Reading Time: 3 minutes

शेअरबाजार नवनवीन उच्चांकी विक्रम करीत असताना आपण गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड योजना अपेक्षित परतावा देत नाहीत, असं आढळून आल्याने आपण यातील गुंतवणूक काढून घ्यायचा विचार करताय का? असं असेल, तर तडकाफडकी असा काही निर्णय घेण्यापूर्वी थोडं थांबा. फक्त म्युच्युअल फंड युनिट नव्हे, तर अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचे मूल्य अनेक कारणांनी कमी अधिक झाले आहे. तेव्हा प्रथम खालील चार प्रश्नांची उत्तरे मिळावा आणि मगच यासंबंधी विचार करा.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी

१. आपण गुंतवणूक केलेल्या फंडाचे उद्दिष्ट बदलले आहे का? 

  • म्युच्युअल फंड अधिक पारदर्शक व्हावेत या हेतूने दोन वर्षांपूर्वी सेबीने काही महत्त्वाचे बदल केले. ज्या योगे गुंतवणूकदार फंड कोणत्या प्रकारचा आहे, त्यातील गुंतवणूक कोणत्या गोष्टींमध्ये आहे, त्यामागे जोखीम किती आहे, ते नावावरून समजावे. 
  • यातील बहुतांश गुंतवणूक ही त्याचे नाव असलेल्या प्रकारात केली जावी, असा नियम केला. त्यानुसार ५ प्रकारच्या निरंतन फंडांचे (Open ended) ३६ उपप्रकार निर्माण केले गेले. 
  • एका फंडहाऊसकडून यातील प्रत्येक उपप्रकाराची एकच योजना उपलब्ध असावी असे सुचवले. त्याचप्रमाणे लार्ज, मिड, स्मॉल कॅप म्हणजे कोणत्या कंपन्या ते बाजारमूल्यावरून ठरवण्यात आले. 
  • याप्रमाणे सध्या चालू असलेल्या एक प्रकारच्या दोन योजना एकमेकात विलीन कराव्या अथवा रद्द कराव्यात असा पर्याय सुचवला. त्यासाठी ६ महिन्याचा कालावधी दिला. 
  • याप्रमाणे सर्व फंड हाऊसनी त्याला प्रतिसाद देऊन असे फंड एकमेकात विलीन केले. ज्यांना अशा प्रकारे विलीनीकरण मान्य नव्हते. त्यांना कोणताही अधिभार न लावता फंडातून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. 
  • असे करत असताना गुंतवणुकीच्या संदर्भात जे बदल केले गेले, त्याचे अपेक्षित परिणाम दिसण्यास काही कालावधी लागेल, या गोष्टींचा विचार करावा. 
  • उदा पूर्वी लार्ज कॅप फंड या नावाने असलेल्या फंडात अनेक मिड कॅप स्मॉल कॅप शेअर्स होते. त्यांना आपल्याकडे असलेले अन्य शेअर्स विकावे लागले. फक्त लार्ज कॅप फंडात अधिक गुंतवणूक करून पूर्वीप्रमाणे परतावा मिळवणे त्यामुळे शक्य नाही. 
  • लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप यातून मिळणारा परतावा आणि जोखीम ही नेहमीच चढत्या क्रमाने असते. 
  • हा महत्वाचा बदल झाल्याने आपले उद्दिष्ट, अपेक्षित परतावा, जोखीम क्षमता विचारात घेऊनच फंडाची निवड करावी. 
  • या अपेक्षेत आपण गुंतवणूक केलेल्या फंडाचे उद्दिष्ट खरोखरच बसत नसेल, तरच यातील गुंतवणूक काढून घेण्याचा विचार करावा.

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे

२. तुमचे उद्दिष्ट पूर्ण होण्याएवढा परतावा यातून मिळत आहे का? 

  • गुंतवणूक करताना जे दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवले होते, त्या कालावधीच्या २ वर्ष आधी आपण अपेक्षित केलेल्या परताव्यातून अधिक परतावा मिळून ते उद्दिष्ट पूर्ण होण्याएवढी रक्कम आधीच मिळत असेल, तर त्याचा फायदा घेण्यासाठी युनिट विकावे व त्यातून आलेली रक्कम ही डेट फंडात सुरक्षित ठेवावी, ज्यायोगे जेव्हा आपल्याला खरोखर पैशांची गरज असेल तेव्हा बाजाराची स्थिती कशीही असली तरी हमखास व निश्चित पैसे मिळतील. 
  • उदा. मुलाच्या १२ नंतरच्या उच्च शिक्षणासाठी पैसे एसआयपी च्या माध्यमातून पैसे जमा करीत असताना जमा एकूण फंड रकमेवर तो दहावीत गेल्यावर लक्ष ठेवावे आणि उच्च परतावा मिळत असल्यास एसआयपी बंद न करता, आवश्यकता नसतानाही जमा रक्कम काढून घेऊन ती डेट फंडात सुरक्षित ठेवावी म्हणजे प्रत्यक्ष गरजेच्या वेळी बाजार खाली असेल तरी आपणास हमखास रक्कम उभी करता येईल. एकदम रक्कम काढण्याऐवजी एसटीपी हा पर्यायही वापरता येईल.

म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

३. माझा फंड खरोखरच अपेक्षित परतावा देऊ शकणार नाही का? 

  • बाजारात तेजी मंदी यांचे चक्र सतत चालू असल्याने निश्चित निष्कर्ष काढण्यापूर्वी ७ ते ८ वर्षाच्या कालावधीचा विचार करावा. 
  • केवळ ३ ते ४ वर्षाच्या अल्प कालावधीत असलेला ऋण परतावा पाहून घाबरून युनिट विकणे यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. 
  • अशा प्रकारे ३ ते ४ वर्ष अपेक्षित परतावा न देणारा फंड पुढील दोन वर्षात अप्रतिम परतावा देऊ शकतो, असा इतिहास असल्याने युनिट विकण्याची व एसआयपी बंद करण्याची चूक करू नये, यामुळे दुहेरी तोटा होतो. शक्य असेल, तर अधून मधून अशा योजनेचे अतिरिक्त युनिट निव्वळ मालमत्ता मूल्य कमी असताना घ्यावे. ज्यामुळे भविष्यात अधिक फायदा होईल.

४. आपले उद्दिष्ट व निवडलेला कालावधी यात काही बदल तर झाला नाही ना?

  • काही दीर्घकालीन उद्दिष्टे उदा मुलांचे उच्च शिक्षण, मुलीचे लग्न, सेवानिवृत्तीचे  नियोजन यासाठी गुंतवणूक केलेली असते. 
  • अल्पकालीन गरजेसाठी डेट फंडात गुंतवणूक केलेली असते. अकस्मात अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपणास गुंतवणूक ताबडतोब मोडून घ्यावी लागते.
  • गुंतवणूक सुरुवात जेवढी लवकर करू तेवढी किमान गुंतवणूक आपणास करावी लागते यात झालेला/ केलेला बदल आपणास गुंतवणूक या दृष्टीने खूप महाग पडतो. तेव्हा असा काही निर्णय आपल्यास घ्यावा लागला किंवा घेतला असेल तर त्याच्या भरापाईच्या पर्यायांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

खरंतर हे खूपच साधे आणि सारासार विचार करून आपल्याला यांची उत्तरे कशी मिळवायची ते माहिती असलेले प्रश्न आहेत. सध्या वाढणारा निफ्टी निर्देशांक हा केवळ दहा शेअर्सचे मूल्य प्रचंड मोठया प्रमाणात गुंतवणूक  वाढल्याने वाढला असून, उरलेल्या चाळीस शेअर्सचे मूल्य वजा आहे. 

उद्योग व्यवसायात मंदी आहे तर व्याजदरात घट झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना गुंतवणुकीचे ठोस पर्याय नाहीत त्यामुळेच काही लोक मर्यादित जोखीम स्वीकारून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे बाजारात गुंतवणूक करीत असल्याने बाजार वाढलेला दिसत असला, तरी हे बाजारभाव वाढलेले शेअर्स म्हणजेच सर्व बाजार असे नाही. 

अलीकडे सातत्याने टप्याटप्याने छोट्या व मध्यम कंपन्यांच्या मूल्यात यात वाढ दिसत असून हे आश्वासक लक्षण आहे. म्युच्युअल फंडाचा खातेउतारा त्याच्या सध्याच्या किमतीसह आपल्याला सातत्याने दिसत असल्याने आपले मनोबल कमी होऊन चुकीचा निर्णय घेतला जातो. 

इक्विटी मार्केट पडझड – हा काळही सरेल

जेव्हा युनिट खरोखर खरेदी करायला पाहीजे तेव्हा विक्री, विक्री करायला पाहीजे तेव्हा खरेदी, करण्याचा निर्णय घेतला जातो परिणामी वाढीव नुकसान होते. तेव्हा यात असलेली जोखीम लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा. असा निर्णय आपण स्वतः घेऊ शकत नसल्यास व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यावी.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…