Reading Time: 2 minutes
PM Surya Ghar Muft Bijli Yojana : आपण पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असाल तर pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ग्राहकांना त्यांच्या रुफटॉप सोलर इन्स्टॉलेशनसाठी उत्पादक आणि पुरवठादार यांची निवड करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना काय आहे?
- पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश भारतातील एक कोटी कुटुंबांना मोफत वीज उपलब्ध करून देणे आहे.
- ज्यांनी घरावर सोलर वीज युनिट (Solar Rooftop Unit ) बसवण्याचा निर्णय घेतला आहे, याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
- या योजनेमुळे घरांना दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे.
- सरकारने 75,021 कोटी रुपयांच्या खर्चासह 29 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Ministry) या योजनेस मान्यता दिली.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना कशी काम करते? –
- पीएम सूर्य घर मोफत वीज योजना 2 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या सिस्टीमसाठी सौर युनिटच्या (Solar Unit) किमतीच्या 60% आणि 2 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या प्रणालींसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या 40% अनुदान देते.
- हे अनुदान जास्तीत जास्त 3 किलोवॅट क्षमतेपर्यंत मर्यादित आहे.
- 1 किलोवॅट सिस्टमसाठी 30,000 रुपये अनुदान, 2 किलोवॅट सिस्टमसाठी 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट सिस्टमसाठी 78,000 रुपये अनुदान आहे.
नक्की वाचा – मुलांच्या भवितव्यासाठीच्या योजना
योजनेसाठी अर्ज करण्यास कोण पात्र आहे –
- अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- सौर पॅनेल (Solar Panel) बसवण्यासाठी योग्य छप्पर असलेले घर असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- सौर पॅनेलसाठी कुटुंबाने इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
- सौर युनिटला वित्तपुरवठा करण्यासाठी ग्राहक कर्ज सुविधेचा (Loan Scheme) लाभ घेऊ शकतात. 3 kW पर्यंतच्या निवासी RTS सिस्टीम बसवण्यासाठी कुटुंबांना सध्या सुमारे 7% च्या तारण-मुक्त कमी व्याज कर्ज उत्पादनांमध्ये खरेदी करता येईल.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) वेळोवेळी ठरवलेल्या प्रचलित रेपो दरापेक्षा (Repo Rate) 0.5% वर व्याजदर निश्चित केला आहे. रेपो रेट, जो सध्या 6.5% आहे, 5.5% इतका कमी झाल्यास, ग्राहकांसाठी प्रभावी व्याजदर सध्याच्या 7% ऐवजी 6% होईल.
सबसिडी मिळवण्याची प्रक्रिया समजून घ्या –
- सर्वात आधी पोर्टलवर नोंदणी करा. तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा.
- तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाका.
- आता ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करा.
- फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
- एकदा तुम्हाला मान्यता मिळाली की नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून प्लांट बसवून घ्या.
- एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटची माहिती सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
- नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
- त्यानंतर तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल. पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा.
- तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत मिळेल.
नक्की वाचा – मुलींचे स्वप्न पूर्ण करणारी, ‘लेक लाडकी योजना’
एखाद्याने रूफ टॉप सोलर योजनेची निवड का करावी?
- डिस्कॉमला अतिरिक्त वीज विकून कुटुंबे वीज बिल वाचवू शकतील तसेच अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील.
- पीएम सूर्य घर मोफत वीज योजना 3 किलोवॅट क्षमतेचे रूफ टॉप सोलर युनिट बसवून महिन्याला 300 युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबासाठी वर्षभरात अंदाजे 15,000 रुपयांची खात्रीशीर बचत होते.
- यामुळे स्वतःची वीज तयार होऊन वीज बिलात बचत होते.
- यामुळे थोडक्यात वीज बिलावर होणारा अतिरिक्त खर्च वाचून बचतीत वाढच होईल.
Share this article on :