Arthasakshar franklin templeton India Facts
Reading Time: 3 minutes

म्युच्युअल फंड सही कितने?

गेले काही दिवस मी विविध लेखातून तुलनात्मक दृष्ट्या सुरक्षित, मुदत ठेवीस पर्याय समजले जाणारे, आयकराच्या दृष्टीने करदेयता कमी करणारे असे बहुगुणी ‘डेट फंड’, भविष्यात त्यांनी गुंतवलेल्या कर्जरोख्यातून व्याज, मुद्दल न मिळण्याच्या शक्यतेने अधिक धोकादायक ठरतील असा अंदाज केला होता. 

फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया – जरा चुकीचे, जरा बरोबर…

  • बाजारात झालेल्या तीव्र बदलाने घाबरून जाऊन लोक त्यांच्या एस आय पी बंद करीत आहेत, तर काहीजण आपली पैशांची खरीखुरी गरज भागवण्यासाठी गुंतवणूक काढून घेत आहेत. अशा परिस्थितीत फ्रँकलिन टेम्पलशन इंडिया एसेट मॅनेजमेंट कंपनी यांनी आपल्या चालू असलेल्या ६ निरंतर डेट योजना २४ एप्रिल २०२० पासून बंद करून गुंडाळण्याचे ठरवले आणि गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. या योजना  
    1. Franklin India Low Duration Fund,
    2. Franklin India Dynamic Accrual Fund, 
    3. Franklin India Credit Risk Fund, 
    4. Franklin India Short Term Income Plan, 
    5. Franklin India Ultra Short Bond Fund and 
    6. Franklin India Income Opportunities Fund
  • यामुळे गुंतवणूकदारांना आता यात गुंतवणूक करता येणार नाही त्याचप्रमाणे आपल्या मर्जीनुसार गुंतवणूक काढून घेता येणार नाही. या योजनांचे निव्वळ मालमत्ता मूल्य दररोज जाहीर करण्यात येईल.
  • या निर्णयामुळे, अन्य अशा योजनांतील गुंतवणूकदार घाबरून जाऊन आपली गुंतवणूक काढण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. 
  • प्रथमदर्शनी पहाता नव्याने न होणारी गुंतवणूक आणि जुन्या गुंतवणूकदारांची वाढलेली मागणी, यामुळे आलेली पैशांची चणचण हे योजना बंद करण्याचे कारण सांगितले जात आहे, ते वाजवी वाटते. 
  • अधिक व्याजदर देणारे कर्जरोखे विकून किंवा मालमत्ता तारण ठेवून गुंतवणूकदारांची पैशाची मागणी पूर्ण करताना मोठया प्रमाणावर  शिल्लक राहणारे कमी प्रतीचे कर्जरोखे आणि कर्जावरील व्याज यांचा बोजा योजनेशी एकनिष्ठ राहणाऱ्या  गुंतवणूकदारांवर पडणे हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. 
  • त्यामुळे सेबी कायदा १९९६ म्युच्युअल फंड नियमन ३९ (२) अ  नुसार गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या हेतूने घेतलेला हा निर्णय आहे.

म्युच्युअल फंड युनिट गुंतवणूक काढून घेताय? थांबा, आधी हे वाचा…

म्युचुअल फंड गुंतवणुकीच्या वेळी घ्यायची काळजी –

  • म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना त्यातील धोके नेहमीच समजून घेणे आवश्यक आहे. 
  • जे सर्वसाधारणपणे समजून घेतले न जाता, फुली केलेल्या ठिकाणी सही करणे आणि सही केलेला चेक देणे यात धन्यता मानणाऱ्या गुंतवणूकदारांना ही सणसणीत चपराक आहे. 
  • सर्वच सर्वच योजनांत विमोचनाच्या धोक्याचा (Redemption risk) उल्लेख केलेला असतो तो धोका नेमका कोणता तर हा आहे. 
  • यातील पैसे मागणी केल्यास दोन दिवसात सहज मिळू शकत होते ते आता मिळणार नाहीत. जवळपास २५६५८ कोटी रुपये एवढी रक्कम या सर्व योजनांत गुंतली आहे. 
  • यातील ६७ % गुंतवणूक गैर बँकिंग वित्तसंस्था व हौसिंग कंपन्या यात असल्याने त्यांचे मूल्यांकन कमी झाल्याने त्यातील तरलता कमी झालेली आहे. 
  • २६ वर्षे गुंतवणूक अनुभव आणि १९ वर्ष या फंडाचे मुख्य गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या संतोष कामत सारख्या गुंतवणुकीत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तीलाही सर्वसामान्य लोकांप्रमाणे थोडा अधिक परतावा मिळवण्याचा मोह झाल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे धाडस झाले असावे. 
  • धोका ही कल्पनाच मुळात सापेक्ष आहे.  असे असले तरी सर्वच गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कधी मिळतील याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

आश्वासनानुसार यातील पैसे खालील वेळापत्रकाप्रमाणे देण्यात येतील.

(यात जाहीर केलेल्या वर्षाच्या मुदतीची सुरुवात १ एप्रिल २०२० पासून धरावी- )

company Name Years
Franklin Ultra Short Bond Fund 0.62 
Franklin Low Duration  1.46 
Franklin Short Term Income 2.75 
Franklin Dynamic Accrual 4.28 
Franklin Income Opportunities 2.55 
Franklin Credit Risk that average 3.08 

 

  • ‘म्युच्युअल फंड सही है!’ ऐवजी ‘म्युच्युअल फंड सही कितने?’ या मोहोमेची खरी गरज असून या  व्यवसायावरील विश्वास वाढण्यासाठी भारतीय रिझर्व बँक, सेबी आणि वित्त मंत्रालय यांनी एकत्रित चर्चा करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी एसेट मॅनेजमेंट कंपनीस कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून छोट्या गुंतवणूकदारांना (₹२ लाख गुंतवणूक असलेले) यातून बाहेर पडण्याची सोय त्वरित उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 
  • या योजनांत गुंतवणूक करणाऱ्यानी घाबरून जायचे अजिबात कारण नाही. त्यांचे पैसे नाहीसे होणार नाहीत, तर मिळण्यास कालावधी लागेल एवढेच. 
  • अशा प्रकारच्या अन्य फंडातील गुंतवणूकदारांनी सावध राहावे. त्यांनी तसेच इक्विटी योजनांत गुंतवणूक करणाऱ्यांनी एस आय पी बंद करू नयेत. तसेच गुंतवणूक काढून घेऊ नये. 

“एसआयपी” गुंतवणूक करताना या ५ चुका टाळा

  • हाच आपल्या मनोबलाची कसोटी पाहणारा काळ असून यापासून बोध घेऊन आपणास ज्या ज्या वेळी अनपेक्षित दराने परतावा मिळेल तेव्हा झालेला लाभ काढून घेऊन तो भांडवल निर्मितीसाठी वापरावा म्हणजे भविष्यात कठीण प्रसंगी चटकन पैसे उभे करता येतील. 
  • म्युच्युअल फंड योजनेच्या एजंटने योजना विक्री करताना यातील धोके समजावून द्यावे तसेच कठीण प्रसंगी संपर्क साधून आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी सांगून गुंतवणूकदारांशी संवाद साधावा. 
  • आज अनेक एजंट त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधण्यास कमी पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याही खऱ्याखुऱ्या अडचणी आहेत म्युच्युअल फंड योजनांचा खर्च कमी करताना ‘फंड हाऊसच्या सोईत वाढ आणि एजंटच्या कमिशनला कात्री’ असे धोरण अवलंबिले जात आहेत. 
  • खर्च कमी करायचा असल्यास त्यातील दोघांचा वाटा समसमान असला पाहिजे. या उद्योगाची उभारणी करण्यासाठी अनेकांनी अक्षरशः जीवाचे रान केले आहे. 
  • सध्या लोकांकडे पर्याय नसल्याने, पैशांचा ओघ सहज येत असल्याने त्यांना वाऱ्यावर सोडणे न्यायास धरून नाही. 
  • अन्य उद्योगाप्रमाणे याही उद्योगास स्थिर राहण्यासाठी काही सवलती मिळणे अपेक्षित असून २७ एप्रिल २०२० रोजी रिजर्व बँकेकडून ५० हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक निधी (अल्पमुदतीचे कर्ज) उपलब्ध करण्यात आले आहे. 
  • हे कर्ज रेपो रेटने (४.४% वार्षिक व्याजाने) मिळेल ही योजना ११ मे २०२० पर्यत किंवा ५० हजार कोटी रुपये वितरित होईपर्यंत चालू राहील. आवश्यकता भासल्यास  या रकमेत वाढ केली जाऊ शकते. यासाठी ज्या मालमत्ता सध्या देखरेखीखाली आहेत त्याही तारण म्हणून स्वीकारल्या जातील. त्यामुळे यापुढे म्युच्युअल फंडास तरलता नसल्याची अडचण राहणार नाही.

गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

– उदय पिंगळे

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…