Reading Time: 3 minutes

राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ साली शेअर बाजारात  गुंतवणूक करायला सुरुवात केली. झुनझुनवाला यांनी  ५,००० रुपये गुंतवून शेअर बाजाराचा श्रीगणेशा केला होता. त्यांचा रविवार १४ ऑगस्ट २०२२ रोजी मृत्यू झाला तेव्हा हजारो कोटी  रुपये किंमतीचे शेअर्स झुनझुनवालांच्या पोर्टपोलिओमध्ये होते.

क्रिसिल कंपनीचे काही शेअर्स झुनझुनवाला यांनी आईच्या आग्रहाखातर २००३ मध्ये घर खरेदी करण्यासाठी विकले होते. पुढे जाऊन त्याच शेअर्सची किंमत ७०० कोटी रुपये झाली होती. शेअर बाजाराची ताकद सांगताना ते नेहेमी हे उदाहरण देत असत.

आपल्या ३७ वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये त्यांनी शेकडो शेअर्स मध्ये गुंतवणूक केली होती परंतु त्यांनी गुंतवणूक केलेल्या ५ शेअर्सने रग्गड परतावा दिला होता. टायटन, सेसा गोवा, क्रिसिल, लुपिन आणि स्टार हेल्थ या शेअरचा त्यामध्ये समावेश होतो. या सर्व शेअर्सबद्दल थोडक्यात माहिती आपण पुढील  लेखात पाहणार आहोत. 

 

१. टायटन 

 

  • टायटन कंपनी ज्वेलरी, घड्याळे आणि ऑप्टिक्स क्षेत्रात काम करते. टायटन कंपनीचा शेअर राकेश झुनझुनवालांच्या आवडीचा शेअर होता. २००२-२००३ साली टायटन कंपनीचा शेअर फक्त ३-४ रुपयांचा आसपास होता, तेव्हा त्यांनी या शेअरची खरेदी करून ठेवली होती. २००८ साली आलेल्या मंदीत त्यांच्याकडे ४.४ दशलक्ष डॉलर्सचे टायटन कंपनीचे शेअर्स होते.
  • राकेश झुनझुनवाला यांनी काही  २००८ साली आलेल्या मंदीच्या काळात विकून टाकले. त्यानंतर संधीच्या शोधात असणाऱ्या झुनझुनवाला यांनी त्यांचा टायटन   कंपनीमतील हिस्सा १०.२८% पर्यंत वाढवत नेला. टायटन कंपनीतील आघाडीच्या समभागधारकांमध्ये झुनझुनवालांचा समावेश होता.
  • १ जानेवारी २०२२ मध्ये टायटनचे बाजार भांडवल २.१९ लाख कोटी झाले होते. सध्याच्या घडीला राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा यांच्याकडे संयुक्तपणे ११,०८१ कोटी रुपयांची सुमारे ५% मालकी आहे.

 

२. लुपिन 

 

  • लुपिन कंपनी औषध निर्माण  क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. लुपिन कंपनीच्या शेअर्समधून झुनझुनवालांनी चांगले पैसे कमवले होते. या कंपनीचे भागभांडवल ५०० कोटी रुपये होते, तेव्हापासूनच झुनझुनवाला यांनी यात पैसे गुंतवायला सुरुवात केली. 
  • जून २००८ मध्ये लुपिन कंपनीत १५४ कोटी रुपये किंमतीचे ४.२९% शेअर्स झुनझुनवाला यांच्याकडे होते. त्यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीतून पूर्ण गुंतवणूक काढून घेतली होती. 

 

नक्की वाचा : शेअरबाजार एक भुलभुलैया

 

३. सेसा गोवा 

 

  • सेस गोवा म्हणजेच सद्याची वेदांता कंपनी होय जी खाणकाम क्षेत्रात काम करते. राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केट मध्ये जास्त गुंतवणूक केलेल्या शेअर्समध्ये सेसा गोवाचा शेअर आघाडीवर होता. लोह खनिज क्षेत्राची परिस्थिती वाईट असताना त्यांनी भविष्य ओळखून या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. 
  • १९८९ मध्ये झुनझुनवाला यांनी  सेसा गोवा कंपनीचे 4लाख   शेअर्स १ कोटी रुपयांना विकत घेतले होते. यातील २.५ लाख शेअर्स त्यांनी प्रति शेअर ६५ रुपयांप्रमाणे विकले. त्यानंतर दुसऱ्या स्लॉटमधील शेअर्स प्रत्येकी १७५ रुपये आणि २२०० रुपयांना विकले होते. 

 

नक्की वाचा : शेअर मार्केटचा राजा- राकेश झुनझुनवाला !

 

४. क्रिसिल 

 

  • क्रिसिल कंपनी रेटिंग, संशोधन आणि धोरण सल्लागार सेवा देते.  क्रिसिल कंपनीत २००३ पासून झुनझुनवाला यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीला कंपनीतील १०,००० शेअर्स विकत घेतले.  हळूहळू गुंतवणूक ५५ लाख  शेअर्स पर्यंत वाढवत नेली. 
  • २०१३ मध्ये राकेश यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी त्यांच्याकडील ४लाख शेअर्स ४६ कोटी रुपयांना विकले. सध्या झुनझुनवाला यांच्याकडे क्रिसिल कंपनीचे १३२२ कोटी रुपये किंमतीचे ५.४८ टक्के हिस्साचे शेअर्स आहेत. 

 

५. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स

 

  • स्टार हेल्थ इंश्युरन्स कंपनी हेल्थ इंश्युरन्स क्षेत्रात काम करते. या  कंपनीत राकेश झुनझुनवाला आणि पत्नी रेखा यांची संयुक्तपणे ६,९८० कोटी रुपयांची १७.२६%  हिस्सेदारी आहे. कंपनीच्या आयपीओ आधी नऊ व्यवहारांमध्ये स्टार हेल्थ अँड एलईडी इंश्युरन्स कंपनीच्या शेअरची त्यांनी प्रत्येकी १५५.२८ रुपयांमध्ये खरेदी केली होती.
  • त्यांची या कंपनीमध्ये १,२८७ कोटी रुपयांची गुंतवणूक होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये कंपनीने आयपीओ जाहीर केला. त्या वेळी शेअर्सची प्रत्येकी ९,०० रुपये किंमत होती. 

 

आपण काय शिकलो? 

  • झुनझुनवाला यांनी नियोजनबद्ध पद्धतीने शेअर्स मध्ये पैसे गुंतवल्यामुळे त्यांना कायम चांगला परतावा मिळत गेला.
  • त्यांनी सतत अभ्यास करून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली होती. 
  • संयम ठेवून गुंतवणूक केल्यामुळे त्यांना शेअर मार्केट मधील ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जात असे. 
  • राकेश झुनझुनवाला हे शेअरची किंमत कमी झाल्यावर विकत घेत आणि संयमपूर्वक दीर्घकाळ ते शेअर ठेवत असत. नंतर त्या शेअरची किंमत वाढली की तो विकून दुसऱ्या शेअरची खरेदी करत. 

 

सर्वसामान्य मध्यवर्गीय कुटुंबातून येऊनही अब्जावधींची संपत्ती आपल्या बुद्धी चातुर्याने शेअर बाजारातून कमावणारे राकेशजी अनेकांचे आयडॉल आहेत. शेअर मार्केट बाबत अर्थसाक्षर डॉट कॉम वर वेळोवेळी प्रसिद्ध होणारे माहितीपूर्ण लेख तुम्ही नक्की वाचा ! 

 

नक्की वाचा : ‘Scam 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…