Reading Time: 2 minutes
“पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी” म्हणजेच आधार – पॅन लिंकिंग ही केंद्रसरकारच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे.
- आत्तापर्यंत ८.४७ कोटी नोंदणीकृत पॅन कार्ड धारकांपैकी केवळ ६.७७ कोटी धारकांनी पॅन क्रमांक आधारशी जोडला आहे.
- यापूर्वी मुदतवाढ देऊनही अनेकांनी आधार -पॅन लिंक केलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, यासाठीची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
- यासंदर्भात सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) एक परिपत्रक एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जर नागरिकांनी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आपले पॅन आणि आधार क्रमांक लिंक केले नाही, तर पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल आणि या क्रमाकांच्या सहाय्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.
- पॅन आणि आधार क्रमांक लिंक करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची वेबसाईटवर म्हणजेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng
- लिंकवर क्लिक केल्यावर एक वेबपेज ओपन होईल. त्यावरील माहिती भरून कॅप्चा टाईप करा अथवा ओटीपी मागवून तो भरावा लागेल.
- त्यांनतर ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचे आधार -पॅन लिंक करू शकता.
- एसएमएसच्या सहाय्यानेही तुम्ही आधार- पॅन लिंक करू शकता.
- नागरिकांनी आधार-पॅन लिंक करताना नाव व जन्मतारीख बरोबर असल्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे.
- नाव अथवा जन्मतारीख यामध्ये चूक असल्यास,आधी ते दुरुस्त करुन घ्यावे लागेल.
- आधारमध्ये चूक असेल, तर यूआयडीएआय आणि पॅनमध्ये बदल करायचा असेल, तर इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क साधून त्यामध्ये दुरुस्ती करता येईल.
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :