मंदीमध्ये संधी
Reading Time: 3 minutes

मंदीमध्ये संधी

कोविड-१९ महामारीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन तर विस्कळीत झालेच, त्याबरोबर औद्योगिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला आहे. एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेला चांगलाच हादरा बसला आहे. तरीही मंदीमध्ये संधी साधत अनेक व्यवसायांनी नफा कमावला आहे. लहान मोठे उद्योग-धंदे डबघाईला आले असले तरी अनेक नव्याने निर्माण झालेले व्यावसायिक मात्र धंद्यात पाय रोवून उभे आहेत.

हे नक्की वाचा: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?

मंदीमध्ये संधी: जोमात चाललेले हे ७ व्यवसाय 

१.  आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र 

  • कोविड-१९ महामारी मुळे, सर्वांना कुठेतरी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याची जाणीव झाली आहे. 
  • त्यामुळे आरोग्य क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये आहार, व्यायाम आणि आरोग्य विषयक इतर महत्वाच्या गोष्टीचे मार्गदर्शन केल्या जाते. हा एक दीर्घकाळ चालणारा व्यवसाय आहेत.       

२.  इ-लर्निंग 

  • सध्याच्या काळात शाळा आणि वर्ग सुरु नसल्या कारणाने ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. 
  • जवळपास सर्वच शाळा व  महाविद्यालये इंटरनेटच्या माध्यमातून वर्ग घेताना आपण पाहत आहोत. त्याचबरोबर खाजगी कोचिंग क्लास संस्थादेखील ऑनलाईन क्लास घेत आहेत. परंतु,अर्थार्जनाच्या कठीण व अनिश्चित काळात पालक मात्र फी भरून बेजार होत आहेत. अशा परिस्थितीत ते एक चांगला व स्वस्त पर्याय शोधत आहेत. 
  • खाजगी कोचिंग क्लासची भरमसाठ फी भरण्यापेक्षा महिन्याला माफक फी भरून कठीण विषयापुरता क्लास लावणं पालकांना सोईस्कर वाटत आहे. 
  • याचबरोबर विविध हॉबी क्लासेस ऑनलाईन चालू आहेत. मुलं घरात असल्यामुळे त्यांना त्यांच्या छंदांसाठी खूप वेळ मिळतोय. त्यामुळे सध्या अशा क्लासेसची चांगली चलती आहे.  
  • त्यामुळे सध्याच्या काळात हा पर्यायी तसेच, मुख्य उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. हा मार्ग कदाचित निरंतर चालण्याची शक्यता आहे.  

महत्वाची लेख: फ्रेंचाइजी व्यवसाय सुरु करण्यापूर्वी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

३. आर्थिक नियोजन सल्लागार 

  • कोरोना महामारीच्या काळात बहुतांश लोकांना आर्थिक नियोजनाचे महत्व पटले आहे. अधिकाधिक लोक आर्थिक नियोजनाकडे वळत आहेत. 
  • आगामी काळात आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे काळाची गरज आहे असे  म्हंटलं तर अयोग्य नाही. 
  • आपल्याकडे असलेल्या संपत्तीचे योग्य नियोजन कसे करावे याबाबत सर्वसामान्य जनतेला पुरेसे ज्ञान नसल्याने ते आर्थिक सल्लागारांची मदत घेतात. 
  • आर्थिक नियोजन सल्लागार आपल्या पैशाची योग्य गुंतवणूक करण्यास मदत करतो. 
  • यामध्ये घरून काम करणं सहज शक्य आहे. भविष्यात या व्यवसायाला नक्कीच वृद्धी मिळू शकेल. 
  • शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि बऱ्याच क्षेत्रात काम करणारे तरुण, अनुभवी लोक याप्रकारे व्यवसाय सुरु करून आर्थिक गुंतवणुकी बाबत समुपदेशनही करतात . 

४.संगणकीय साधने (रिमोट वर्किंग सॉफ्टवेअर)

  • सध्या डिजिटल क्षेत्रात व्यवसाय संबंधी माहितीची देवाण घेवाण इंटरनेटच्या माध्यमातून होते. त्यात जरी प्रत्यक्ष भेट होत नसली तरी विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे महत्वाच्या मुद्यांवर समोरासमोर चर्चा होऊ शकतात. 
  • असेच काही अँप्लिकेशन तयार करणाऱ्या स्टार्ट अप कंपनी सध्या जोरात कमाई करत आहेत. 
  • अगदी घरी बसून, कमी खर्चात आणि कमी वेळेत हा व्यवसाय सुरु होऊ शकतो. संगणक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, गृहिणी, विद्यार्थी देखील हे काम करू शकतात. हा एक निष्क्रिय उत्पन्नाचा सर्वोत्तम मार्ग आहे. 

विशेष लेख: आर्थिक मंदीचा  सामना कसा कराल?

५. ई -कॉमर्स 

  • हा नवीन इंटरनेट युगातला सर्वाधिक गाजलेला ऑनलाईन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या उत्पादनाची खरेदी आणि विक्री करून घर बसल्या आपण कमाई करू शकता. 
  • कोरोनाच्या काळात जेव्हा कुणालाही घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती तेव्हा या व्यवसायाने हा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी भरपूर पैसे कमविले. 
  • कमी खर्चात आणि कमी वेळेत उत्पन्न मिळवून देणारा  हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय असा व्यवसाय आहे. स्टार्ट अप पासून ते मोठ्या प्रमाणापर्यंत या व्यवसायाची  व्याप्ती आहे. 

६. रोग निदान केंद्र (पॅथॉलॉजि लॅब सेंटर )

  • धावपळीच्या काळात आज सर्वांनाच घरच्या घरी सर्व सोयी सुविधा पुरविल्या जातील असे काही सेवार्थी हवे आहेत. त्यामध्ये वैद्यकीय गरज हि सर्वात आधी आहे. 
  • कोरोना काळात तर या क्षेत्रात भरपूर मागणी होती. निरनिराळ्या वैद्यकीय चाचण्या करवून घेण्यासाठी रोग निदान केंद्राची आवश्यकता नेहमीच होती आणि ती भविष्यातही असेल. त्यामुळे पॅथॉलॉजि लॅब सेंटर हा स्टार्ट-अप व्यवसाय म्हणून उभा केल्यास येत्या काळात मोठ्या प्रमाणावर यशाची हमी १००% आहे.

७. स्थावर जागा व्यवस्थापन 

  • सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना जागा आणि व्यवसायाशी निगडित इतर गोष्टी उपलब्ध करून देण्याचे काम ही स्टार्ट अप व्यवस्थापन कंपनी करते.
  • घरी बसून, कुठेही प्रत्यक्ष हजेरी न लावता या कंपनी आपल्याला सर्वतोपरी सेवा पुरवतात. नवीन काळाचा नवीन व्यवसाय जो स्पर्धेच्या युगात शेवटपर्यंत तग धरून राहू शकतो. 

कोरोना महामारी येण्याअगोदरची अर्थव्यवस्था फार वेगळी होती. वर नमूद केलेले काही उद्योग स्टार्ट अप स्वरूपाचे असले तरीही त्यांना भविष्यात क्रांती घडविण्यासाठी बराच वाव आहे हे निश्चित. काळाची गरज ओळखता या व्यवसायांना चांगले दिवस येतील. येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य काय असेल हे सांगणे अवघड आहे. कोरोना संपुष्टीचा काळ अनिश्चित आहे. असे असले तरीही, कोरोना महामारीनंतरही हे व्यवसाय चालू राहण्याची शक्यता चांगली आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.