nda
nda
Reading Time: 4 minutes

Non-disclosure agreement : नॉन डिस्क्लोजर ऍग्रिमेंट

असं म्हणतात पूर्वीच्या काळी लोक शब्दांना जागायचे आणि एकदा कुणाला वचन दिलं किंवा शब्द दिला की तो  सचोटीनं पाळायचे.  जिथे गोष्टींमध्ये गुप्तता राखणं अपेक्षित असायचं तिथे जीवावर संकट आलं तरी लोकं दिलेली जबाबदारी पाळायचे. आज जमाना बदललाय, सच्चेपणा, स्वामीनिष्ठा अशी नीतिमूल्यं फार कमी लोकांमध्ये बघायला मिळतात. 

बदलत्या जमान्याबरोबर वचन देणं-घेणं किंवा गोपनीयता राखणं या पद्धतीतही बदल झाला आहे. आज यासाठी कार्यरत असलेली काहीशी आधुनिक पद्धत म्हणजे नॉन डिस्क्लोजर ऍग्रिमेंट (NDA- Non disclosure Agreement). आजच्या तरुण पिढीला नोकरीच्या ठिकाणी जॉईन होताना किंवा कंपनी सोडताना NDA करार साइन करावा लागतो. चला तर या NDA बद्दल आपण अधिक जाणून घेऊया. 

हेही वाचा – Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी…

NDA म्हणजे काय 

  • तुम्ही एखादा व्यवसाय चालवत असाल, किंवा एखादा व्यवसाय सुरू करणार असाल, तर अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे तुम्ही गोपनीय माहिती दुसर्‍या पक्षासोबत शेअर केली आहे आणि तुमचा डेटा किंवा माहितीचा गैरवापर होण्याची भीती तुम्हाला वाटते. 
  • पण यावर एक उपाय आहे, NDA किंवा नॉन-डिस्क्लोजर करार ! यामुळे तुम्ही तुमच्या सर्व चिंता सोडून तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकता. 
  • NDA म्हणजे असा एक करार आहे ज्याद्वारे त्यावर स्वाक्षरी करणारे दोन पक्ष कामाच्या बाहेर कोणतीही गोपनीय माहिती उघड न करण्याचे मान्य करतात. हा करार सामान्यतः व्यवसायाच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी केला जातो.
  • तुम्ही काही व्यवसाय करत आहात आणि तुम्ही काही कर्मचारी किंवा कंत्राटदारांना काही काम करण्यासाठी नियुक्त केले आहे. ज्यासाठी काही संवेदनशील माहिती त्यांच्यासोबत शेअर करणे आवश्यक आहे. आता साहजिकच, कर्मचारी/कंत्राटदारांनी ती माहिती कोणाही सोबत शेअर करावी असे तुम्हाला वाटत नाही. अशावेळी तुम्ही त्यांच्यासोबत NDA करार करा आणि त्यांना ती माहिती कामाच्या बाहेर इतर कुठे शेअर करण्यापासून प्रतिबंधित करा.
  • थोडक्यात, जर तुम्हाला NDA वर स्वाक्षरी करण्यास सांगितले गेले, तर तुम्हाला वचन देण्यास सांगितले जाते की तुमच्यासोबत शेअर केलेली संवेदनशील माहिती इतर कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीकडे जाता नये. आणि याउलट जर तुम्ही NDA चे जारीकर्ता असाल आणि तुम्ही दुसऱ्याकडून NDA साइन करून घेत असाल तर त्या समोरच्या माणसाने तुम्ही त्या माणसाला शेअर केलेली माहिती त्याने अन्य कोणाशीही शेअर करू नये या आशयाची अपेक्षा  करता. 

NDA ला खालील ४ नावांनीही ओळखलं जातं 

  • Confidential Agreement (CA)
  • Confidential Disclosure Agreement (CDA)
  • Secrecy Agreement (SA)
  • Proprietary Information Agreement (PIA)

NDA करारांचे प्रकार

  • एकतर्फी करार (Unilateral or one-way agreement) – 

या करारांतर्गत, करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी माहिती फक्त एका पक्षाकडे असते जी दुसर्‍या पक्षासह शेअर करावी लागते. माहिती असलेल्या पक्षाला प्रकट करणारा पक्ष (disclosing party) आणि दुसर्‍या पक्षाला प्राप्तकर्ता पक्ष (receiving party) म्हणतात.

  • द्वि-मार्गी करार (Mutual or two-way agreement) – 

या कराराअंतर्गत, दोन्ही पक्षांकडे माहिती असते जी ते एकमेकांसोबत शेअर करतात.

  • बहुपक्षीय NDA (Multilateral NDA) – 

या प्रकारच्या NDA मध्ये, तीन किंवा अधिक पक्ष सामील असतात, त्यापैकी एक पक्ष गोपनीय माहिती उघड करतो आणि इतर पक्ष ती माहिती पुढे कुठेही जाहीर करणार नाही आणि ती माहिती संरक्षित ठेवण्याचे वचन देतात.

हेही वाचा – IEPF: गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण प्राधिकरण…

NDA ची आवश्यकता कधी भासू शकते 

  • बिझनेस डील करत असताना: 

जर तुम्ही एखाद्या विक्रेत्याला किंवा सल्लागाराला आमंत्रित करत असाल आणि तुम्ही शेअर केलेली माहिती बाहेर जाणार नाही याची खात्री करायची असेल, तर NDA वर स्वाक्षरी करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्स आणि काही माहिती संवेदनशील कंपन्यांमध्ये, प्रत्येक कर्मचाऱ्याला NDA वर स्वाक्षरी करायला लावणे ही एक उत्तम कल्पना आहे. त्यामुळे सेन्सिटिव्ह माहिती बाहेर जात नाही. 

  • नवीन प्रकल्प सुरू करताना: 

समजा तुम्ही एका ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड (प्रस्थापित) व्यवसायात आहात आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहात, ज्यात अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारच्या भागधारकांचा सहभाग आवश्यक असेल अशावेळी NDA वर स्वाक्षरी करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरुन कोणत्याही वेळी कोणत्याही टोकाकडून उद्भवू शकणारी कोणतीही अस्पष्टता किंवा दावे टाळले जातील. 

  • गुंतवणूकदारांशी बोलत असताना किंवा विलीनीकरण आणि अधिग्रहण दरम्यान:

पूर्वी ही एक अतिशय सामान्य प्रथा होती. तथापि, आधुनिक काळातील गुंतवणूकदार अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर एनडीएवर स्वाक्षरी करण्यास नकार देतात आणि म्हणूनच, ही प्रथा आता कालबाह्य होत आहे. जेव्हा कागदपत्रे आणि आकडे पाहण्याची गरज भासते आणि संवाद प्रगत टप्प्यावर पोहोचतो तेव्हा NDA वर  स्वाक्षरी करण्याची विनंती केली जाऊ शकते. NDA वर  स्वाक्षरी करण्याची गरज का आहे याचे स्पष्ट कारण यात असले पाहिजे. विलीनीकरण आणि अधिग्रहणच्या बाबतीतही हेच तत्व लागू होते. 

NDA चे फायदे 

  • NDA हा कायदेशीर दस्तावेज असल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही संघर्षासाठी त्याचे खूप महत्त्व आहे. कराराचे उल्लंघन करणारा कोणताही पक्ष नुकसान भरपाईसाठी कायदेशीररित्या जबाबदार ठरू शकतो.
  • कोणतीही अस्पष्टता किंवा माहितीचे नुकसान टाळून दीर्घकाळापर्यंत ‘गोपनीय’ च्या अंतर्गत येणारी कोणतीही गोष्ट  NDA लिखित स्वरूपात स्पष्टपणे नमूद करते.
  • NDA दोन किंवा अधिक पक्षांमध्ये शेअर केलेल्या माहितीची गुप्तता राखते आणि महत्वाची माहिती संस्थेच्या बाहेर जाण्याची शक्यता कमी करते.
  • एकूणच, ते बौद्धिक संपत्तीच्या (जसे की व्यापार गुपिते, फॉर्मुले, proprietary माहिती आणि इतर गोपनीय  माहिती) प्रकटीकरणाचे आणि अर्थातच त्यामुळे संपूर्ण संस्थेचे संरक्षण करते.

NDA करार तयार करताना आणि त्यावर स्वाक्षरी करताना घ्यायची खबरदारी

  • नमूद केलेली सर्व माहिती तंतोतंत असल्याची आणि NDA करारत वापरलेली भाषा सोपी आणि स्पष्ट असल्याची खात्री करा. 
  • तुम्ही सहभागी पक्षांना संपूर्ण NDA वाचून दाखवायला हवे आणि तोंडी समजावून सांगायला हवे. त्यामुळे पुढील गैरसमज टाळण्यास मदत होईल. 
  • दस्तऐवजाचा मसुदा तयार करताना आवश्यक नसलेली कलमे वापरू नका किंवा परस्परविरोधी वाक्ये वापरू नका. 
  • NDA मध्ये एक्सपायरी डेट नमूद असल्याची खात्री करा आणि आवश्यक असल्यास त्याचे नूतनीकरण करा. 

NDA करारातील कोणत्याही कलमाचे उल्लंघन झाल्यास काय होते?

  • कोणत्याही वेळी, NDA च्या कलमांतर्गत समाविष्ट असलेली कोणतीही गोपनीय माहिती सार्वजनिकरित्या शेअर केली जात असल्याचे तुम्हाला आढळल्यास त्वरीत पुरावे गोळा करणे महत्त्वाचे आहे. माहिती कोणी लीक केली, त्यांनी ती कशी लीक केली, माहितीचे काय केले जात आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळवा. पुढील पायरी म्हणजे व्यवसायाच्या स्वरूपाशी परिचित असलेल्या वकीलाची नियुक्ती करणे आणि पुढील कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे.
  • NDA चा भंग झाल्यास, उल्लंघन करणार्‍या पक्षाला खटला भरण्याची धमकी दिली जाऊ शकते आणि NDA मध्ये मान्य केलेल्या अटींनुसार आर्थिक नुकसान आणि इतर संबंधित खर्च देखील भरावे लागू शकतात.

हेही वाचा – Company Act: कंपनी कायदा आणि स्वतंत्र महिला संचालक …

सारांश 

 तर अशाप्रकारे या NDA चे महत्व आपल्या लक्षात आले असेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अधिक सुरक्षा आणण्यासाठी   NDA चा अवलंब करण्यास हरकत नाही.  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.