Lockdown: असा करा लॉकडाऊनचा सदुपयोग

Reading Time: 3 minutes

Lockdown

आज आपला संपूर्ण देश कोरोना नावाच्या महामारीशी लढत आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये (Lockdown) आपल्या घरीच राहणं, आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या दृष्टीने हितावह आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यातही येऊ शकतो. कदाचित मागच्या वर्षी सारखा कडक लॉकडाऊन करावा लागेल. परिस्थिती खूपच भयावह आहे. कित्येकांनी आपले जिवलग गमावले आहेत. अशावेळी सतत घरीच एकाच जागी थांबणे कंटाळवाणे होऊ शकते. पण या लॉकडाऊनचा सदुपयोग करून घेऊन आपण पुढील काही गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्यामध्ये सकारात्मक बदल होईल व वेळ सुद्धा छान जाईल.  

पैसा हे आयुष्याचा अंतिम सत्य नसलं तरी जगण्यासाठी पैशांचीच आवश्यकता असते हे कोणीही अमान्य करू शकत नाही. लॉकडाऊनमुळे मिळालेला वेळ एक आव्हान म्हणून स्वीकारा. कदाचित असा वेळ पुन्हा कधी मिळणार सुद्धा नाही. हीच ती वेळ आहे, नवीन काहीतरी शिकण्याची, जीवनाला आकार देण्याची, आपली ध्येये सुनिश्चित करण्याची. पुढील काही गोष्टी करून पहा, नक्कीच तुम्हाला स्वत:मध्ये सकारात्मकता जाणवेल.

हे नक्की वाचा: लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला शांत व आनंदी कसे ठेवाल?

Lockdown: स्वयंशिस्त आणि भविष्याचे नियोजन 

सकाळपासूनच्या वेळेचं नियोजन करा –

 • जर तुमची नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालू असेल, तर तुमचे अभिनंदन! पण नसेल, तर निराश होऊ नका. रोजची सकाळ नवा आशावाद निर्माण करणारी असू द्या. 
 • कंटाळा आलाय, असं म्हणून तासन् तास बिछान्यात पडून न राहाता लवकर उठा. असं म्हणतात जेव्हा काही सुचत नसतं, तेव्हा त्याच उत्तर अगदी “बेसिक” मध्येच असतं. 
 • सकाळी लवकर उठून, घरातच आहे त्या जागेत पारंपरिक पद्धतीची व्यायामशाळा भरवा, ज्यात सूर्यनमस्कारापासून योगासनापर्यंत सगळ्या गोष्टी परिवारासमवेत करून पहा. 
 • दिवसाची सुरुवात उत्साही झाल्याने पुढची कामे सुद्धा छान होतील.

स्वत:ला नवीन गोष्टी शिकवा –

 • युट्युब हे असं माध्यम आहे जिथे तुम्हाला एका क्लिकवर सगळं काही व्हिडिओच्या स्वरूपात पहायला मिळेल, मग यावर अगदी पॉटरी क्लास पासून शेअर मार्केट पर्यंत सर्व प्रकारचे व्हिडीओज उपलब्ध आहेत.  
 • वर्कआउटसाठी टिप्स देखील पहायला मिळतील. थोडक्यात युट्युबवरील व्हिडिओज पाहून तुम्ही अनेक नवीन गोष्टी शिकू शकता. 
 • सध्या दोन प्रचंड महत्वाच्या गोष्टींना- आरोग्य आणि अर्थ यांना जपा. 

इंग्लिश सुधारा / विदेशी भाषा शिका –

 • इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असणे ही करिअरच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे आपलं इंग्लिश भाषेचं ज्ञान वाढवायला यापेक्षा चांगली संधी कधी मिळणार?
 • याचबरोबर एखादी विदेशी भाषा शिकल्यास पर्यायी उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जर्मन, फ्रेंच, जापनीज किंवा स्पॅनिश अशा भाषांमध्ये भाषांतरासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. 
 •  इंटरनेटने या गोष्टीची सुद्धा सोय केली आहे. प्ले-स्टोअरवर या भाषा शिकण्यासाठी “ड्युलिंगो” सारखी काही मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. त्याचा वापर करा.

कोडिंग शिका –

 • काही आयटी कर्मचाऱ्यांसमोर रोज नवीन प्रोग्रामिंग प्रोजेक्ट्सची आव्हाने असतात. कोडिंग येणं बहुतांश वेळा बंधनकारक असतं.
 • हल्ली कोडिंग शिकवणारे बरेच ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. या लॉकडाऊनच्या वेळेत कोडिंग लँग्वेजेस शिकून स्वत:ला अपडेट ठेवू शकता. 

विशेष लेख: आर्थिक संकटांचा पुनर्विचार

सोशल नेटवर्क वाढवा –

 • सध्याच्या काळात प्रस्थापित केलेले मैत्रीचे किंवा आपल्याच क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींशी संबंध दीर्घकाळासाठी तुमच्या सोबत राहू शकतात. 
 • सोशल नेटवर्किंगचा फायदा घेऊन आपण अनेक लोकांशी संवाद साधू शकतो. काही शंका विचारू शकतो, गप्पा ही मारू शकतो.
 • हे जग आभासी वाटत असलं तरी लॉकडाऊनमुळे तसंही आपण कोणाला भेटू शकणार नाहीये, म्हणून सोशल नेटवर्किंगद्वारे अनेक विषयांवर चर्चा ही करता येऊ शकते. 
 • सध्याच्या काळात नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे. 

छंद जोपासा –

 • प्रत्येकामध्ये काहीतरी कला असते. कुणाला छान पेंटिंग येत असतं, तर कुणाला छान गाणं म्हणता येतं. आपल्यातले काही जण उत्कृष्ट गिटारवादक सुद्धा असतात. 
 • या मिळालेल्या वेळेत तुमच्या आवडीच्या गोष्टी करून पहा, कदाचित तुम्हालाच स्वतःची नव्याने ओळख होईल. 
 • आपल्यातली कला मग ती गाण्याची असो किंवा गिटार वाजवण्याची , व्हिडिओ स्वरूपात सोशल मीडियावर नक्की शेअर करा, मित्रमंडळीचा प्रतिसाद पहा, तुमचा उत्साह व आत्मविश्वास अजुनच वाढेल. 

वाचनाची सवय लावा –

 • कदाचित आपल्या ठेवणीत बरीच जुनी पुस्तकं असतील, वेळेच्या अभावी पुस्तकांकडे डोकवून पहायलाही जमत नाही. या काळात ती पुस्तकं बाहेर काढा, धूळ झटकून वाचायला घ्या, नक्कीच छान वाटेल. 
 • पुस्तकं नसतील हल्ली ऑनलाईन स्वरूपात ई-बुक सुद्धा मिळतात आणि कित्येक विषयांवर ब्लॉग्स सुद्धा गुगलवर मिळतात तेही तुम्ही वाचू शकता. नियमित वाचनाने तोटे काहीच होत नाहीत उलट ज्ञानात भरच पडते आणि चांगली सवय देखील लागते. 

थोडक्यात सांगायच तर वर दिल्याप्रमाणे लॉकडाऊनमध्ये करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नक्कीच तुमच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देतील. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Lockdown Marathi Mahiti, Lockdown in Marathi, Lockdown Marathi, 

4 thoughts on “Lockdown: असा करा लॉकडाऊनचा सदुपयोग

 1. वाह… अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेख.😊👍

 2. वाह… अत्यंत उपयोगी आणि माहितीपूर्ण लेख.😊👍

 3. आपले सगळेच लेख अतिशय छान व माहितीपुर्ण असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!