Reading Time: < 1 minute
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये, अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
- आता रेपो दर ६.२५ टक्के व रिव्हर्स रेपो दर ६ टक्के असणार आहे.
- रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत ही घोषणा केली.
- रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्जांबरोबरच इतर सर्व प्रकारच्या कर्जांवर व्याजदर कमी होणार असल्याने बँकेचा कर्जाचा मासिक हप्ता कमी होणार आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
- व्यवहारांसाठी व्यापारी, सहकारी किंवा खाजगी बँकांना रकमेची गरज असते. स्विकारलेल्या ठेवीं पेक्षा जास्त रकमेची गरज भागवण्यासाठी या बँका सर्व बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला ‘रेपो रेट’ म्हणतात.
- रिझर्व्ह बँकेकडून कमी रेपो रेटने म्हणजे कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात.
- रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला की बँकानाही आपल्या ग्राहकांना दिलेल्या कर्जांचे दर वाढवावे लागतात.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
- बऱ्याचवेळा आपले व्यवहार करूनसुद्धा बँकांकडे रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम विविध बँका अल्प मुदतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ठेव म्हणून जमा करतात.
- ‘रिव्हर्स रेपो रेट’ म्हणजे रिझर्व्ह बँकेने अल्पमुदतीच्या घेतलेल्या कर्जावर बँकांना दिलेला व्याजदर.
- जेव्हा बाजारात तरलता (Liquidity) जास्त असते तेव्हा रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते आणि बाजारातील जास्तीची रक्कम स्वतःकडे ठेव म्हणून स्वीकारते. यामुळे जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःकडच्या जमा रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. म्हणून बाजारातील तरलता कमी होते.
- रिव्हर्स रेपो रेट बाजारातली रकमेची तरलता नियंत्रित करण्याचं काम करतो.
कर्ज घेताना लक्षात ठेवायच्या ५ गोष्टी , बँकेच्या वैशिष्टयपूर्ण सवलतींची आपणास माहिती आहे का?
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :