Reading Time: 3 minutes

म्युच्युअल फंड आपल्याला तब्बल ३६ प्रकारच्या योजना देतात, ज्यांचे योग्य संयोजन केल्याने कॅपिटल मार्केटच्या चढ उतारावर मात करता येते. मात्र बरेचसे लोक काय करतात तर म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेले मागील रिटर्न्स पाहून गुंतवणूक करतात, त्यात काही विमा सल्लागार हे बाजाराचा अभ्यास न करता गुंतवणूकदारांना चुकीच्या योजना देतात.

उदाहरणार्थ २०१७-१८ मध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांनी अगदी ३०-४०% रिटर्न्स दिले. अशावेळी सलग पुढच्या वर्षीही तितकेच रिटर्न्स मिळतील हे कधीही शक्य नसते. मात्र काही विमा एजन्ट हे नवीन गुंतवणूकदारांना, जणू काही आपणही तितकेच रिटर्न्स कमवू या लालसेने त्यांना गुंतवणुकीस प्रेरित करतात. वास्तविक पाहता अभ्यासू आर्थिक सल्लागाराने गुंतवणूकदारांना जोखीम समजावून सांगणे अत्यावश्यक असते.  

गेल्या वर्षभरात स्मॉल कॅप कॅटेगरीने साधारण ३०% निगेटिव्ह रिटर्न्स दिले, म्हणजेच २०१७-१८ चे रिटर्न्स पाहून ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचे नुकसान झाले किंवा त्यांचे पैसे अडकले. माझ्या मते फक्त मागील परतावा पाहून गुंतवणूक करणे चुकीचे आहे.

अशा प्रकारचा चुकीचा सल्ला दिला जाऊ नये म्हणून सेबीने (Past performance may or may not be sustained in future) असे परतावाच्या खाली उल्लेख करण्यास बंधनकारक केले आहे.

  • सेबीने तब्बल ३६ प्रकारच्या योजना अशा साठी दिल्या आहेत, जेणेकरून बाजाराच्या कोणत्याही चढ उताराच्या काळात गुंतवणूकदारांनी योग्य प्रकारच्या योजनांचे कॉम्बिनेशन करावे. आपला आर्थिक सल्लागार निवडताना गुंतवणूकदारांनी प्रथम त्याची परीक्षा घ्यावी. ३६ प्रकारच्या सर्व योजनांची त्याला माहिती आहे का नाही? हे तपासावे, आपले मेहनतीचे पैसे गुंतवताना योग्य सेट अलोकेशन करावे, म्हणजेच डेट (Debt), इक्विटी आणि हायब्रीड या तीनही कॅटेगरी मध्ये हे अलोकेशन असावे. बाजारातील उतार चढावाच्या दोन किंवा जास्त कालखंडाचा अनुभव असलेले आर्थिक सल्लागार आपणास योग्य मार्गदर्शन करू शकतात.
  • आता बाजारातून इक्विटी फंडातून किती रिटर्न्सची अपेक्षा करावी?  तर मी म्हणेन कि देशाच्या नॉमिनल जीडीपी (GDP) पेक्षा २-३ टक्के जास्त. आपला जो महागाईचा दर आहे आणि तसेच आपल्या जीडीपीचा जो ग्रोथ  रेट आहे त्यांना एकत्र केले तर त्याला नॉमिनल जीडीपी म्हणतात. आजची महागाई साधारण ४.५ % आहे आणि जीडीपी ग्रोथ रेट ७.५% आहे म्हणजेच इक्विटी फंडाने वर्षाला १३-१४ % रिटर्न्स दिले तर ते चांगले रिटर्न्स मानावे. जोखीम कमी करण्यासाठी जर आपण सेट अलोकेशन केले तर साधारण १०-११ % इतके रिटर्न्स आपल्याला समाधान देतील. एव्हढ्या चांगल्या परताव्याची अपेक्षा करताना आपण आपल्या गुंतवणुकीला कमीतकमी ५ वर्षे वेळ दिला पाहिजे.
  • बँक किंवा पोस्टाच्या व्याज स्वरूपी योजना असतात. त्या प्रोग्रेससिव्ह प्रकारच्या योजना असतात, म्हणजेच तुमच्या खात्यात नियमित व्याज जमा होत असते. मात्र ज्या योजना म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजना असतात, त्या रिग्रेसिव्ह प्रकारच्या असतात. म्हणजेच त्या कधी खूप जास्त रिटर्न्स देतात आणि येणाऱ्या काळात ते ड्जस्ट करतात. जे आपण मिड कॅप किंवा स्मॉल कॅप प्रकारच्या योजनांमध्ये २०१८ साली अनुभवले.
  • इथे जर सोपे उदाहरण द्यायचे झाले, तर जेव्हा एक व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्याला फिरायला नेते, तेव्हा कधी प्राणी पुढे पुढे जात असतो, तर कधी तो त्या व्यक्तीच्या मागे राहतो, ते दोघे कोठे जात आहेत हे पाहण्यासाठी त्या प्राण्याकडे न पाहता त्या व्यक्ती कडे पहिले पाहिजे. कारण त्याचा लाडका प्राणी शेवटी मालक जिथे जाईल तिथेच जाणार. सिम्बॉलिक दृष्ट्या हा प्राणी म्हणजे शेयर बाजार आणि व्यक्ती म्हणजे आपली भारताची जीडीपी. जसजसा जीडीपी वाढत जाईल तसतसा शेयर बाजारही वाढत जाईल.
  • आपल्या भारताची एकूण जीडीपी सध्या १६५ लाख करोड इतका आहे आणि त्याच बरोबर शेयर बाजारचे आकारमान १४० लाख करोड इतके आहे. येणाऱ्या ५ वर्षात जीडीपी दुप्पट होण्याचा अनुमान आहे. निश्चितच शेयर बाजारचे आकारमानही त्याप्रमाणे वाढेल. गुंतवणूकदारांनी आत्ताच्या बाजाराच्या पडत्या काळात जास्तीत जास्त गुंतवणूक करून आपल्या वेल्थ क्रिएशन साठी फायदा करून घेतला पाहिजे. बाजाराच्या वरच्या पातळीवर गुंतवणूक करून मागे केलेल्या चुका पुन्हा आपल्याकडून होऊ नयेत. बाजारातील अल्पकालीन चढ उताराला न घाबरता आपली गुंतवणूक दीर्घ काळासाठी ठेवा आणि आपली देशाच्या होणाऱ्या विकासाचा आपल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ घ्यावा.

दीर्घकालीन वेल्थ क्रिएशनसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!

– निलेश तावडे 

 ९३२४५४३८३२

[email protected]

(लेखक हे २० वर्ष्ये म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते , सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)

म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहितीएस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय ,

उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस , भारतीय स्टॉक एक्स्चेंज आता जर्मनीपेक्षाही सरस

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
2 comments
  1. Thanks for finally writing about >म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका
    कशा टाळाव्यात?- Arthasakshar <Loved it!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…