MG George Muthoot
https://bit.ly/3sS2T7S
Reading Time: 2 minutes

एम.जी. जॉर्ज मुथूट (MG George Muthoot)

मुथूट ग्रुपचे अध्यक्ष एम.जी. जॉर्ज मुथूट (MG George Muthoot) यांचे काल संध्याकाळी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. 

सोने- तारण कर्जासारख्या  क्षेत्रात सार्वजनिक व खाजगी बँकांच्या स्पर्धेला तोंड देत स्वतःची मक्तेदारी निर्माण करणाऱ्या मुथूट फायनान्स कंपनीच्या यशामध्ये एम.जी. जॉर्ज यांचा सिंहाचा वाटा होता. कोणत्याही कारणाने एकही शाखा बंद न करता मुथूट फायनान्स लि. ही भारतातील सर्वात मोठी सोने-तारण कर्ज (Gold Loan) देणारी कंपनी म्हणून नावारूपास आली ती एमजी जॉर्ज यांच्या कुशल नेतृत्वामुळे! 

आजच्या घडीला कंपनीचे बाजार भांडवल 51 हजार कोटींपेक्षा जास्त असून एकूण उत्पन्न 8 हजार 722 कोटी रुपये आहे.

मुथूट कुटुंब मूळचे दक्षिण-मध्य केरळमधील पट्टानमथिट्टा जिल्ह्यातील कोझेनचेरी येथील असून, मुथूट ग्रुप कंपनीचे मुख्यालय कोची येथे आहे. परंतु कंपनीच्या शाखा दक्षिणेपासून उत्तरेच्या जम्मू-काश्मीर पर्यंत सर्वत्र पसरलेल्या आहेत. वर्षानुवर्ष मुथूट फायनान्स कंपनीची ओळख बनलेल्या लाल-पांढऱ्या रंगाचा सोने तारण कर्जाचा बोर्ड माहिती नसणारं क्वचितच कोणी असेल. दोन वर्षांपूर्वीच अमिताभ बच्चन, धोनी, हरभजन सिंग आदी सेलिब्रेटींनी केलेली मुथूट फायनान्स कंपनीची जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. 

एमजी जॉर्ज मुथूट (MG George Muthoot)

  • जॉर्ज मुथूट यांचा जन्म 2 नोव्हेम्बर 1949 साली कोझेनचेरी येथे झाला. 
  • एम. जी. जॉर्ज मुथूट मुथूट ग्रुपचे संस्थापक मुथूट निनन मथाई यांचे नातू आणि मुथूट ग्रुपच्या वित्तीय सेवा संस्थेचे संस्थापक एम. जी. जॉर्ज मुथूट यांचा तिसरा मुलगा होते. 
  • एम. जी. जॉर्ज यांनी मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. 
  • शिक्षण पूर्ण झाल्यावर जॉर्ज मुथूट कुटुंबाच्या बँकेत ऑफिस असिस्टंट म्हणून रुजू झाले आणि 1979 साली त्यांची बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. 
  • फेब्रुवारी 1993 मध्ये त्यांची मुथूट समूहाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. 
  • एम.जी. जॉर्ज मुथूट यांच्या नेतृत्वात मुथूट ग्रुपने जगभरात 5000 हून अधिक शाखा आणि 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये विस्तार केला.
  • आपल्या कौटूंबिक व्यवसायाव्यतिरिक्त एम.जी. जॉर्ज मुथूट यांनी इतरही अनेक जबाबदार पदे सांभाळली आहेत. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यासारखी पदे म्हणजे –
    • केरळमधील ऑर्थोडॉक्स चर्चचे विश्वस्त 
    • फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (FICCI) राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यत्व
    • केरळ राज्य परिषदेचे अध्यक्षपद 

एम.जी. जॉर्ज मुथूट यांना मिळालेले पुरस्कार 

  • २००१ मध्ये भारतीय उद्योगातील योगदानाबद्दल एम. जी. जॉर्ज मुथूट यांना महात्मा गांधी राष्ट्रीय फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  
  • २०१२ मध्ये त्यांना व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility) साठी गोल्डन पीकॉक अवॉर्डने गौरविण्यात आले होते. जानेवारी 2013 मध्ये, मुथूट फायनान्सला वित्तीय समावेशासाठी SKOH पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच मनिपाल विद्यापीठातर्फे 2015  साली उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • ऑक्टोबर 2011 च्या फोर्ब्स यादीमध्ये भारतीय अब्जाधीशांच्या यादीत एम.जी. जॉर्ज मुथूट 50 व्या क्रमांकावर होते. त्यावेळी त्यांची संपत्ती होती 1.10 अब्ज डॉलर्स!

एम.जी. जॉर्ज मुथूट यांच्या निधनाने भारतीय उद्योग जगतातील एक तेजस्वी तारा हरपला आहे. त्यांच्या पश्चात त्याची पत्नी व २ मुले असा परिवार आहे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: MG George Muthoot Marathi, MG George Muthoot in Marathi, MG George Muthoot Marathi Mahiti, Muthoot Finance Marathi Mahiti, Muthoot Finance in Marathi, Muthoot Finance Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.