रिलायन्स इंडस्ट्रीज AGM – मुकेश अंबानींच्या जिओ ग्लास, जिओ TV+ अशा महत्वपूर्ण घोषणा !

Reading Time: 3 minutes

मुकेश अंबानींच्या बंपर घोषणा !

रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे काल महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भव्य-दिव्य वार्षिक सभा असे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून ठरलेले आहे. कंपनीच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्व.धिरूभाई अंबानी गुंतवणूकदारांपुढे या सभांतून मांडत असत. त्यांचा वारसा सध्याचे चेअरमन श्री.मुकेश अंबानी समर्थपणे चालवत आहेत. 

कोरोना विषाणूमुळे जगभरात सर्वत्र आर्थिक मंदीचे वातावरण असतानाही रिलायन्स समूह जिओ मध्ये मोठमोठ्या जागतीक कंपन्यांशी भागीदारी करून नवीन गुंतवणुकी गोळा करत आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीजची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 15 जुलै 2020 रोजी जिओ मिट द्वारे पहिल्यांदाच व्हर्च्युअली संपन्न झाली. यामध्ये त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत. 

धीरुभाई अंबानी – रिलायन्स इंडस्ट्रीजचे महान उद्योजक ! 

रिलायन्स इंडस्ट्रीज महत्वपूर्ण घोषणा :

1. भांडवली बाजारमूल्य :

 • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवली बाजारमूल्याने नुकताच ₹12 लाख कोटींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. असे करणारी रिलायन्स पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

2. जीएसटी

 • रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील सर्वाधिक म्हणजे ₹ 69,372 कोटी जीएसटी सरकारला भरणारी कंपनी ठरली आहे. 

3. कर्जमुक्त रिलायन्स : 

 • रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त करण्याचे ध्येय श्री. मुकेश अंबानी यांनी ठरवले होते. यासाठी मार्च  2021 पर्यंत कालावधी ठरवला गेला होता. पण त्यापूर्वीच जवळपास 10 महिने आधी रिलायन्स कर्जमुक्त करण्यात कंपनीने यश मिळवले आहे.
 • रिलायन्स इंडस्ट्रीजवर ₹ 1,61,035 कोटींचे कर्ज होते. त्यापेक्षा भरपूर जास्त म्हणजे राईटस इश्यू व गुंतवणूकदारांना हिस्सा विक्री करून एकूण ₹ 2,12,809 कोटींचे भांडवल उभे करण्यात आले आहे. 
 • कर्जमुक्तता व नवीन भांडवल उभारणीमुळे रिलायन्स आर्थिकदृष्ट्या पुढील प्रगतीसाठी भक्कम झाली आहे. 

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचे पैसे तीन महिन्यात दुप्पट कसे झाले?

4. गुगलची गुंतवणूक:

 • जगाचे सर्च इंजिन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या “गुगल” ने रिलायन्स जिओ च्या 7.7% शेअर्ससाठी ₹ 33,737 कोटी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 13 आठवड्यांत रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारा गुगल हा 14 व गुंतवणूकदार आहे. 
 • रिलायन्स जिओने आतापर्यंत 33% हिस्साविक्री करून चक्क ₹ 1,52,056 कोटी रुपये उभे केले आहेत. 

5. 5G सोल्युशन्स

 • रिलायन्स जागतिक दर्जाची संपूर्ण स्वदेशी 5G सेवा पुढील वर्षापासून कार्यरत करणार आहे. 
 • मुकेश अंबानी यांनी जिओ 5 जी सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित केली. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पहिलं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 • या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन जीओ अनेक उद्योगांना, आर्थिक संस्था, शिक्षण, आरोग्य, शेती, स्मार्ट शहरं यासारख्या अनेक क्षेत्रांबरोबर जोडू शकेल. 
 • अनेक क्षेत्रांमध्ये चांगले पर्याय शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होईल

Foreign Investment -परकीय गुंतवणूक म्हणजे काय?

6. जिओ टिव्ही + :

 • कंपनी Jio Tv + या सेवे द्वारे एकाच एप मध्ये विविध नेटफ्लिक्स, अमाझोन प्राईम अशा ओव्हर द काउंटर (OTT) सेवा देणार आहे.

7. जिओ ग्लास :

 • जिओ ग्लास या  व्हर्चूअल रिअलिटी गॉगलचं अनावरण करण्यात आले असून, जिओ ग्लासचे वजन फक्त 75 ग्रॅम आहे. सध्या यामध्ये 25 ॲप उपलब्ध आहेत.  एकाच केबलद्वारे कनेक्ट करता येते. ऑगमेंटेड रिअलिटी व्हिडीओची सोय करण्यात आली आहे.
 • ‘जियो ग्लास’ने सर्वसाधारण ऑफिस कॉलला एका नाविन्यपूर्ण स्तरावर नेले आहे. मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश आणि इशा अंबानी यांनी ही योजना जाहीर केली.
 • या नवीन उत्पादनासह कंपन्या स्वत:च्या थ्रीडी आकृतीसह होलोग्राफिक व्हिडिओ कॉल करु शकतात आणि त्याच वेळी एखादे प्रेझेंटेशन करु शकतात. 
 • जियो ग्लासमुळे शिक्षक आणि विद्यार्थी 3डी व्हर्च्युअल रुममध्ये एकत्र येऊ शकतात

8. रिलायन्स रिटेल :

 • रिलायन्स रिटेल भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जास्त नफा मिळवणारी किरकोळ दुकानांची साखळी आहे. 
 • मार्च 2020 अखेर रिलायन्स रिटेल ने ₹ 1,62,936 कोटींच्या विक्रीवर ₹ 9,635 कोटींचा व्याज, घसारा, करपूर्व नफा मिळवला आहे.  
 • जिओ मार्ट ची वेबसाईट ग्राहक व किराणा दुकानदारांसाठी रिलायन्स रिटेलतर्फे नुकतीच सुरु करण्यात आली आहे. किराणा दुकानांमध्ये विविध उपयोगी पॉइन्ट ऑफ सेल सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. 
 • कंपनीचे दोन तृतीयांशाहून जास्त दुकाने छोट्या शहरांत आहेत. 80% हून जास्त फळे व भाजीपाला खरेदी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून केली जाते. 
 • किराणा दुकाने यापुढे मर्यादित उत्पादने, जागा किंवा वितरण व्यवस्था यांमुळे मागे राहणार नाहीत. JioMart सोबत भागीदारीमुळे किराणा दुकानांना व्यवसाय आणि उत्पन्न वाढवण्यात मदत होईल, असे इशा अंबानी यांनी सांगितले. 

रिलायन्स जिओ -फेसबुक मधील डिलचे परिणाम

9. नवी स्मार्टफोन ऑपरेटींग सिस्टिमची घोषणा :

 • आतापर्यत कंपनीने 10 कोटी जिओ फोन विकले आहेत. 
 • कमी किमतीमध्ये 4G किंवा 5G स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यासाठी गुगल आणि रिलायन्स जिओ एकत्र येऊन नव्या स्मार्टफोन ऑपरेटींग सिस्टिमची निर्मिती करणा आहेत.

10.इतर घोषणा :

 • ग्राहक व तंत्रज्ञान (कंझ्युमर व टेक्नोलॉजी) व्यवसायांमध्ये कंपनीने जोरदार वाढ नोंदवली आहे. 
 • सौदी अर्माको बरोबरच्या भागीदारीला कोव्हीड मुळे उशीर होत असल्याचे सांगितले गेले. 
 • पेट्रोलियम व केमिकल व्यवसायासाठी रिलायन्स पर्यावरण स्नेही उर्जा धोरणे अवलंबणार आहे. हा व्यवसाय स्वतंत्र उपकंपनीद्वारे करण्यात येणार आहे. 

श्री. मुकेश अंबानी यांचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी येथे व बघण्यासाठी येथे क्लिक करा. 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Click to rate this post!
[Total: 3 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *