Buy Now Pay Later : बाय नाऊ पे लेटर करताना ‘हे’ अवश्य वाचा 

Reading Time: 3 minutes

Buy Now Pay Later : बाय नाऊ पे लेटर करताना ‘हे’ अवश्य वाचा 

शॉपिंग करायला आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनाच आवडतं. असंच तुम्ही कधी शॉपिंगला गेला असताना तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडून जाते पण नेमके तुमच्या जवळचे पैसे संपलेले असतात. पण ती गोष्ट तुम्हाला काहीही करून त्यावेळी घ्यायचीच असते. अशावेळी तुम्हाला जर दुकानदाराने सांगितलं, ‘काही हरकत नाही भाऊ, तुम्ही हे घ्या विकत आणि पैसे नंतर द्या’. तर तुम्ही नक्कीच आनंदून जाल नाही का?’  असाच एक पेमेंट ट्रेंड  “Buy Now, Pay Later”  या नावाने सध्या सुरु आहे. तो कसा चालतो ते आपण समजून घेऊया. 

Buy Now, Pay Later म्हणजे नक्की काय?

 • BNPL अर्थात ‘बाय नाऊ पे लेटर’ हा एक पेमेंट करण्याचा पर्याय आहे जिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या खिशातून पैसे न भरता खरेदी करू शकता. 
 • तुम्ही ही सुविधा प्रदान करणार्‍या एखाद्या फिनटेक कंपनीसोबत साइन अप केलेलं असतं, जी तुम्ही खरेदी करता तेव्हा पेमेंट करते. फिनटेक हे फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांचे कॉम्बिनेशन आहे. या फिनटेक कंपन्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून वित्तीय क्षेत्रांशी संबंधित कार्य करत असतात. उदाहरणार्थ या कंपन्या डिजिटल तंत्रज्ञान विकसित करून खास अँप्लिकेशन्स बनवतात ज्यामुळे लोक पेमेंट करू शकतात. डिजिटल  असल्याने हे व्यवहार जलद आणि सोप्या पद्धतीने होतात.
 • तथापि, एकदा त्या कंपनीने तुमच्या वतीने पैसे भरले की, तुम्हाला ठराविक कालावधीत ती रक्कम परत करायची असते. तुम्ही एकतर ती रक्कम एकरकमी अदा करू शकता किंवा तुम्ही ते EMIs द्वारे अदा करू शकता. 
 • तुम्ही दिलेल्या परतफेडीच्या कालावधीत रक्कम भरण्यात अयशस्वी झाल्यास, कंपनी तुमच्या रकमेवर व्याज आकारते. परतफेड करण्यात झालेला विलंब तुमच्या क्रेडिट स्कोअरवर गंभीर परिणाम करू शकतो.
 • आज बाजारात अशा वेगवेगळ्या फिनटेक कंपन्या उदयास आलेल्या आहेत ज्या कमीत कमी कागदपत्र  वापरून तुम्हाला असे ऑनलाईन कर्ज उपलब्ध करून देत आहेत. 

हेही वाचा – Barshi Stock Market Scam : बार्शी स्टॉक मार्केट स्कॅममधून घ्या ‘हा’ धडा…

BNPL मॉडेल कसे काम करते  

 • BNPL कंपन्या विक्रेते आणि ग्राहक या दोघांकडूनही पैसे कमावतात. विक्रेत्यांच्या बाबतीत, ग्राहकाने BNPL सुविधेचा वापर केल्यास ते BNPL ला खरेदी रकमेच्या 2% ते 8% च्या दरम्यान शुल्क देतात.
 • BNPL वेगवेगळ्या आकर्षक स्कीम्स ऑफर करतात जेणेकरून विक्रेत्यांच्या प्रॉडक्ट्सचे उत्तम मार्केटिंग होईल आणि जास्तीत जास्त ग्राहक विक्रेत्यांकडे आकर्षित होऊन सरतेशेवटी ग्राहक बिल पे करण्यासाठी BNPL हाच पर्याय पसंत करतील. 
 • जोपर्यंत घेतलेली कर्जाऊ रक्कम ग्राहकांकडून वेळेवर परत केली जाते तोपर्यंत कोणतेही व्याज आकारले जात नाही. तथापि, असेही ग्राहक असतात जे देय तारखेपर्यंत रक्कम परत करू शकत नाहीत, ज्यावर विलंब शुल्क आकारले जाते आणि विलंब शुल्क भरल्याने BNPL कंपनीच्या महसुलात भर पडते. 

BNPL चे फायदे 

 • BNPL चा व्यवहार ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. 
 • ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी क्रेडिट हिस्ट्री असणे अनिवार्य नाही. 
 • कमीत कमी कागदपत्र घेतली जाऊन तुम्ही घेऊ इच्छिलेल्या कर्जाला सुलभ मंजूरी मिळते. 
 • कोरोना सारख्या महामारीच्या काळात जेव्हा हातात पुरेसा पैसा उपलब्ध नव्हता तेव्हा अशा फिनटेक कंपन्यांमुळे मोठ्या खर्चाचे छोट्या ईएमआयमध्ये विभाजन करण्यास अनेकांकडून प्राधान्य देण्यात आले. 

BNPL चे तोटे 

 • शेवटी हे एक प्रकारे कोणाकडून तरी घेतलेले कर्जच आहे. जोपर्यंत तुम्ही वेळेवर रक्कम परत कराल, तोपर्यंत तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नाही. तुम्ही वेळेवर रक्कम क्लिअर केल्यास, तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्याची शक्यता आहे. तथापि, जर तुमची देयके चुकली किंवा उशीर झाला, तर तुमचा क्रेडिट स्कोअर घसरेल.
 • सिबिल’च्या आकडेवारीनुसार या BNPL कंपन्या नोकरीला लागलेल्या आणि वय वर्षे तीसपेक्षा कमी असलेल्या तरुणांवर लक्ष केंद्रित करतात. ज्यांचा ऑनलाईन खरेदी करणं आणि त्यासाठी झटपट मंजूर होणाऱ्या कर्ज घेण्याकडे जास्त कल असतो. हा वयोगट, कंपन्यांच्या भूलभुलैय्या ऑफर्स पाहून मागचा पुढचा विचार न करता खरेदी करतो ज्यामुळे पुढे त्यांना त्या कर्जाचे हफ्ते भरताना नाकीनऊ येतात. 

हेही वाचा – Warren Buffett Quote : वॉरेन बफेट यांची जीवनाबद्दलची 20 उत्तम विधाने …

तुम्ही काय कराल 

 • BNPL हा पर्याय चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही कारण अनपेक्षितपणे कधी तुम्ही कुठल्या आर्थिक संकटात सापडला किंवा काही वैद्यकीय कारणासाठी तुम्हाला तातडीची आर्थिक मदत लागली तर ही BNPL कार्ड्स वापरण्यास हरकत नाही. कारण तेव्हा त्या संकटातून बाहेर येणं हे तुमच्यासाठी महत्वाचं असतं. पण विनाकारण आणि गरज नसलेल्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी तुम्ही ही BNPL पेमेंट कार्ड्स वापरणं म्हणजे ‘ऋण घेऊन सण साजरा केल्यासारखं आहे’ हे ग्राहकांनी लक्षात घ्यायला हवं. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!