Reading Time: 2 minutes

एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना रक्कम वाढवण्याचा आणि कमी करण्याचा पर्याय असतो. 

  1. नियमित एसआयपी – 
  • ‘नियमित एसआयपी’ हा पर्याय एसआयपीच्या सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी एक आहे. येथे आपण एका विशिष्ट कालावधीसाठी नियमितपणे निश्चित रकमेची गुंतवणूक करता. 
  • आपण एसआयपीमधील गुंतवणूक ही मासिक, द्वि-मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक पद्धतीने करू शकता.
  • गुंतवणुकीचा परतावा मिळवण्यासाठी शिस्तबद्ध राहावे लागते. नियमित एसआयपी करत असाल तर एका विशिष्ट कालावधीनंतर चांगला परतावा मिळतो. 
  1. टॉप अप एसआयपी – 
  •  टॉप अप एसआयपींना ‘स्टेप अप एसआयपी’ असेही म्हटले जाते. या एसआयपीमध्ये वेळोवेळी मासिक हप्ते वाढवता येतात. 
  • आपण सुरुवातीला एसआयपीचे हप्ते कमी रकमेचे भरत असाल तर काही काळाने ते हप्ते वाढवत न्यावे लागतात. 

नक्की वाचा : गुंतवणूकदारांचे प्रकार

  1. फ्लेक्सिबल एसआयपी – 
  • आपण ;फ्लेक्सिबल एसआयपी’ मध्ये गुंतवणूक करत असाल तर गुंतवणुकीत बदल करण्याची लवचिकता मिळते. एसआयपी रकमेच्या किंवा एसआयपीच्या परताव्यानुसार बदल करता येतो. 
  • आपल्याला एसआयपीच्या हप्त्यामध्ये बदल करायचा असेल तर आपण संबंधित म्युच्युअल फंडच्या कस्टमर केअरला माहिती देऊन करू शकता. 
  • आपल्याला एसआयपीमध्ये बदल करायचा असेल तर पुढील देय तारखेच्या एक आठवडा अगोदर सांगायला हवं. 
  1. ट्रिगर एसआयपी – 
  • शेअर बाजारात एखादी विशिष्ट घटना घडल्यावर ट्रिगर एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. आपल्याला या एसआयपी मधून नफा कमवायचा असेल तर शेअर बाजाराची माहिती असणे आवश्यक आहे. 
  • आपण ट्रिगर एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर तुमच्याकडे पुरेसा वेळ आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल आणि आपल्याकडे वेळ नसेल तर हा एसआयपी पर्याय आपल्यासाठी नाही

नक्की वाचा : Mutual Fund SIP : कधी करावी ‘एसआयपी’ मध्ये गुंतवणूक ?

  1. शाश्वत एसआयपी – 
  • शाश्वत एसआयपी हा पर्याय नियमित एसआयपीसारखाच असून फक्त त्यामध्ये असणारा गुंतवणुकीचा कालावधी हा निश्चित नसतो. 
  • आपल्याला शाश्वत एसआयपी बंद करायची असेल तर संबंधित म्युच्युअल फंडाच्या कस्टमर केअरला कॉल करून सांगावे लागते. एसआयपी बंद होईपर्यंत त्यामध्ये गुंतवणूक करत राहावी लागते. 
  • आपण शाश्वत एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला दीर्घकालीन चक्रवाढ दराचा फायदा मिळतो. आपण शाश्वत एसआयपीमधून आपली गुंतवणूक कधीही रिडिम करून घेऊ शकता. 
  1. मल्टी एसआयपी – 
  • मल्टी एसआयपी हा पर्याय एकाच एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देत असतो. 
  • विविध म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला एखाद्या म्युच्युअल फंडातून कमी परतावा मिळाल्यास दुसऱ्यातून तो भरून काढणे शक्य होते. 
  1. विम्यासह एसआयपी – 
  • विम्यासह एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला अनेक फायदे मिळतात. आपण या एसआयपीमध्ये गुंतवणूक घेतल्यावर म्युच्युअल फंडाकडून जीवन विमा संरक्षण दिले जाते. 
  • या विमा पॉलिसी गुंतवणुकीच्या काळात अकाली मृत्यू झाल्यास गुंतवणूकदार व्यक्तीला एकरकमी पेमेंट दिले जाते. 
  • आपल्याला कव्हरेज रक्कम एसआयपीच्या द्वारे गुंतवलेल्या रकमेनुसार बदलू शकतात. 

निष्कर्ष : 

  • म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला एसआयपी हा सर्वात उत्तम पर्याय आहे. 
  • आपण एसआयपी सुरु करण्याच्या आधी इतर गुंतवणूकदारांशी चर्चा करू शकता. त्यानंतरच कोणत्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची आहे, याबद्दलच निर्णय घ्या. एसआयपी मध्ये गुंतवणूक करत असाल तर सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकाळ गुंतवणुकीचा निर्णय घ्या. 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…