मराठी भाषा दिन
Reading Time: 2 minutes

मराठी भाषा दिन

“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा ….” आज २७ फेब्रुवारी. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. आजचा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

  • मराठी भाषा जितकी सोपी तितकीच समृद्ध आहे. समजायला सोपी असणारी ही भाषा वळवावी तशी वळते.
  • या भाषेला अनेक लोकप्रिय साहित्यिक लाभले. विनोदी, रहस्यकथा, ललित, प्रवासवर्णन, काव्य इत्यादी प्रत्येक प्रकारचे वाचनीय साहित्य मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे.
  • आजच्या आधुनिक डिजिटल माध्यमातही मराठी भाषेतील भरपूर साहित्य उपलब्ध आहे.
  • साहित्याने समृद्ध आणि श्रीमंत असणाऱ्या मराठी साहित्य जगताच्या चंद्रावरचा एक डाग म्हणजे डिजिटल माध्यमात आर्थिक विषयांची संपूर्ण माहिती देणारी एकही वेबसाईट उपलब्ध नव्हती.
  • इंग्रजीमध्ये यासाठी शेकडो वेबसाईट असणं काही नवीन नाही. हिंदीमध्येही अशा वेबसाइट्सची संख्या लक्षणीय आहे. मग मराठीतच फक्त ‘आर्थिक विषयासाठी’ अशी एकही वेबसाईट का नाही? असा प्रश्न आमहाला पडला. ही कमी पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आम्ही आर्थिक विषयांची माहिती संपूर्णपणे मराठीतून देणारी अर्थसाक्षर.कॉम नावाची वेबसाईट चालू केली.
  • गेल्या तीन वर्षांत आम्हाला ज्या काही प्रतिक्रिया मिळाल्या किंवा अमुक एका विषयांवर माहिती द्या, असं सांगणारे मेसेजेस आले. त्यावरून आमच्या असं लक्षात आलं की अनेकांना आर्थिक विषयांमधील साध्या साध्या गोष्टींची माहिती नाही. चेकवरच्या सहीपासून बँकेचे सगळे व्यवहार मराठीत करता येतात हेच अनेकांना माहिती नसतं.
  • चेकवर मराठी सही चालेल का? चेकवर मराठीतून नाव लिहिलं तर ‘चेक बाउंस’ तर होत नाही ना? बँकेत मराठीतून अर्ज दिला तर चालेल का? आरोग्य विम्याची खरंच गरज आहे का? असे अनेक प्रश्न विचारणारे मेसेजेस अगदी सुशिक्षित माणसांकडूनही आम्हाला येत असतात.
  • आम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि वेबसाईटची लोकप्रियता बघता मराठी भाषेमध्ये आर्थिक घडामोडींवर भाष्य करणाऱ्या, आर्थिक घटकांची माहिती देणाऱ्या वेबसाईटची किती नितांत आवश्यकता होती हे स्पष्ट होतंय.
  • अगदी सर्वसामान्य अर्थशास्त्रीय संकल्पनांपासून ते देशांतर्गत तसेच जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत विविध विषयांवरची माहिती,सरकारी योजना, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, आर्थिक नियम, इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर सोप्या भाषेतील लेख प्रसिद्ध करून आम्ही मराठी नागरिकांना अर्थसाक्षर करण्याचा सतत प्रयत्न करत असतो.  
  • आपल्या भाषेतून बोललेलं, वाचलेलं अगदी सहज समजतं. पण काही काही इंग्रजी शब्द इतके अंगवळणी पडले आहेत की त्यासाठी मराठी शब्द वापरायचा ठरवलं तरी समोरच्याला पटकन कळेल का नाही, अशी शंका मनात येते. याचं कारण म्हणजे इंग्रजांनी आपल्यावर अनेक वर्ष केलेलं राज्य आणि त्यामुळे आपल्या शिक्षण पद्धतीवर असणारा इंग्रजी भाषेचा जबरदस्त प्रभाव!
  • याच कारणामुळे आमच्या लेखांमध्ये आम्ही मराठी शब्दासोबत कंसात ‘बोली भाषेतील’ इंग्रजी शब्द आवर्जून लिहितो. त्यामुळे लेख वाचताना वाचकांच्या मनात कुठलाही संभ्रम राहणार नाही. तसंही एखादा इंग्रजी शब्द वाक्यात आल्याने मराठीची शान कमी होत नाही. मराठी भाषा नेहमीच समृद्ध होती, आहे आणि राहणार!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

टीम अर्थसाक्षरतर्फे मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.