नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार
https://bit.ly/33GCIGr
Reading Time: 3 minutes

नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार

नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार हा मालमत्ता हस्तांतरणाच्या वेळी उपस्थित होणार एक अतिशय अत्यंत महत्वाचा प्रश्न. नॉमिनेशन आणि मृत्युपत्र या दोन्ही गोष्टी वारसाहक्काच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. परंतु एखाद्या मालमत्तेच्या दस्तावेजामध्ये नॉमिनेशन एका व्यक्तीच्या नावे आणि तीच मालमत्ता मृत्युपत्रामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असेल, तर त्या मालमत्तेचा खरा वारसदार कोण? याचप्रमाणे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्युपत्राशिवाय मृत्यू झाला, तर त्याची मालमत्ता नॉमिनीला मिळणार की मालमत्तेचे विभाजन वारसाहक्क  कायद्यानुसार केले जाणार?

पूर्वी नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार, असा प्रश्न समोर आल्यावर मालमत्ता नक्की कोणाच्या ताब्यात द्यायची याबद्दल संभ्रम होता. परंतु, उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालय यांनी काही केसेस मध्ये दिलेल्या निकालांनुसार यासंदर्भातील नियमांमध्ये सुस्पष्टता आली आहे. 

हे नक्की वाचा: मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे? 

नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार –

मृत्युपत्र विरुद्ध नॉमिनेशन:

 • मृत्यूपत्राद्वारे आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचा मालकी हक्क कोणाला हस्तांतरित करायचा, हे ठरविण्याचा अधिकार कायद्याने आपल्याला दिला आहे.
 • कायद्यानुसार मृत्यूपत्र हाच महत्वाचा आणि अंतिम दस्तावेज असतो.  मृत्युपत्र, वैध ठरल्यास, त्यानुसारच मालमत्तेचे वाटप केले जाते.    
 • नॉमिनी विरुद्ध मृत्युपत्र असा मुद्दा येतो तेव्हा मृत व्यक्तीच्या मालमत्तेचे वाटप मृत्युपत्रानुसारच केले जात असल्याने नॉमिनीला संबंधित मालमत्तेचा कोणत्याही प्रकारे लाभ होणार नाही. 
 • नॉमिनेशन करताना व्यक्तीची इच्छा हीच असते की आपल्या पश्चात संबंधित  मालमत्ता नॉमिनीस मिळावी. जर काही कारणांनी नॉमिनी व्यक्ती आपला वारसदार म्हणून योग्य वाटत नसेल अथवा मृत झाली असेल, तर नॉमिनेशन बदलायची सुविधाही कायद्याने देण्यात आलेली आहे. 
 • नॉमिनेशन एका व्यक्तीच्या नावे व मृत्युपत्रामध्ये तिच मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावे केल्यास, मालमत्तेचे मालकी हक्क हस्तांतरण करताना अकारण कायदेशीर प्रक्रियेचा त्रास सहन करावा लागेल. क्वचितप्रसंगी कोर्ट कचेऱ्यांचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे  मृत्युपत्र करताना नॉमिनेशन करण्यात आलेल्या दस्तावेजांचाही विचार करणे आवश्यक आहे.

संबंधित लेख: Intestate: मृत्युपत्राशिवाय मृत्यू आणि संपत्तीचे वाटप 

मृत्युपत्राअभावी मृत्यू झाल्यास: 

 • जर मृत व्यक्तीस कोणताही वारसदार नसेल, तर संबंधित मालमत्ता नॉमिनीच्या नावावर हस्तांतरित केली जाते. 
 • मृत व्यक्तीचे मृत्युपत्र नसेल आणि त्या व्यक्तीचा  कायदेशीर वारस संबंधित मालमत्तेवर दावा सांगत असेल, तर नॉमिनी केवळ त्याचे नॉमिनेशन असलेली मालमत्ता धारण करू शकतो, परंतु, त्याचा मालकी हक्क मात्र कायदेशीर वारसदारांकडे राहतो. म्हणजेच कायदेशीर वारसदार हाच त्या मालमत्तेचा मालक असतो. 
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार, “खातेधारकाच्या निधनानंतर, नॉमिनीला मृताच्या खात्यातून उर्वरित रक्कम “कायदेशीर वारसदारांचा विश्वस्त” म्हणून हस्तांतरित करण्यात येईल. बॅंकेद्वारे अशा प्रकारच्या देयकाचा नामनिर्देशित व्यक्तीविरूद्ध असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या हक्कावर किंवा दाव्यावर परिणाम होणार नाही.” नॉमिनी आणि मृताचे कायदेशीर वारस यामध्ये असणाऱ्या वादात विनाकारण बँकांची कामे अडकून पडू नयेत म्हणून हा नियम आरबीआय मार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 • सन २०१६, मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय कंपनीच्या समभागांच्या संदर्भात असणाऱ्या कायदेशीर वारस विरूद्ध नॉमिनी केसमध्ये असे म्हटले आहे की नॉमिनेशन प्रक्रिया म्हणजे वारसाहक्क नव्हे. जोपर्यंत मृताचे कायदेशीर वारसदार मालमत्तेच्या मालकी  हक्कासाठी प्रयत्न करत नाहीत अथवा मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित मालमत्ता नॉमिनीच्या ताब्यात असते कारण  नॉमिनी मालमत्तेचा विश्वस्त असतो, मालक नाही.  
 • 14 नोव्हेंबर, 2019 रोजी ओसवाल ग्रीनटेक विरुद्ध श्री. पंकज ओसवाल  या केस संदर्भात “नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनल, नवी दिल्ली (NCLT)” ने दिलेल्या निर्णयानुसार, एखाद्या मालमत्तेसाठी केलेले नॉमिनेशन म्हणजे कायदेशीर मालकी नसते. नॉमिनीने संबधीत मालमत्ता मृत व्यक्ती कायदेशीर वारसांच्या वतीने धारण करू शकतो, परंतु त्याचा मालकी हक्क हा कायदेशीर वारसदारांचाच असतो. 

संबंधित लेख: नॉमिनेशन प्रक्रियेसंदर्भातील काही महत्वाचे नियम व अटी 

विमा कायदा आणि नॉमिनेशन

 • नॉमिनेशन म्हणजे मालकी हक्क नव्हे, नॉमिनी म्हणजे विश्वस्त मालक नव्हे, या नियमाला अपवाद म्हणजे विमा कायद्यामधील तरतुदी. 
 • विमा कायदे (दुरुस्ती) अधिनियम २०१५ नुसार नवीन नियमांनुसार, नॉमिनेशन करण्यात आलेली व्यक्ती जर, पती-पत्नी, पालक आणि मुले, तसेच कुटुंबातील नातलगांपैकी असल्यास त्यांना लाभार्थी बनविता येईल. जेणेकरुन विम्याचे पैसे इच्छित प्राप्तकर्त्याकडे जावोत. 
 • नवीन विमा कायद्यात, जोडीदार अथवा कुटुंबातील सदस्याला नॉमिनी म्हणून नेमण्यात आले, तर मृत्यूचा लाभ नॉमिनी व्यक्तीस देण्यात येईल. इतर कायदेशीर वारस सदर पैशावर कोणत्याही प्रकारचा हक्क सांगू शकणार नाहीत. 
 • या नियमामुळे नॉमिनेशन प्रक्रिया अर्थपूर्ण व स्पष्ट होते. पॉलिसीधारकाने स्वइच्छेने नामनिर्देशित केलेल्या  व्यक्तीलाच त्याच्या पॉलीसीचा लाभ मिळाल्यामुळे पॉलिसीचा मूळ उद्देश सफल होतो. 

“दीर्घकालीन विचार आणि योजना, आपल्याlला अल्प-मुदतीचा निर्णय घेण्यास वर्धित करतात.” आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी योजना बनविणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या प्रियजनांचे आणि आपल्या वारसांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहील. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Nomination vs Legal heirs Marathi Mahiti, Nomination vs Legal heirs in Marathi, Nomination vs Legal heirs Rules in Marathi, Nomination vs Legal heirs  Rules Marathi

Web Title: Nomination vs Legal heirs who is the rightful owner in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.