Reading Time: 3 minutes

नवीन वर्षाच्या आगमनानंतर हळूहळू आर्थिक नववर्षाचे वारे वाहायला लागतात. गुलाबी थंडीतही कर (Tax), गुंतवणूक (Investment), करबचत (Tax Saving) असे शब्द ऐकून घाम फुटतो. मग चालू होते लगबग कर वाचविण्याची आणि त्यासाठी शोधले जातात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय! असे पर्याय जे कर वाचवून उत्तम परतावाही देतील.

  • आयकर कायदा १९६१, नुसार कलम (section) ८०सी (80C), ८०डी (80D), ८०टीटीए (80TTA), ८० टीटीबी (TTB), ८०इ (80E), ८०जी (80G), ८०जीजीए (80GGA) आणि  ८०जीजीसी (80GGC) अशा एकूण ८ सेक्शनमध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. प्रत्येक कलमाअंतर्गत मिळणारी करवजावट ही वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येक पर्यायासाठी काही नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
  • यापैकी वगळता  कलम ८०सी प्रत्येक कलम हे ठराविक पर्यायासाठी निश्चित करण्यात आले आहे. कलम ८०सी मध्ये मात्र जवळपास करबचतीसाठी गुंतवणुकीचे १० वेगवेगळे पर्याय नमूद करण्यात आले आहेत.
  • कलम ८०सी हा करबचत अथवा करवजावटीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं कलम आहे.

कलम ८०सी (Section 80C):

सर्वप्रथम आयकर कायद्यामधील करवजावटीचं महत्वाचं कलम ८०सी अंतर्गत करवजावटीस पात्र असणाऱ्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती घेऊया.

खाली दिलेला तक्त्यावरून (Chart) गुंतवणुकीचे प्रकार, त्यावर मिळणार परतावा व त्याचा दर, गुंतवणुकीमधील धोके व त्या अंतर्गत मिळणारी करवजावट हे सारं समजणं खूप सोपे जाईल.

कलम ८०सी अंतर्गत करवजावटीचे गुंतवणूक पर्याय (Tax Saving Investments u/s 80C)

गुंतवणुकीचे प्रकार (Investments) गुंतवणुकीचे कारण

(Why to Invest)

अंदाजे परताव्याचा दर%  (Return Rate %) धोके (Risk Factors) कमाल करवजावट (Max Deduction )
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) १. करबचत.

२. उत्तम व्याजदर

३. चांगला परतावा मिळतो.

१८.५०% १. उत्तम परतव्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरते.

२. डिव्हीडंट पर्याय शक्यतो टाळा.

रु. १,५०,०००/-
युलिप (ULIPS) १.  ५ वर्षांचा लॉक इन कालावधी

२. बचत, गुंतवणूक आणि उत्तम परतावा व करसवलत

१०.७०% १. पाच वर्षांच्या आत पैसे काढल्यास काही चार्जेस भरावे लागतात शिवाय परतावाही कमी मिळतो. रु. १,५०,०००/-
सुकन्या समृद्धी योजना १. मुलीच्या उच्चशिक्षणासाठी यामधील ५०% रक्कम काढता येते. ८.५०% १.मुलगी १० वर्षांची होईपर्यंतच या योजनेअंतर्गत खाते उघडता येते.

२. फक्त मुलींसाठीची योजना

रु. १,५०,०००/-
एनपीएस (NPS) १. निवृत्तीच्या वेळी सर्व रक्कम मिळते.

२. ४०% पर्यंतच्या परताव्यावर करसवलत मिळते.  

१२.३०% यातील जमा रक्कम वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी काढल्यास फक्त २०% करसवलत मिळते.
कर्मचाऱ्याचे योगदान कलम८०सीसीडी-१ रु. १,५०,०००/-
एम्प्लॉयरचे योगदान कलम ८०सीसीडी -२ पगाराच्या १०%
कर्मचाऱ्याचे जास्तीचे योगदान (contribution)  कलम ८०सीसीडी रु. ५०,०००/-
ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधी (VPF) आणि पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड  (PPF) संपूर्णतः सुरक्षित. ८.५०% रु. १,५०,०००/-
ज्येष्ठ नागरिक बचत योजना १. मॅच्युरिटी कालावधी – ५ वर्षे

२. पोस्ट ऑफिसची योजना

३. ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही कालावधी वाढवता येतो.

४. व्याजाची रक्कम बचत खात्यामध्ये  जमा केली जाते.

८.३०% १. ५ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय खाते बंद करता येते नाही.

२. खाते उघडल्यानंतर २ वर्षांच्या आत खाते बंद केल्यास १.५ % बॅलन्स रक्कम खात्यात जमा करावी लागते.

३. दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर खाते १% बॅलन्स रक्कम खात्यात जमा करावी लागते  

रु. १,५०,०००/-
निवृत्तीयोजना ३३% रक्कम करमुक्त असते ८% ते १०% जास्त चार्जेस रु. १,५०,०००/-
राष्ट्रीय बचत योजना (NSC) १. एफडी प्रमाणेच बचत योजना.

२. परतवा करपात्र नाही.

८.२०% १. धारकाचा  मृत्यू हे एकमेव कारण वगळता यामधील गुंतवणूक परिपकवतेपूर्वी (prematurely) काढून घेता येत नाही. रु. १,५०,०००/-
बँक एफडी (FD) १. बँकेनुसार व्याजदर वेगवेगळा असतो. जेष्ठ नागरिकांसाठी व्याजदर जास्त असतो. साधारणतः ७.५०% ते ८५०% १. यावर मिळणारे व्याज करपात्र असते.

२. पाच वर्षांचा लॉक- इन कालावधी

रु. १,५०,०००/-
विमा योजना १. अत्यल्प कर आकारला जातो.

२. योजनेमध्ये नमूद केलेली जोखीम  सुरक्षितता

५.५०% १. ५ ते ६% रक्कम बचत होते रु. १,५०,०००/-
८०सी या कलमाखाली मिळणारी एकूण करवजावट (Total Deduction)  रु. १,५०,०००

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Dc6O8o )

करबचतीचे सोपे मार्गराष्ट्रीय पेन्शन योजना,  ELSS की ULIP?सुकन्या समृद्धी योजना – भाग ३,

सुकन्या समृद्धी योजना – भाग १ , सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा. Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…