“एसआयपी” गुंतवणूक करताना या ४ चुका टाळा

Reading Time: 2 minutes

गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते कारण यामध्ये स्टॉक मार्केटसारखे सतत चढउतार, रिअल इस्टेट सारखी मोठी गुंतवणूक नसते. म्युच्युअल फंडात वार्षिक आणि मासिक पद्धतीने गुतंवणूक करता येते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी (SIP) हा सध्या अनेक गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे. मात्र यातून आपली आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजे.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी

१. एकदम मोठ्या रकमेची गुंतवणूक करू नका –

 • एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना भारतातील अनेक लोक मोठ्या रकमेची गुंतवणूक करतात ही सर्वात मोठी चूक आहे. पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज घेताना आपण एकदम दोन पाय न टाकता आधी एकच पाय पाण्यात बुडवून पाहतो हेही तसंच आहे. 
 • सुरुवातीच्या काळात मोठ्या रकमेची गुंतवणूक करू नका. वार्षिक गुंतवणूक न करता मासिक गुंतवणूक करावी. 
 • एसआयपीचा मध्ये  प्रति महिना रु.५०० ते १००० पासून सुरवात करता येते. .काहीजण सावधपणे हळूहळू रक्कम गुंतवतात, हे अगदी बरोबर आहे. वॉरन बफे सारख्या जगप्रसिद्ध यशस्वी गुंतवणूकदाराचे सुद्धा हेच मत आहे.
 • ज्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची त्याबाबतीत वास्तविक परिस्थिती आणि अनुकूलता याचं पूर्ण ज्ञान नसतानाही मोठी रक्कम गुंतवल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं. 
 • नवीन गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आवश्यकता वाटल्यास गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागारांचे मार्गदर्शन घ्यावे. जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हाल आणि कसलीही भीती नसेल, तेव्हा वाढत्या महागाईच्या दराचा अंदाज घेऊन तुम्ही गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता. 

गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला?

२. योग्य म्युच्युअल फंडाची निवड न करणे-

 • एसआयपी मार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची योजना करत असाल, तर योग्य म्युच्युअल फंड निवडा कारण मार्केटमध्ये अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. प्रत्येकाचे नियम वेगळे असतात. 
 • भविष्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी चांगला परतावा मिळावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. म्युच्युअल फंडाच्या निवडीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. 
 • म्युच्युअल फंडाची निवड करताना त्या कंपनीचा इतिहास आणि मार्केटमधील पत या गोष्टींचा विचार करावा. चुकीच्या फंडाची निवड केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते.  

म्युच्युअल फंड युनिट गुंतवणूक काढून घेताय? थांबा, आधी हे वाचा…

३. एसआयपी अचानक बंद करणे-

 • चांगला परतावा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक दीर्घकाळ चालू ठेवणे गरजेचे आहे. 
 • शेअर बाजारात मंदी आली की गुंतवणूक एसआयपी मधील गुंतवणूक अचानक थांबविल्यास  आर्थिक नुकसान होऊ शकते. 
 • गुंतवणूकदारांनी संयम ठेवणे आवश्यक आहे. शेअर बाजारातील अस्थिरता अनेकदा गुंतवणूकदारांना काळजीत टाकते.  
 • तुमच्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ लाल रंगात असेल तरीही काही काळ धीर धरणे आवश्यक असते. बाजारात जशी मंदी आली तशी पुढे तेजी सुद्धा येऊ शकते हे लक्षात घ्या. अशा चढउतारांमुळे निराश होऊ नका.सातत्याने व नियमितपणे गुंतवणूक केल्यास फायदा लक्षणीय होतो. 

४. शेअर बाजारातील  तेजीची वाट पाहत बसणे

 • शेअर बाजार ही एक अस्थिर गोष्ट आहे. आज सर्वात तेजीत असणारं स्टॉक मार्केट उद्या कदाचित निचांक गाठू शकते.स्टॉक मार्केटच्या चढउतारांनुसार गुंतवणुकीचे निर्णय घेणं तितकसं सोपं नाही. 
 • शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर इथे जोखमीचा विषय आहे. आर्थिक जोखीम पत्करणे कठीण वाटत असते म्हणून तर तुम्ही म्युच्युअल फंडाचा सुरक्षित पर्याय निवडता. त्यामुळे मनात कोणताही संशय असेल तर चांगल्या सल्लागाराची मदत घ्या. 
 • एसआयपी मध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूकच फायद्याशीर ठरू शकते.

गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *