोणत्याही परिस्थितीत रिफंड मिळणार नाही.

३) करदात्याला या तडजोडीनंतर त्या विषयावर अपील करता येणार नाही.

४) कमिशनवर तडजोडीची ऑर्डर दिल्यानंतर १२ महिन्याच्या आत त्यासंबंधी रेकॉर्ड मागवू शकतात व ऑर्डर काढू शकतात.

अर्जुन: या अध्यादेशाखाली आवश्यक रक्कम भरण्याचा कालावधी कसा राहील?

कृष्ण: अर्जुना, आवश्यक रक्कम भरण्याचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

अर्जुन: कृष्णा, या तडजोडीच्या कायद्यातून करदात्याने काय बोध घ्यावा?

कृष्ण: अर्जुना, जीवनात प्रत्येक गोष्ट जशी पाहिजे तशीच होत नसते, प्रत्येकाला कुठे ना कोठे तडजोड करावी लागते. तसेच कर कायद्यामध्येही आहे. करदात्याच्या जुन्या लवादासाठी विभागातील चकरा म्हणजेच ‘तारीख पे तारीख’ होऊ नये, यासाठी तो तडजोडीचा पर्याय निवडू शकतो व मनःशांती मिळवू शकतो. पुढे जीएसटी येणार आहे, त्यासाठी शासन या तडजोडीद्वारे स्वच्छ कर कायदा अभियान राबवू इच्छिते.

– सी.ए. उमेश शर्मा

जीएसटीच्या नियमांत १ जानेवारीपासून झालेले बदल, करदात्यांच्या वर्तणुकीवर कर विभागाचे  बारीक लक्ष?

जीएसटी व प्राप्तीकरमधील टीडीएस संकल्पनेतील मुलभूत फरक

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.