Reading Time: 2 minutes

अर्थ!!! सामान्य माणसापासून ते अगदी जागतिक महासत्तेपर्यंत सगळ्यांसाठीच आवश्यक असणारा असा हा घटक. अर्थार्जन हा जगण्यासाठी आवश्यक असणारा मूलभूत घटक आहे. आपण कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन व विनियोग करणे खूप आवश्यक आहे. यासाठी गरज असते ती अर्थसाक्षरतेची!
या जाणिवेतूनच आम्ही संपुर्णपणे आर्थिक विषयाला वाहून घेतलेली ‘अर्थसाक्षर’ नावाची वेबसाईट सुरू केली. इंटरनेटवर आर्थिक विषयांवर आधारित अनेक लोकप्रिय वेबसाईट आहेत. पण ‘अर्थसाक्षर’ या साऱ्यांपेक्षा वेगळी आहे. इतर सर्व वेबसाईट्स इंग्रजीमध्ये उपलब्ध असताना निव्वळ अर्थसाक्षरतेचा प्रसार करून अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही अर्थसाक्षर करण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेली आणि संपूर्णपणे आर्थिक विषयांची माहिती आपल्या मायबोलीतून अर्थातच मराठी भाषेतून लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणारी अर्थसाक्षर ही एकमेव वेबसाईट आहे.
दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींपर्यंत, गुंतवणुकीपासून कर्जापर्यंत, सरकारी योजनांपासून म्युच्युअल फंडपर्यंत, बचत योजनेपासून शेअर्सपर्यंत, फसवणुकीच्या घटनांपासून सावध करणारे तर करबचतीचे पर्याय सुचविणारे सविस्तर माहितीपूर्ण लेख; तसेच अगदी घरगुती आर्थिक नियोजनासाठी तज्ञांचे मार्गदर्शन असो वा देशाच्या अर्थसंकल्पाचे तज्ञांनी केलेले परीक्षण सर्वकाही अर्थसाक्षरवर उपलब्ध आहे.
आजच्या या लेखप्रपंचाचे कारण म्हणजे आज आमच्या अर्थसाक्षरतेच्या मोहिमेला एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी २०१८ रोजी आम्ही ही वेबसाईट सुरू करून अर्थसाक्षरतेच्या मोहिमेला सुरुवात केली. गेल्या वर्षाभरात आम्हाला मिळालेलं सहकार्य आणि प्रोत्साहन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आलं आहे. या सहकार्यासाठी आणि प्रोत्साहनासाठी टीम अर्थसाक्षरतर्फे मनःपूर्वक धन्यवाद!
टीम अर्थसाक्षर नेहमीच आपल्या सूचना व अभिप्राय याचा आदर करत आलेली आहे. आपल्या सूचना आणि अभिप्राय आम्हाला जरूर कळवत रहा.
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर कळवा. तसेच अर्थसाक्षरचे नवनवीन लेख दररोज एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.

आमचे काही महत्वपूर्ण आणि लोकप्रिय लेख:- 

२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…,    नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग,

पगारातील करपात्र घटक आणि करदायित्व – भाग २ ,   कलम ८०सी अंतर्गत करबचतीचे १० विविध पर्याय

 पगारच पुरत नाही…बचत कशी करू?,    आपत्कालीन निधी – आणीबाणी निधी (Emergency Fund)

उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस,    सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

Share this article on :
1 comment
  1. खूप छान आर्थिक विषय बाबत माहिती आता मराठी मधून प्रथमच मिळत आहे .आपले आभारी आहोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.