मार्जिन प्लेज अनप्लेज नियम
Reading Time: 4 minutes

मार्जिन प्लेज व अनप्लेज नवीन नियम 

1 सप्टेंबर 2020 पासून मार्जिन प्लेज व अनप्लेज संदर्भातील नवीन नियम लागू झाले आहेत. मार्जिन प्लेज व अनप्लेज संदर्भातील मूलभूत माहिती आपण मागच्या भागात घेतली होती, आजच्या भागात मार्जिन प्लेज व अनप्लेज संदर्भातील नवीन नियम कोणते आहेत याबद्दल माहिती घेऊया. 

संबंधित लेख: शेअर ट्रेडिंग: मार्जिन प्लेज/ अनप्लेज नवे नियम, कोणास तारक? कोणास मारक?

मार्जिन प्लेज व अनप्लेज संदर्भातील नवीन नियम 

  • हे प्लेज मार्क केलेले शेअर्सचे मान्य केलेले मूल्य+ट्रेडिंग खात्यातील शिल्लक+शेअर विक्री करून ते पे इन पूर्वी दिले असल्यास त्याचे मूल्य यांच्या एकत्रित  किमतीवर दिले जाईल.
  • रोखीचे व्यवहार करताना त्या दिवशी व्यवहाराच्या 20% रक्कम रोख अथवा मार्जिन प्लेज रूपात आधी दिल्याचे दाखवावे लागेल. त्यांच्या खात्यात हे शेअर्स सौदापूर्ती नंतर म्हणजेच T+2 नंतर खात्यात जमा झाल्यावरच त्याच्या मान्य केलेल्या आणि पेजमार्क केलेल्या मूल्यावरच मार्जिन लेव्हरेज मिळेल.
  • आज खरेदी करून उद्या लगेच विक्री करणारे ट्रेडर्स (BTST) याना त्यांच्या व्यवहाराबद्दल खरेदीसाठी व्यवहाराच्या 20%+ विक्रीच्या 20% म्हणजेच 40% रकमेचे मार्जिन लेव्हरेज द्यावे लागेल.
  • रोख विक्री व्यवहार करणाऱ्याना त्यांनी विक्री केलेले शेअर्स त्याच दिवशी खात्यातून वजा केल्यास (early pay in) दुसऱ्या दिवशी अन्यथा T+ 2 ला व्यवहारपूर्ती झाल्यावर खरेदीसाठी उपयोगात आणता येईल.
  • खरेदी केलेल्या शेअर्सची सौदापूर्ती ही T+2 चे पे इन होण्यापूर्वी करावीच लागेल ही पूर्तता मार्जिन लेव्हरेज वापरून करता येईल. पे आउट मधून येणाऱ्या शेअर्सच्या मूल्यानुसार मार्जिन फायदा पुन्हा वापरण्यास त्याचा उपयोग करता येईल.
  • मिळालेला फायदा तो कॅश अथवा डेरीव्हेटिव्ह पुढील व्यवहार करताना झाला तरी लगेच वापरता येणार नाही तो अनुक्रमे T+2, T+1 ला मिळेल. तोटा झाल्यास त्याची भरपाई त्वरित करावी लागेल अथवा जास्तीचे मार्जिन लेव्हरेज देऊनही तो करता येईल.

 इतर लेख: Demat Account FAQ- डिमॅट अकाऊंट संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे

यासर्वाचा सर्वाधिक परिणाम-

  • डे ट्रेडर्स, बी टी एस टी ट्रेडर्स आणि एफ एन ओ ट्रेडर्सवर होईल यापूर्वी त्यांनी ब्रोकरकडे ठेवलेल्या रकमेच्या आणि होल्डिंग मधील शेअर्सच्या काही पट मिळणारे मार्जिन लेव्हरेज न मिळता ते फक्त प्लेज केलेल्या शेअर्सवरच मिळेल.
  • जे सर्वसाधारण गुंतवणूकदार गैरव्यवहार टाळण्यासाठी ट्रेडिंग खाते एकीकडे आणि डी मॅट खाते दुसरीकडे ठेवतात त्यांना रोखीचे व्यवहार करण्यास ब्रोकरकडे डी मॅट खाते सक्तीने उघडावे लागेल. नाहीतर उलाढालीनुसार सेल मार्जिन मर्यादा मिळण्यासाठी प्लेज करून घ्यावे लागेल. त्यामुळे कुठेही आपल्या मर्जीनुसार ट्रेडिंग आणि डी मॅट खाते उघडण्याचा गुंतवणूकदाराचा हक्क त्याचा उपयोग नसल्याने कागदोपत्री राहील.
  • हे नियम म्युच्युअल फंड, परकीय गुंतवणूकदार याना लागू नाहीत ही यातील मोठी विसंगती आहे.

सीडीएसएल (CDSL) कडील शेअर प्लेज/ अनप्लेज करण्याची पद्धती- 

  • आपल्या शेअर्सची यादी असलेल्या पानावर जाऊन आपण तारण ठेवू इच्छित असलेले शेअर्स तारण ठेवण्यास निवडा.
  • असे करण्यासाठी आपणास ब्रोकरकडून थेट आपल्या पेजवर जाणारी लिंक ही येऊ शकते त्याचाही वापर करता येईल. आपला पॅन टाकून ती लिंक ओपन होईल. 
  • एक्सचेंजला मान्य असलेले कोणतेही शेअर्स अंशतः अथवा पूर्ण निवडू शकता, प्लेज पर्याय निवडा. आपण प्लेज केलेले शेअर्स अनप्लेज केल्याशिवाय विकता येत नाहीत, त्यामुळे नजीकच्या काळात विकण्याचे शेअर्स प्लेज करू नका.
  • आपण किंवा आपल्या ब्रोकरने प्लेज मान्य करसण्यासाठी शेअर्सची मान्यतेसाठी सि डी एस एल आपल्या मेलवर / मोबाईलवर लिंक पाठवेल.
  • लिंकला भेट दिल्यावर ओ टी पी तयार करण्याचा पर्याय येईल तो मेलवर/ मोबाईलवर मिळेल. हाच ओटीपी प्लेज मान्य करण्याची विनंती करताना सिडीएसएलच्या आपल्या पानावर टाकावा लागेल.
  • प्लेज मंजूर झाल्यावर त्याचा वापर व्यवहार करण्यास होईल. विहित मर्यादेत व्यवहार करण्याची परवानगी आपल्याला मिळेल. प्लेज मार्क केलेले शेअर्स आपल्या खात्यात राहतील. अनप्लेज केल्याशिवाय ते विकता येणार नाहीत.
  • आपल्या होल्डिंग पेजवर जाऊन अनप्लेज पर्याय निवडल्यास त्यावर ब्रोकरकडून कोणतेही कर्जबोजा नसल्यास क्लिअरिंग कॉर्पोरेशन कडून अन प्लेज केले जाऊन मोकळे होतील आणि ते व्यवहार योग्य असल्याचे दाखवले जाईल.
  • थोड्याफार फरकाने एनएसडीएल या दुसऱ्या डिपॉझिटरी कडेही अशाच प्रकारे व्यवहार होतील.
  • दिवसातून दोनदा डिपॉझिटरीकडे आलेल्या प्लेज/ अनप्लेज विनंत्या विचारात घेतल्या जातील.
  • विशिष्ट वेळापूर्वी आलेली विनंती त्याच दिवशी त्यानंतर आलेली विनंती दुसऱ्या दिवशी मंजूर केली जाईल. एक कंपनी प्लेज/ अनप्लेज करण्यास सिडीएसएल ₹10/- तर एन एस डी एल प्लेज ₹25/- अन प्लेज विनामूल्य अशी आकारणी प्रस्तावित असून प्लेज/ अनप्लेज ची दैनिक वेळ मर्यादा व दर यांची आपल्या डिपॉझिटरीकडून खात्री करून घ्यावी.
  • 10% किंवा 1 लाख मार्जिन कमी पडल्यास त्यावर अर्धा तर त्यावरील फरकावर एक टक्का दंड आकारण्यात येऊन लागोपाठ तीन दिवस मार्जिन कमी पडल्यास / महिन्यातून पाचहून अधिक वेळा झाल्यास पाच टक्के दराने दंड आकारण्यात येईल.

या सर्व घडामोडींच्या अनुषंगाने –

मला माझ्या ब्रोकरकडून आलेल्या संदेशानुसार बदललेल्या नियमांची / प्लेज – अन प्लेज कसे होईल याची माहिती देण्यात आली. खरेदी/ विक्री साठी मार्जिन प्लेज द्यावे लागेल या संबंधात प्लेज मान्य करण्याची लिंकही आली. मी पोसिशनल ट्रेडिंग करतो, डे ट्रेडिंग, डेरीव्हेटिव्ह ट्रेडिंग करीत नसल्याने आणि माझे डी मॅट खाते ब्रोकरकडे असल्याने-

  • रोखीच्या व्यवहारात सौदा खरेदी सौदा झाल्या झाल्या मी ताबडतोब पैसे देत होतो. आता आधी पैसे किंवा आगाऊ मार्जिन द्यावे लागेल हे मान्य. मात्र विक्री केली तर त्याच दिवशी माझ्या डी मॅट खात्यातून शेअर्सची वजावट होते म्हणजेच अर्ली पे इन घेत असतानाही, विक्री व्यवहारावर मार्जिन? ते का? ही कोणती जगावेगळी व्यवहार पद्धत!
  • अर्ली पे इन समोर डिलिव्हरी हमी 100% असताना, मला खरेदी का करता येणार नाही?  याची समाधानकारक उत्तरे संबधित आणि त्यांचे वरीष्ठ यांना फोन करूनही मिळाली नाहीत. मी अनेकांच्या संपर्कात असून प्रत्येक फर्म स्वतःच काहीतरी नियम करून सेबीच्या नावावर त्याची पावती फाडत असावेत असे वाटते अर्ली पे इन केसेसमध्ये मार्जिन घेण्याची सेबीची सूचना नाही. तरीही ब्रोकर्स विक्रीसाठी मार्जिन मागत असतील याबाबत निश्चित खुलासा होणे जरुरीचे आहे.
  • तसेच मार्जिन प्लेज / अन प्लेज गुंतवणूकदारांच्या हिताचे असेल तर त्यातून म्युच्युअल फंड, परदेशी गुंतवणूकदार यांना सूट कशासाठी? या सवलतींचा फायदा घेऊन नवीन महाघोटाळा होण्याची सर्वांनी वाट पहायची का?

लेखातील माहितीत अनावधानाने त्रुटी राहिली असेल, तर त्वरित निदर्शनास आणून दिल्यास त्याप्रमाणे दुरुस्ती करता येऊन त्यास अधिक उपयुक्त बनवता येईल. संदर्भ म्हणून तो उपयोगी पडेल यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आणि चिकाटीने एवढा मोठा लेख वाचल्याबद्दल आभार.

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…