लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला शांत व आनंदी कसे ठेवाल?

Reading Time: 2 minutes

कोरोना या संसर्गजन्य रोगाने सगळीकडे निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. मानवी आयुष्यात अनिश्चितता आली आहे. जगभरातील सर्व देश या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढत आहेत.सतत त्याच त्याच गोष्टी ऐकून मनाचा गोंधळ होऊ शकतो. आयुष्यात १००℅ सुखी झालात तर मग ते आयुष्य कसलं, नाही का? पण या भयावह परिस्थितीत आपण शांत व आनंदी राहण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या. 

आपल्या शरीराची काळजी घ्या. 

 • प्रसार वाहिन्यांद्वारे आरोग्याविषयी अनेक सुचना दिल्या जातात. योग्य गोष्टींच पालन करून आपण स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. नियमितपणे हात धुणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे या गोष्टींकडे लक्ष द्या. 
 • पुरेशी झोप घ्या, निरोगी अन्न खा,मद्यपान टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करा. 

 कोरोना -अभूतपूर्व, अमुलाग्र धोरणात्मक बदलांची अपरिहार्यता आणि संधीही !

क्रियाशील रहा. 

 • लॉकडाऊनमुळे कदाचित तुमचं जिमला जाणं बंद झालं असेल, रोजच्या व्यायामाचं रूटीनही बिघडलं असेल, पण याचा अर्थ तुम्ही बेडवर लोळून रहावं असा नाही. कारण यामुळे अधिकच कंटाळवाणं वाटू शकतं.
 • सकाळी लवकर उठून घरातल्या घरातही योगासने किंवा तुमच्या आवडीचा व्यायाम करा. आवश्यकता वाटल्यास युट्युब किंवा प्ले स्टोअर वरील प्सचीही मदत तुम्ही घेऊ शकता.

कोरोवाविषयीची जास्त माहिती घेऊ नका. 

 • टीव्हीवर, सोशल मीडियावर सतत कोरोनाच्या बातम्या येत असतात. बातम्या ऐकणं चांगलंच आहे पण सद्य परिस्थितीत ही जास्त माहिती तुमच्या डोक्याचा ताप वाढवू शकते. 
 • टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या योग्य गोष्टींकडेच लक्ष द्या. दिवसातून  दोन वेळेस या बातम्या ऐका, या गोष्टींसाठी जास्त वेळ घालवू नका. 
 • अफवांवर विश्वास न ठेवता शहानिशा करून घ्या. 

कोरोना व्हायरसविषयीचे ८ गैरसमज

स्वत:ला इतर गोष्टीत रमवा . 

 • कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे सगळीकडे तणावपूर्ण वातावरण आहे, या सततच्या गोष्टींपासून मानसिक परिणाम होऊ नये यासाठी स्वतःला इतर गोष्टींमध्ये रमवण्याचा प्रयत्न करा. 
 • पेंटींग, गाणे, कांदब-या वाचणे या गोष्टी आणि नवीन कलेची जोपासना करा. 

सकारात्मक जनसंपर्क वाढवा. 

 • ज्यांच्याशी बोलून तुम्हाला मानसिकदृष्ट्या छान वाटते अशा लोकांशी मनमोकळेपणे बोला. यामुळे एकटेपणा जाणवणार नाही. 
 • मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याशी मजेदार गोष्टी शेअर करा, व्हिडिओ कॉल वर बोला. हल्ली ग्रुप व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 
 • सामाजिक संबंध मजबूत असणे ही आनंदी जगण्याची गुरूकिल्ली आहे. 

कोरोना आणि कायदा

मेडिटेशन

 • मानसिक शांततेसाठी मेडिटेशन हा सर्वोत्तम पर्याय आहे. 
 • लक्षात घ्या, या निराशावादी वातावरणात मन शांत असणे महत्त्वाचे आहे. या भीषण परिस्थितीचा विचार करणे कठीण आहे, लॉकडाऊनमुळे घरात बसून आपण कदाचित शारिरीकदृष्ट्या सुरक्षित आहोत पण मन प्रसन्न व शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा किंवा मेडिटेशन करणे आवश्यक आहे. 

नीटनेटकेपणा ठेवा. 

 • मानसिक शांततेसाठी अंतर्बाह्य परिस्थिती परिणामकारक ठरते. म्हणून आपण ज्या ठिकाणी राहतो, वावरतो ती जागा म्हणजे आपले घर व्यवस्थित व नीटनेटके ठेवणं आवश्यक आहे. 
 • एक गोष्ट कदाचित तुम्हाला पटणार नाही, प्रत्यक्षात आपलं घर स्वच्छ व नीटनेटके ठेवून मन सुद्धा प्रसन्न व शांत राहील. ]

तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

वेळेचा आणि संधीचा सदुपयोग

 • लॉकडाऊनमुळे मिळालेला हा वेळ सक्तीचा वाटत असला तरी यामुळे तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. 
 • युट्युब सारख्या माध्यमाचा वापर करून तुम्ही चांगला रेसिपी बनण्यापासून ते गिटार शिकण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करू शकता. 
 • वर्क आऊटचे व्हिडिओज पाहून शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी तयारी करू शकता. 
 • सध्या नवनवीन ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध होत आहेत, यातील काही कोर्सेस निवडून तुम्ही स्वतःला अपडेट करू शकता. 

सकारात्मक रहा. 

 • आनंद ही पाठलाग करून मिळणारी गोष्ट नव्हे किंवा शांतता ही अशीच मिळत नसते. ज्या गोष्टींना जास्त कवटाळतो ती गोष्ट पहिल्यांदा दूर जाते त्यामुळे आनंदी रहायचं असा आग्रह धरून पाठपुरावा करत बसाल तर याचा कदाचित उलट परिणामही होऊ शकतो. 
 • म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीत आसपासच्या वातावरणचा आपल्यावर परिणाम होऊ नये यासाठी सकारात्मक गोष्टी करा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ही परिस्थिती हाताळा. 

आर्थिक आणीबाणीची शक्यता अजिबात नाही…

कोरोनाच्या संसर्गातून कुठलेही देश सुटले नाहीत, प्रत्येक देशाला या कोरोना नावाच्या निर्दयी राक्षसाने वेठीस धरले आहे. तरीही आपण घाबरून न जाता परिस्थितीचा सामना करायला हवा. लॉकडाऊनचे नियम पाळून स्वतःला शांत, आनंदी व सकारात्मक ठेवण्यासाठी वरील उपाय करून पहा. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!